SPPU online exam | कॉपी बहाद्दरांना बसणार वचक !आता ऑनलाईन परीक्षेतही विद्यार्थ्यांवर राहणार वॉच; पारदर्शी परीक्षेसाठी विद्यापीठ राबवणार हे व्यवस्थापन

यंदात त्यात आणखी कडक नियम लागू करण्यात येणार असून परीक्षेच्या दरम्यान विद्यार्थ्यांच्या स्क्रीनचे रेकॉर्डिंग केले जाणार आहे . एखादा विद्यार्थी परीक्षा देताना बोलताना आढळल्यास तसेच स्क्रीन सोडून बाहेर जात असतील तर त्यांना परीक्षेतून बाद करण्यात येणार आहे. परीक्षा अधिक पारदर्शक पद्धतीने व्हाव्यात ही प्रक्रिया राबवली जाणार.

SPPU online exam | कॉपी बहाद्दरांना बसणार वचक !आता ऑनलाईन परीक्षेतही विद्यार्थ्यांवर राहणार वॉच; पारदर्शी परीक्षेसाठी विद्यापीठ राबवणार हे व्यवस्थापन
SPPU -Pune
Follow us
| Updated on: Jan 29, 2022 | 11:14 AM

प्राजक्ता ढेकळे , पुणे – कोरोना काळात सुरु झालेल्या ऑनलाईन परीक्षा (Online exam)पद्धती सुरु झाली. मात्र या परीक्षा पद्धतीचा गैरफायदा घेत कॉपी बहाद्दरांचे स्तोम माजले. या कॉपी बहाद्दरांना आळा घालण्यासाठी आता त्यांच्यावर वॉच ठेवण्याचा निर्णय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ(Savitribai Phule Pune University)प्रशासनाने घेतला आहे. यासाठी परीक्षेदरम्यानची व्यवस्था सक्षम करण्यात येणार असल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाने दिली आहे. यंदा ऑनलाईन परीक्षेच्या दरम्यान विद्यार्थ्यांच्या स्क्रीनचे व्हिडीओ व ऑडिओ रेकॉर्डिंगही केले जाणार आहे. यावेळी विद्यार्थ्यांनी(students ) कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार करताना आढळल्यास त्याच्यावर कडक करावाई केली जाणार असल्याची माहिती विद्यापीठाने दिली आहे.

परीक्षा पारदर्शक होण्यासाठी प्रयत्न येत्या 15  फेब्रुवारीपासून विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाईन होणार आहेत. या परीक्षांमध्ये बहुपर्यायी (एमसीक्यू) पद्धतीच्या असणार आहेत.गतवर्षी झालेल्या परीक्षेमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी गैरप्रकार केल्याचे समोर आले आहे. त्यानंतर विद्यापीठाने प्रॉक्टर्ड पद्धतीने परीक्षा घ्यायला सुरुवात केली. यंदात त्यात आणखी कडक नियम लागू करण्यात येणार असून परीक्षेच्या दरम्यान विद्यार्थ्यांच्या स्क्रीनचे रेकॉर्डिंग केले जाणार आहे . एखादा विद्यार्थी परीक्षा देताना बोलताना आढळल्यास तसेच स्क्रीन सोडून बाहेर जात असतील तर त्यांना परीक्षेतून बाद करण्यात येणार आहे. परीक्षा अधिक पारदर्शक पद्धतीने व्हाव्यात ही प्रक्रिया राबवली जाणारा असल्याची माहिती विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यामापन मंडळाचे संचालक महेश काकडे यांनी सांगितले आहे.

कॉपी बहाद्दरांना बसणार चाप प्रॉक्टर्ड पद्धतीने परीक्षा घेण्याचा अनुभव विभागांना आहे. त्यामुळे विद्यार्थी नेमके कश्या प्रकारे गैरप्रकार शकता याची माहिती तसेच अंदाजही विभागांना आहे. याबाबत सर्व माहिती विभागांना आहे, नेमक्याचा गोष्टीवर परीक्षेच्या दरम्यान याचा गोष्टीवर लक्ष ठेवले जाणारा आहे. त्यामुळे कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगलंच छाप बसणार आहे.

अंध विद्यार्थ्यांसाठी विशेष व्यवस्था

विद्यापीठ व विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या अंध विद्यार्थ्यांनी ऑनलाईन परीक्षा देण्याची मागणी केली तर त्यांच्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आहे. गतवर्षी विद्यापीठाने सहा अंध विद्यार्थ्यांना प्रायोगिक तत्त्वावर परीक्षा राबवली होती. तो प्रयोग यशस्वी झाला आहे.

उभं राहून पाणी पिणाऱ्यांनो, असं करण्याचे गंभीर परिणाम माहीत आहेत का? जाणून घ्या सविस्तर

अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपूरला होण्यावर प्रश्नचिन्ह, विधिमंडळ प्रशासनाने मुख्यमंत्र्यांची मागितली वेळ

महाराष्ट्र मास्क मुक्त होणार का?, मंत्रिमंडळातील बैठकीत नेमकं काय झालं?; अजित पवारांनी दिली माहिती

Non Stop LIVE Update
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.