AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

छगन भुजबळ यांचा मनोज जरांगे पाटील यांना थेट इशारा; यापुढे दादागिरी केली तर, दादागिरीनेच…

राहत्याला पिंपरी निर्मळमध्ये एका गावात दोन दलित कुटुंब आहे. कुणी तरी घोरपडे आहे. त्याला मतदान केलं नाही दलित कुटुंबावर हल्ला चढवला. लहान मुलीला दगडावर फेकलं. 71 लोकांवर केस घेतली. कालपर्यंत तरी कुणाला अटक नाही. हे काय चाललं आहे? नाभिक समाजावरही मतदान केलं नाही म्हणून तुळशी गावात हल्ला करण्यात आला. डॉ. यादव आले. फलटणला त्यांचं हॉस्पिटल होतं. त्यांच्या रुग्णालयाची तोडफोड करण्यात आली आहे. हे काय चाललंय? राज्यात कायदा आणि सुव्यवस्था आहे की नाही? कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी कुणाची?

छगन भुजबळ यांचा मनोज जरांगे पाटील यांना थेट इशारा; यापुढे दादागिरी केली तर, दादागिरीनेच...
chhagan bhujbal in obc rally indapurImage Credit source: TV9MARATHI
| Updated on: Dec 09, 2023 | 5:30 PM
Share

इंदापूर | 9 डिसेंबर 2023 : राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांची तोफ पुन्हा एकदा धडाडली आहे. छगन भुजबळ यांनी ओबीसीच्या मेळाव्यातून मनोज जरांगे पाटील यांच्यावर घणाघाती हल्ला चढवला. यापुढे तुम्ही दादागिरी केली तर आम्ही तुला दादागिरीनेच उत्तर देऊ, असा इशाराच छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांनी दिला. तसेच यावेळी भुजबळ यांनी पोलिसांनाही सावध राहण्याचा सल्ला दिला. तुम्ही कारवाई का करत नाही. उद्या प्रकरण हाताबाहेर गेलं तर तुम्ही हातात बंदुका घेऊन उभं राहणार आहात का?, असा सवाल छगन भुजबळ यांनी केला.

इंदापूरमध्ये ओबीसी एल्गार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. मी काही बोललो तर अनेक विचारवंत बोलायला लागतात. महाराष्ट्रात अशांततेचं वातावरण पसवरलं जातं. दोन जातीत भांडणं लावली जात असल्याचं सांगितलं जातं. ते जरांगे 15 दिवस फिरत आहेत. सकाळपासून त्याची मिटिंग सुरू होते. आपली मिटिंग रात्री 10 वाजता बंद होते. त्यांची मिटिंग रात्री 12 ला, रात्री 1 ला, रात्री दोनला. त्यांना परवानगी आहे की नाही माहीत नाही. पोलीसही कारवाई करत नाही. ते म्हणेल तो कायदा. कायदा फक्त तुम्हाला आणि आम्हाला? त्यांनी काही बोललं तरी त्याच्या बातम्या येणार. आपण गप्प बसणार. 15 दिवसाने बोललं तर लगेच सुरू. महाराष्ट्रात अशांतता निर्माण करण्याचं काम सुरू असल्याचं म्हटलं जातं. मी फक्त 15 दिवसाने बोलतो. पण एक सौ सुनार की एक लोहार की. त्यामुळे थोडं बोलावं लागतं. सर्वच ऐकून घेण्याची सवय आम्हाला नाही. इथे कुणालाच नाही, असं छगन भुजबळ म्हणाले.

नंतर बोलू नका, मग…

मला सांगा या राज्यात अशांतता कोण माजवतंय? आम्ही माजवतोय? छगन भुजबळ म्हणाले का तलवारी घेऊ, कुऱ्हाडी घेऊ? ते यवतमाळला म्हणाले. 24 तारखे नंतर तुझा हिशोब करतो. तुला दाखवतो असं ते म्हणाले. काय चाललंय? मराठा समाजाला विरोध नाही. आमचा विरोध दादागिरी आणि झुंडशाहीला आहे. दादागिरी सुरू राहिली तर दादागिरीला दादागिरीनेच उत्तर देऊ. आमच्यावर जबाबदारी आहे. नंतर बोलू नका अशांतता पसरवली. त्यांना सांगा बोलताना नीट बोला. पोलिसांवरील हल्ले थांबवा, असा इशाराच छगन भुजबळ यांनी दिला.

अशांतता निर्माण करतंय कोण?

राज्यात अशांतता करतंय कोण? राज्यात शांतता असेल तर उद्योग धंदे येतील, बेरोजगारी दूर होईल. राज्यातील उद्योगधंदा वाढेल हे मान्य. पण अशांतता निर्माण करतं कोण? याचा विचार करण्याची गरज आहे, असं छगन भुजबळ म्हणाले.

तेव्हा काहीच करू शकणार नाही

पोलिसांना सांगायचं तुम्ही वेळेवर ॲक्शन घेतली नाही तर पुढे तुम्ही काहीच करू शकणार नाही. ते अशांतता माजवतील. तेव्हा तुम्ही काय करणार? केवळ रिव्हॉल्वर घेऊन तुम्ही उभे राहणार का?, असा सवाल त्यांनी पोलिसांना केला.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.