AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

C-DAC चा खेळखंडोबा, चार परीक्षा घेतल्या, रँकही वाटप, आता चारही परीक्षा रद्द

या संस्थेने यापूर्वी चार परीक्षा घेतल्या आणि आता त्या चारही परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत.

C-DAC चा खेळखंडोबा, चार परीक्षा घेतल्या, रँकही वाटप, आता चारही परीक्षा रद्द
विद्यार्थी
| Updated on: Feb 15, 2021 | 12:13 PM
Share

पुणे : हजारो विद्यार्थी दरवर्षी ‘सी-डॅक’च्या (C-DAC) पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमासाठी परीक्षा (C-DAC Announced Fresh C-CAT After Taking Four Tests) देत असतात. मात्र, यावर्षी त्या सर्व विद्यार्थ्यांना या ख्यातनाम संस्थेकडून एक मोठा धक्का मिळाला आहे. या संस्थेने यापूर्वी चार परीक्षा घेतल्या आणि आता त्या चारही परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. तशी घोषणा संस्थेने केली. तसेच, या सर्व विद्यार्थांना आता पुन्हा ही परीक्षा द्यावी लागणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या संतापाची लाट आहे (C-DAC Announced Fresh C-CAT After Taking Four Tests).

नेमकं प्रकरण काय?

C-DAC म्हणजे सेंटर फॉर डेव्हलप्मेंट ऑफ अ‍ॅडव्हान्स कम्प्युटिंग. ही संस्था पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमासाठी (PG diploma courses) अ‍ॅडमिशनसाठी एक संगणकीकृत कॉमन अ‍ॅडमिशन टेस्ट (computerised Common Admission Test C-CAT) घेत असते. त्यानंतर जे त्या परिक्षेत पास होतात त्यांना त्यांच्या रँकनुसार या अभ्यासक्रमासाठी देशातील कॉलेज अलॉट केले जातात.

C-DAC Announced Fresh C-CAT

C-DAC Announced Fresh C-CAT

यावर्षी तब्बल चार वेळा ही परीक्षा झाली. यापैकी तीन परीक्षा टेक्निकल समस्येचं कारण देत रद्द करण्यात आल्या. सर्व विद्यार्थ्यांनी चार वेळा परीक्षा दिली. चौथ्यांदा C-DAC परिक्षेचा निकाल जाहीर केला, रँकनंतर कॉलजही अलॉट केले. पण, अॅडमिशन प्रक्रिया मधेच थांबवून नंतर ती रद्द केली. त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांचा हिरमोड झाला.

अनेक विद्यार्थ्यांनी यावर संताप व्यक्त केला. सोशल मीडियाचत्या माध्यमातून विद्यार्थी त्यांचा हो रोष व्यक्त करत आहेत. याला कोण जबाबदार आहे, असा सवाल आता विद्यार्थी उपस्थित करत आहेत. अनेक विद्यार्थ्यांनी हातातली नोकरी सोडून या परिक्षेसाठी तयारी केली. आता त्यांच्या भविष्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे.

C-DAC Announced Fresh C-CAT

C-DAC Announced Fresh C-CAT

कधी कधी झाली परीक्षा, कधी रद्द झाली?

? 10 जानेवारी – या तारखेला पहिली परीक्षा झाली. पण, ही परीक्षा रद्द करण्यात आली. C-DAC मध्ये काही तांत्रिक अडचणींमुळे, तसेच काही तांत्रिक अडचणींमुळे जे विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकले नाही, त्यासाठी ही परीक्षा रद्द करण्यात आली आणि परीक्षा पुन्हा घेण्यात आली. ज्यांनी ही परीक्षा दिलीये त्यांनाही ती परत द्यावी लागली.

? 17 जानेवारी – या तारखेला पुन्हा परीक्षा झाली. तेव्हा पुन्हा काही 20-30 टक्के विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचण निर्माण झाली, त्यामुळे पुन्हा परीक्षा रद्द करुन दुसरी तारीख देण्यात आली.

? 31 जानेवारी – या तारखेला तिसरी परीक्षा झाली. यावेळी सर्व विद्यार्थ्यांना ही परीक्षा द्यावी लागली. ज्यांना 10 आणि 17 जानेवारीला तांत्रिक अडचण आलेली त्यांनाही आणि ज्यांना काहीही अडचण नव्हती, ज्यांनी परीक्षा दिली त्यांनाही. तरीही पुन्हा काही कारणास्तव ही परीक्षा देखील रद्द करण्यात आली आणि पुढील तारीख देण्यात आली.

? 3 फेब्रुवारी – या तारखेला चौथी परीक्षा झाली.

? 5 फेब्रुवारी – रँक जाहीर करण्यात आले (C-DAC Announced Fresh C-CAT After Taking Four Tests)

? 9 फेब्रुवारी – कुठलं कॉलेज हवं ते भरण्याची शेवटची तारीख (College Allotment List)

? 10 फेब्रुवारी – शेवटची तारीख पुढे ढकलली

? 11 फेब्रुवारी – अलॉटमेंट जाहीर करण्यात आलं म्हणजेच कोणाला कुठलं कॉलेज मिळालं ते जाहीर करण्यात आलं

? 13 फेब्रुवारी – सर्व रँक रद्द करण्यात आले आणि पुन्हा परीक्षा घेण्यात येईल असं सांगण्यात आलं.

या परीक्षेला 1200 विद्यार्थी बसले होते आणि यापैकी काहींनी चार वेळा तर काहींनी तीन वेळा ही परीक्षा दिली. आता पाचव्यांदा ही परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

C-DAC Announced Fresh C-CAT After Taking Four Tests

संबंधित बातम्या :

पुणे विद्यापीठाच्या तारखा ठरल्या, लगबग झाली, विद्यार्थ्यांनो परीक्षा देण्याची वेळ आली…!

ICAI CA Result 2020: सीए परीक्षेचा निकाल जाहीर, मोबाईलवर असा पाहा निकाल

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.