‘एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटम’ध्ये खा. साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांचं मार्गदर्शन

पुण्यातल्या प्रसिद्ध एमआयटी विद्यापीठाच्या (MIT Peace University) अंतर्गत येणाऱ्या स्कूल ऑफ गव्हरमेंटमध्ये (School of Government) भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर (Sadhvi Pradnya Singh) यांचं मार्गदर्शन ठेवण्यात आलं आहे. त्यांना विद्यार्थी संघटनांनी विरोध केला आहे.

'एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटम'ध्ये खा. साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांचं मार्गदर्शन

पुणे : पुण्यातल्या प्रसिद्ध एमआयटी विद्यापीठाच्या (MIT Peace University) अंतर्गत येणाऱ्या स्कूल ऑफ गव्हरमेंटमध्ये (School of Government) भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर (Sadhvi Pradnya Singh) यांचं मार्गदर्शन ठेवण्यात आलं आहे. वेबिनारच्या माध्यमातून प्रज्ञा सिंह राजकारणात येऊ इच्छिनाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणात आहेत. 25 ऑगस्टला दुपारी 2 ते संध्याकाळी 7 दरम्यान हा वेबिनार असणार आहे. (BJP MP Sadhvi Pragya Singh Thakur has been mentored at the MIT University School of Government in Pune)

‘स्कूल ऑफ गव्हरमेंट’ हा एक वेगळा अभ्यासक्रम

पुण्याच्या एमआयटी विद्यापीठात (MIT Peace University) सातत्यानं विविध उपक्रम राबवण्यात येतात. विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या विविध महाविद्यालयांमध्येही विविध कोर्सेस चालवले जातात. त्यापैकी एमआयटी स्कूल ऑफ गव्हरमेंट हा एक वेगळा अभ्यासक्रम आहे. यामध्ये राजकीय आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिलं जातं. त्यांच्यात नेतृत्वगुण तयार केले जातात.

‘भारतीय छात्र संसद’ हा देशभरात गाजलेला उपक्रम

एमआयटी विश्वशांती विद्यापीठाअंतर्गत विविध विषयांचे अभ्यासक्रम चालवले जातात. स्कूल ऑफ गव्हरमेंटमध्ये राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि संस्कृतिक क्षेत्रातील देशभरातील दिग्गज मान्यवर मार्गदर्शनासाठी येत असतात. गेल्या अनेक वर्षांपासून याअंतर्गत भारतीय छात्र संसद हा देशभरात गाजला आहे. या उपक्रमांला देशाच्या कानाकोपार्‍यातील विद्यार्थांनी मोठा प्रतिसाद दिला होता.

प्रज्ञा सिंह ठाकूर यांना विद्यार्थी संघटनांचा विरोध

एमआयटी स्कूल ऑफ गव्हरमेंटमध्ये प्रज्ञा सिंह ठाकूर यांचं मार्गदर्शन ठेवण्यात आल्यानंतर त्यांना विद्यार्थी संघटनांनी विरोध केला आहे. साध्वी प्रज्ञा सिंह यांची पार्श्वभूमी माहित असूनही त्यांना का बोलवण्यात आलं, असा सवाल विद्यार्थी संघटनांनी केला आहे.

संबंधित बातम्या :

‘महाज्योती’ संस्था देणार मागासवर्गीय विद्यार्थ्यांना JEE, NEET परीक्षेसाठी मोफत प्रशिक्षण! असा करा अर्ज

MPSC तर्फे संयुक्त पूर्व परीक्षेसंदर्भात महत्वाची अपडेट; परीक्षा ‘या’ तारखेला होणार, ॲडमिट कार्ड जारी

टीईटी परीक्षेसाठी मुदतवाढ, आता 5 सप्टेंबरपर्यंत करता येणार अर्ज, कुठे आणि कसा करायचा अर्ज? वाचा सविस्तर

 

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI