पुणेकरांना दिलासा: ऐन दिवाळीतही शहरातील हवेची गुणवत्ता ‘समाधानकारक’

दिवाळीतील फटक्यांच्या आतिषबाजीनंतरही हवेची गुणवत्ता समाधानकारक राहण्याचं मुख्यकारण म्हणजे रस्त्यावरील वाहनांची घटलेली संख्या होय. सणांमुळं असलेल्या सुट्यांमुळं रस्त्यावर वाहनांची वर्दळ कमी राहिली. याचा परिणाम हवेच्या गुणवत्तेवर झाला असल्याची माहिती हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे

पुणेकरांना दिलासा: ऐन दिवाळीतही शहरातील हवेची गुणवत्ता 'समाधानकारक'
firecrackers
Follow us
| Updated on: Nov 05, 2021 | 7:50 PM

पुणे- महाराष्ट्राची राजधानी मुंबईतील हवेची गुणवत्ता ढासळली असताना दुसरीकडे पुण्यातील हवेची गुणवत्ता मात्र ‘समाधानकारक’ स्थितीत असल्याचे आढळून आले आहे. भारतीय हवामान विभागाच्या (IMD) ‘हवा गुणवत्ता आणि हवामान अंदाज आणि संशोधन प्रणाली’ (IIMD) ने हा डेटा प्रसिद्ध केला आहे. यानुसार शहरातील हवेचा सरासरी गुणवत्ता निर्देशांक 87 वर होता. “समाधानकारक” श्रेणीत आढळून आला आहे.

दिवाळीतील फटक्यांच्या आतिषबाजीनंतरही हवेची गुणवत्ता समाधानकारक राहण्याचं मुख्यकारण म्हणजे रस्त्यावरील वाहनांची घटलेली संख्या होय. सणांमुळं असलेल्या सुट्यांमुळं रस्त्यावर वाहनांची वर्दळ कमी राहिली. याचा परिणाम हवेच्या गुणवत्तेवर झाला असल्याची माहिती हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. गुरुवारी रात्री(9वाजेपर्यंत) हवेतील पीएमचे प्रमाण 2.5 एवढं आढळून आला.

मुंबईमध्ये हवेची स्थिती अतिवाईट होण्याची शक्यता गुरुवारी मुंबईमध्ये हवेच्या प्रदूषणाची पातळी मध्यम स्वरूपाची होती. हवेचा सरासरी गुणवत्ता निर्देशांक 162 होता. तर, शुक्रवारी मात्र ही हवा अतिवाईट स्वरूपाची होऊ शकते, असा इशारा देण्यात आला आहे. हवेतील पीएम 2.5 चे प्रमाण वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याचा सर्वाधिक परिणाम कुलाबा, माझगाव येथे दिसतोय. या खालोखाल वरळी, वांद्रे-कुर्ला संकुल, चेंबूर आणि मालाड येथे हवेची गुणवत्ता खालावू शकते, असं भाकित वर्तवण्यात आलं आहे.

नेरुळची हवा अतिधोकादयक आहे, तेथील एअर क्वालिटी इंडेक्स 316 वर पोहोचलाय. बोरीवलीत एक्युआय 153 वर आहे. मुंबईतील अनेक भागात सध्या धुरकट वातावरण निर्माण झालंय. सध्या हवामान बदलाने नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. उष्ण-दमट हवामान, पावसाळा यामुळे हवा दूषित होत श्वसनाचे विकारही जडत आहेत. महापालिका या आजारांना अटकाव करण्यासाठी काय करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

इतर बातम्या:

प्रसिध्द देवगड हापूस आंब्याची पहिली पेटी पुण्यात दाखल; इतकी आहे किंमत?

किरण गोसावीच्या कोठडीत 8 नोव्हेंबरपर्यंत वाढ, कोर्टाचा दिलासा नाहीच

अनिल देशमुखांच्या मुलाला अटकेची भीती; कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करणार

Non Stop LIVE Update
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा.
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन.
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही.
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा.
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन.
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार.
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?.
पत्रकार परिषदेत डुलकी,गोऱ्हेंनी जरा उठा...म्हणताच प्रवक्ते खजबडून जागे
पत्रकार परिषदेत डुलकी,गोऱ्हेंनी जरा उठा...म्हणताच प्रवक्ते खजबडून जागे.
आता उशीर झालाय, ठाकरेंना दिल्लीतून सांगितले; शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट
आता उशीर झालाय, ठाकरेंना दिल्लीतून सांगितले; शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट.