Neelam Gorh |’मुख्यमंत्री ऑन फिल्डच; ज्यांनी डोळ्यावर पट्टी बांधलीये त्याला काय करावं- नीलम गोऱ्हे

कोरोना व ओमिक्रॉन वाढत्या रुग्णसंख्येचा लहान मुलांनाही धोका वाढला असल्याने शाळा बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागला. त्यामुळे शाळा सुरू करण्यासाठी सरकारवर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष दबाव आणू नये. मुलं बाधित झाली तर त्यांच्या जीवाला त्रास होईल आणखी मुल बाधित होतील, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.

Neelam Gorh |'मुख्यमंत्री ऑन फिल्डच; ज्यांनी डोळ्यावर पट्टी बांधलीये त्याला काय करावं- नीलम गोऱ्हे
Neelam Gorhe

पुणे – महाविकास आघाडीचे सरकारं हे गेंड्याच्या कातडीच सरकार आहे अशी टीका भाजप आमदार चंद्रकांत पाटील(Chandrakant patil) यांनी केली होती. त्यांच्या टीकेला  निलम गोऱ्हेंने(Neelam Gorhe) प्रत्युत्तर दिले आहे. ‘मुख्यमंत्री ऑन फिल्डच आहेत,(CM on the field) ज्यांनी डोळ्यावर पट्टी बांधलीये त्याला काय करावं. जनतेच्या मनात . मुख्यमंत्री जोडले गेलेत. विरोधकांची दृष्टी अधू झालीये. चंद्रकांत दादांना एखादं उपमाचं पुस्तक आणून द्यावं असे निलम गोऱ्हेंने म्हटले आहे.

गड- किल्ल्यांवर पुजास्थान विकसित करणार

शिवशाही बाबासाहेब पुरंदरे यांच्या मृत्यूपूर्वी गडकिल्ल्यांवरील मंदिर विकसित करण्याचं मागणी केली होती. त्यानुसार राज्यातील प्रत्येक गडकिल्ल्यांवर देवळं ,पुजास्थान विकसित करण्याची मागणी करणारअसल्याची माहिती त्यांनी दिली आहे. येत्या दिवसात यादी तयार करण्याचे आदेश इतिहास तज्ञांना दिले असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. गडकिल्ल्यांबरोबरचं मंदिराचाही विकास राज्य सरकार करेल अशी माहिती त्यांनी दिली आहे.

शाळा सुरु करण्याचा आग्रह करू नये कोरोनामुळे शहरातील शाळा बंद करण्यात आल्याने विरोधकांनी सरकारवर टीका केला आहे. गोऱ्हे लहान मुलांच्या शाळा सुरु करण्याचा आग्रह धरू नका असे म्हटले आहे. कोरोना व ओमिक्रॉन वाढत्या रुग्णसंख्येचा लहान मुलांनाही धोका वाढला असल्याने शाळा बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागला. काही गोष्टी नाविलाजाने सरकारला कराव्या लागल्यात. त्यामुळे शाळा सुरू करण्यासाठी सरकारवर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष दबाव आणू नये. मुलं बाधित झाली तर त्यांच्या जीवाला त्रास होईल आणखी मुल बाधित होतील, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. त्यामुळं माझ पालक संघटना यांना आवाहन आहे, की त्यांनी शाळा सुरु करण्याचा आग्रह करू नये असे त्यांनी केलं आहे.

Rabi Season : शेतकऱ्यांनी पीक पध्दतीमध्ये बदल केला पण मुख्य पिकालाच फटका बसला

Molnupiravir | कोरोनावरील उपचारासाठी मोलनुपिरावीर नको; परिणामकारक नाही उलट तिचे दुष्परिणाम?

Grape Growers Association: निर्णय झाला- आता माघार नाही, सोलापूर विभागातही ठरले द्राक्षांचे दर

Published On - 2:10 pm, Wed, 12 January 22

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI