AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : “Who is Dhangekar?”, चंद्रकांत पाटील यांचा ‘तो’ जुना व्हिडीओ होतोय जोरदार व्हायरल

Who is Dhngekar? असं टोला मारणाऱ्या पाटील यांना धंगेकर यांच्या कार्यकर्त्यांनी व्हिडीओ आणि बॅनरमधून चद्रकांत पाटील यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

Video : Who is Dhangekar?, चंद्रकांत पाटील यांचा 'तो' जुना व्हिडीओ होतोय जोरदार व्हायरल
| Updated on: Mar 03, 2023 | 5:04 PM
Share

पुणे : पुण्यातील पोटनिवडणुकीचा निकाल लागल्यावर राज्यातील सत्ताधारी भाजपला मोठा धक्का बसला आहे. जवळपास 28 वर्षे बालेकिल्ला राहिलेल्या कसबा मतदारसंघ काँग्रेसने काबिज केला आहे. या निवडणुकीच्या प्रचारामध्ये शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्रीही उतरले होते. मात्र रविंद्र धंगेकर यांनी 11 हजारापेक्षा जास्त मतांनी विजय मिळवत इतिहास रचला. अशातच भाजपचे नेते आणि आमदार चंद्रकांत पाटील यांचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये नेटकऱ्यांकडून चंद्रकांत पाटलांना ट्रोल करण्यात येत आहे.

हा व्हायरल होत असलेला व्हिडिओ निवडणुकीच्या अगोदरचा आहे. चंद्रकांत पाटील हेमंत रासने यांच्या प्रचारावेळी बोलत आहेत की, Who is Dhngekar? म्हणजे कोण आहेत धंगेकर असं बोलणाऱ्या पाटील यांना मतदारांनी धंगेकर कोण आहेत हे दाखवून दिलं आहे.

रविंद्र धंगेकर यांच्या कार्यकर्त्यांनी बॅनरबाजी करत चंद्रकांत पाटील यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. पब्लिक की डिमांड थी… तो भाऊ को आना पडा.. साऱ्या पुण्यात इतिहास घडला पायरी यशाची एक एक चढला विरोधकांचा धुरळा उडला बघा कार्याचा प्रकाश पडला आला आला आला रवींद्र धंगेकर आला…, अशा मीम्सचा देखील सोशल मीडियावर वर्षाव होताना दिसतोय.

सभेमध्ये पाटील बोलून गेले की बोलून गेले की धंगेकर कोण आहेत? मात्र रविंद्र धंगेकर यांनी विजय मिळवत इतिहास रचलाय. रविंद्र धंगेकर यांच्या विजयानंतर त्यांच्या समर्थकांनी व्हिडीओ तयार केला आहे. ज्यामध्ये पाटलांचा सभेतील, Who is Dhngekar असं विचारतानाची क्लिप त्यानंतर गाणी लावत व्हिडीओ एडिट केला आहे. सोशल मीडियावर हे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर केले जात आहेत. अनेकांनी हा व्हिडीओ व्हाट्सअॅप स्टेटसला ठेवला आहे.

रविंद्र धंगेकर यांच्या विजयावर चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया-

कसबा विधानसभा पोटनिवडणुकीतील‌ जनतेचा कौल आम्ही नम्रपणे स्विकारतो. लोकशाहीत जनमताचा निर्णय सर्वोच्च आहे. कसब्याच्या विकासासाठी आम्ही नेहमीच कटिबद्ध आहोत. या निवडणुकीत सर्वस्व झोकून काम करणाऱ्या महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून आभार. नव्याने उभे राहू, पुन्हा कमळ फुलवू!

CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.