राज्यातील विरोधी पक्ष कोणता? प्रकाश आंबेडकरांनी राष्ट्रवादी आणि उद्धव सेनेची हवाच काढली, उत्तराने मोठी खळबळ? महाविकास आघाडीला तडा?

Prakash Ambedkar on Congress: अवघ्या एका वर्षापूर्वी सत्तेच्या स्पर्धेत असलेल्या महाविकास आघाडीच्या अस्तित्वावरच मध्यंतरी अनेकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले. महापालिका निवडणूक असो की जिल्हा परिषद निवडणूक असो तणाव दिसून आला. विधानसभा निवडणुकीत तर ही बाब प्रकर्षाने समोर आली. आता वंचित प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्या वक्तव्याने मोठी खळबळ उडाली आहे.

राज्यातील विरोधी पक्ष कोणता? प्रकाश आंबेडकरांनी राष्ट्रवादी आणि उद्धव सेनेची हवाच काढली, उत्तराने मोठी खळबळ? महाविकास आघाडीला तडा?
प्रकाश आंबेडकर
Image Credit source: गुगल
| Updated on: Apr 03, 2026 | 1:23 PM

Prakash Ambedkar on Congress: सत्ता समीकरणात अचानक पुढे आलेल्या महाविकास आघाडीचा गेल्या दोन वर्षातील जोर अचानक कमी झाल्याचे चित्र आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्ष त्यांच्या स्तरावर जो काय विरोधी दाखवायचा तो दाखवत आहेत. महाविकास आघाडीतील घटक पक्षातही अनेकदा रस्सीखेच दिसली. तरीही राज्यसभा निवडणुकीत तीनही घटक पक्षांनी एकजुटता दाखवली. विधान परिषद निवडणुकीतही सामोपचाराने तोडगा काढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे राज्यातील विधीमंडळात अजूनही अधिकृत विरोधी पक्ष नेता नाही.  त्यातच उद्धव सेना आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला वंचित प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी अनुलेखाने मारले आहे. राज्यात विरोधी पक्ष हा काँग्रेस आणि काही प्रमाणात आमचा पक्ष राहिलेला आहे, असा दावा आंबेडकरांनी केला आहे. त्यामुळे राज्यात कोण प्रमुख विरोधी पक्ष आहे हे याची नव्याने चर्चा त्यांनी घडवून आणली आहे. विशेष म्हणजे बारामती आणि राहुरी या पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसने फिल्डिंग लावली आहे आणि त्यांना वंचितने पाठिंबा दिला आहे. आंबेडकरांनी यापूर्वी काँग्रेसवर चांगलेच तोंडसुख घेतले होते. तेच आता काँग्रेसला विरोधी पक्षाच्या भूमिकेत पुढे आणत असल्याने पडद्यामागे काय घडामोड सुरू आहे, याकडे सगळ्यांचं लक्ष लागले आहे.

विधानसभा निवडणुकीत घोटाळा

प्रकाश आंबेडकर यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली. भाजपमधील नेत्यांनी त्याच्या त्याच्या नेत्याची भिंग फोडण्याचे काम सुरू केले आहे. निर्मला सीतारामन यांची पती प्रभाकरन यांनी आंध्र प्रदेश मधील निवडणुकीमध्ये 5% मताची वाढ करण्यात आल्याचे सागितले त्याच्याशी आम्ही सहमत आहोत. २०२४ मध्ये आंध्रप्रदेशमध्ये ५ टक्के रात्री ११ ते २ च्या दरम्यान टाकण्यात आले आहे, ही विधान गांभीर्य पूर्वक पाहिलं पाहिजे. आंध्रप्रदेशमध्ये सरकार त्यामुळे आलं असं दिसत आहे. त्याचा फायदा चंद्राबाबूंना झाला. त्यामुळे नायडू शांत बसले आहेत, हा फ्रॉड महाराष्ट्रमध्ये झालेल्या सारखाच आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना फटका?

व्होट चोरीविरोधात राहुल गांधी आंदोलन करत आहेत. बरोबर आहे, पण व्होट कापली, तर त्यांनी कापलेली नावे दाखवून द्यायला हवी होती. राहुल गांधी किंवा खर्गे यांनी गांभीर्याने विचार करायला हवा.-राज्याच्या विधानसभा आलेले बहुमत चुकीची आहे. जो प्रकार घडला निवडणुकीत तो कोर्टाने निवडणूक आयोगाला सांगायला हवं होते. राहुल गांधी यांनी एक मेळावा घेऊन ज्याची नावे वगळली हे दाखवले असते तर निवडणूक आयोग फ्रॉड करत दाखवते आले असते. महाराष्ट्रमधील २ कोटी ९० मतदार कमी होणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मतदार संघातील २ लाख आणि त्याचे आमदार असलेले ठिकाणी ३० हजार मतदार कमी होतील. निवडणूक आयोगाचा एसआयआर हा सर्वात मोठा भ्रष्टाचार आहे, यात सुप्रीम कोर्ट पण अडकले आहे, असा गंभीर आरोप प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.

एपस्टीन फाईल बाहेर आले तर काय होईल? सुब्रमण्यम स्वामी यांनीच भाजपमधील चाललेली परिस्थिती बाहेर आणली आहे. माझं मध्यमवर्ग यांना एक सांगणं आहे ही परिस्थिती तुमच्या दरवाजापर्यंत येईल याची वाट पाहू नका रस्त्यावर या असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले.

Follow Us