Car accident : पुणे -सातारा महामार्गावर कारचा अपघात; सुदैवानं जीवितहानी टळली

पुणे (pune) - सातारा (satara) महामार्गावर कारचा भीषण अपघात (Car accident) झाल्याची घटना समोर आली आहे. तीव्र उतार आणि पाऊस यामुळे चालकाला अंदाज न आल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले

Car accident : पुणे -सातारा महामार्गावर कारचा अपघात; सुदैवानं जीवितहानी टळली
अजय देशपांडे

|

Jul 19, 2022 | 1:15 PM

पुणे : पुणे (pune) – सातारा (satara) महामार्गावर कारचा भीषण अपघात (Car accident) झाल्याची घटना समोर आली आहे. तीव्र उतार आणि पाऊस  यामुळे चालकाला अंदाज न आल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार रस्त्याच्या कडेला असलेल्या चारीत जाऊन पलटी झाली. पुणे-सातारा महामार्गावरील हरिश्चंद्री गावाच्या परिसरात हा अपघात घडला. या अपघातात वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र सुदैवाने कुठलीही जीवितहानी झालेली नाही. सध्या राज्याच्या विविध भागांत मुसळधार पाऊस कोसळत आहे. पावसामुळे रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. रस्त्यावर पाणी साचल्याने खड्ड्यांचा अंदाज येत नाही. या रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघाताला अमंत्रण मिळत आहे. असाच एक अपघात पुणे -सातारा महामार्गावर घडला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही कार चारीमध्ये पलटी झाली.

वाहनाचे नुकसान

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, पुणे -सातारा महामार्गावर असलेल्या हरिश्चंद्री गावाच्या परिसरात हा अपघात झाला. तीव्र उताराचा रस्ता आणि पाऊस यामुळे चालकाला रस्त्याचा अंदाज आला नाही. नियंत्रण सुटल्याने ही कार रस्त्याच्या कडेला असलेल्या चरामध्ये जाऊन पलटी झाली. सुदैवाने या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.  ही कार पुण्याहून साताऱ्यांच्या दिशेने जात होती. याचदरम्यान हरिश्चंद्री गावाच्या परिसरात हा अपघात झालाय. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे.

हे सुद्धा वाचा

पावसामुळे अपघातांचे प्रमाण वाढले

अनेक रस्त्यांना खड्डे पडले आहेत. सध्या राज्यभरात पाऊस सुरू आहे. पावसामुळे रस्त्यावर आणि खड्ड्यात पाणी साचते. अनेकदा वाहनाचा वेग जादा असल्याने खड्ड्यांचा अंदाज येत नाही. गाडी खड्ड्यात गेल्याने वाहनावरील नियंत्रण सुटते आणि  अपघात होतात. तसेच पावसामुळे रस्त्यांवर चिखल साचल्याने दुचाकी स्लीप होण्याच्या घटनांमध्ये देखील वाढ झाली आहे. पावसाळ्यात वेगावर नियंत्रण ठेवून गाडी चालवल्यास असे अपघात टळू शकतात.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें