Dilip Walse Patil| बैलगाडा मालकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेणार; गृहमंत्र्यांचे दिलीप वळसे पाटील यांचे आश्वासन

बैलगाडा मालकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यासाठी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी जिल्हाधिकारी यांना सूचना दिल्या आहेत. तर ज्या पोलिस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल झाले आहेत त्या पोलिस स्टेशमधून पोलिस अधीक्षकांना प्रस्ताव पाठवणे गरजेचे आहे, त्यानंतर संबंधित प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे दाखल करावा लागणार आहे, त्यानंतर गृहमंत्र्यांकडे हा प्रस्ताव जाईल, गृहमंत्री त्याला मान्यता देतील, तो पुढे न्यायालयात दाखल करून मग गुन्हे मागे घेतले जातील.

Dilip Walse Patil|  बैलगाडा मालकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेणार; गृहमंत्र्यांचे दिलीप वळसे पाटील यांचे आश्वासन
बैलगाडा मालकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेणार दिलीप वळसे पाटील Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 27, 2022 | 6:19 PM

पुणे – गेली अनेक वर्षे बंद असलेल्या बैलगाडा शर्यती (Bullock cart race)पुन्हा सुरू झाल्या आहेत, बंदच्या काळात अनेक बैलगाडा मालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. आता तेच दाखल झालेले गुन्हे (crime) मागे घेण्यात येणार असल्याचे थापलिंगच्या यात्रेत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Home Minister Dilip Walse Patil)यांनी सांगितले आहे त्यामुळे बैलगाडा मालकांसाठी ही आनंदाचीच बातमी मानली जात आहे. गेले अनेक वर्षे संघर्ष करत बैलगाडा मालकांनी न्यायालयीन लढाई जिंकली असली तरी बंदच्या काळात अनेक बैलगाडा मालकांवर स्थानिक पोलिस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून दाखल गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन दिले गेले आहे.

बैलगाडा मालकांच्या अपेक्षा वाढल्या

वळसे पाटील यांच्यावर थेट गृहमंत्री पदाची जबाबदारी आली आहे. त्यामुळे बैलगाडा मालकांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. यावेळी तरी दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावे अशी विनंती थापलिंगच्या यात्रेत भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन देवदत्त निकम यांनी केली. त्यानुसार वळसे पाटील यांनी बोलताना बैलगाडा मालकांवरील दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांना दिल्या असल्याचे सांगितले आहे.

गुन्हे मागे घेण्याची काय आहे प्रक्रिया ?

बैलगाडा मालकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यासाठी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी जिल्हाधिकारी यांना सूचना दिल्या आहेत. तर ज्या पोलिस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल झाले आहेत त्या पोलिस स्टेशमधून पोलिस अधीक्षकांना प्रस्ताव पाठवणे गरजेचे आहे, त्यानंतर संबंधित प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे दाखल करावा लागणार आहे, त्यानंतर गृहमंत्र्यांकडे हा प्रस्ताव जाईल, गृहमंत्री त्याला मान्यता देतील, तो पुढे न्यायालयात दाखल करून मग गुन्हे मागे घेतले जातील. अशा प्रकारची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच दाखल झालेले गुन्हे मागे घेतले जातील असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी बोलताना सांगितले.

MI vs DC Kuldeep Yadav: पुरेशी संधी न देताच घरी पाठवलेल्या कुलदीपने आज ‘संपला’ बोलणाऱ्यांची तोंड केली बंद

Pramod Sawant : उद्या गोव्यात शपथविधी, प्रमोद सावंत दुसऱ्यांदा होणार मुख्यमंत्री, नव्या मंत्रिमंडळात कुणाला संधी?

Pune| अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचाराच्या घटना टाळण्यासाठी शालेय शिक्षण विभागाकडून नियमावली जाहीर

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.