AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोदींना घालण्यात येणाऱ्या फेट्यात छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा, काँग्रेसचा फेट्याला विरोध

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे मेट्रोच्या उद्घाटनाला येत असून मोदींच्या या दौऱ्यात वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. पुणे दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महापालिकेकडून विशेष सत्कार करण्यात येणार आहे. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पंतप्रधानांच्या स्वागतासाठी खास फेटा तयार करून घेतला आहे.

मोदींना घालण्यात येणाऱ्या फेट्यात छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा, काँग्रेसचा फेट्याला विरोध
PM Narendra ModiImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Mar 06, 2022 | 8:03 AM
Share

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi) पुणे मेट्रोच्या उद्घाटनाला (pune metro) येत असून मोदींच्या या दौऱ्यात वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. पुणे दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महापालिकेकडून (pune corporation) विशेष सत्कार करण्यात येणार आहे. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पंतप्रधानांच्या स्वागतासाठी खास फेटा तयार करून घेतला आहे. पण त्या फेट्यामध्ये महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेचा वापर करण्यात आलेला आहे. त्याला काँग्रेसने विरोध केला आहे. राजमुद्रा ही महाराष्ट्राची अस्मिता आहे. त्याचा कुठेही वापर करणं योग्य नाही, असं सांगत याप्रकारातून मोदी हे छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा मोठे असल्याचं दाखवण्याचा प्रकार होत आहे, असं काँग्रेसने म्हटलं आहे. मोदींना हा फेटा घालण्यात येऊ नये, असं आवाहनही काँग्रेसने केलं आहे.

काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी हा विरोध दर्शविला आहे. राजमुद्रा ही महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतिक असून, महाराष्ट्राचा मानबिंदू आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा भाजपतर्फे सातत्याने अपमान सुरु आहे. राजमुद्रा असलेला फेटा वापरून भाजपने हेतुपुरस्सर या अपमानाची मालिका सुरु ठेवल्याचे दिसते. पंतप्रधान मोदी यांना छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा मोठे करण्याचा हा प्रकार निषेधार्ह असून काँग्रेसचा फेट्यावर राजमुद्रा वापरण्यास विरोध आहे. तरी सदरचा फेटा घालण्यात येऊ नये, अशी मागणी मोहन जोशी यांनी केली आहे.

मोदींच्या हस्ते मेट्रोचं लोकार्पण

पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी 10 वाजून 30 मिनिटांनी पुणे येथील विमानतळावर पोहचतील. तिथं त्यांचा स्वागत समारंभ झाल्यानंतर ते पुणे महानगरपालिकेत उभारण्यातआलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यासाठी 11 वाजता पोहोचतील. त्यानंतर 11.30 वाजता पुणे मेट्रोचं उद्घाटन करून ते गरवारे स्टेशन पासून मेट्रोने प्रवास करणार आहेत. एमआयटी कॉलेजमध्ये विविध विकास योजनांचं उद्घाटन झाल्यानंतर तिथं त्यांची जाहीर सभा देखील होणार आहे. सभा संपल्यानंतर आर के लक्ष्मण गॅलरीचं उद्घाटन ते दीड वाजता करतील. त्यानंतर तीन वाजता ते पुण्यातून रवाना होतील अशी माहिती प्राथमिक माहिती आहे.

असा असेल मोदींचा दौरा

  1. सकाळी 10 वाजून 25 मिनीटांनी मोदींचं पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन
  2. त्यानंतर एमआय 17 या हेलिकॉप्टरनं शिवाजीनगरच्या कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर आगमन
  3. 11 वाजता महापालिकेत आगमन होईल आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं उद्घाटन करतील
  4. 11 वाजून 15 मिनीटांनी ते गरवारे महाविद्यालय येथे मेट्रो उद्घाटनासाठी पोहोचतील
  5. उद्घाटन करून 11 वाजून 55 मिनिटांनी मेट्रो प्रवास करून आनंदनगर मेट्रो स्टेशनवर उतरतील. त्यानंतर एम आयटीला जातील
  6. 12 ते 1 विविध विकासकामांच ते उद्घाटन करतील आणि सभेला संबंधित करतील
  7. 1 वाजून 35 मिनिटांनी ते हेलिकॉप्टरनं सिम्बायोसिस महाविद्यालय लवळे इथे जातील आणि त्यानंतर महाविद्यालयाच्या कार्यक्रमाला हजेरी लावतील
  8. 2 वाजून 55 मिनीटांनी हेलिकॉप्टरनं विमानतळावर आगमन होईल
  9. 3 वाजून 25 मिनीटांनी विमानानं दिल्लीला रवाना होतील

संबंधित बातम्या:

Modi In Pune: पुणेकरांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक, पंतप्रधान नरेंद्र मोदी पाच तास पुण्यात, संपूर्ण कार्यक्रम एका क्लिकवर

Video: पवार म्हणाले राणेंनाही अटक झाली होती, 9 तासाच्या चौकशीनंतर नारायण राणेंनी पवारांना आठवणीनं उत्तर दिलं

PM Modi In Pune: पुण्यात पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी ना मुख्यमंत्री ना आदित्य ठाकरे, सुभाष देसाई हजेरी लावणार, कारण काय?

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.