AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पिंपरी चिंचवड स्मार्टसिटी प्रकल्पाच्या सर्व्हरवर सायबर अटॅक, हल्लेखोरांकडून बिटकॉईनची मागणी

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या सर्व्हरवर सायबर अटॅक झाल्याची धक्कादायक घटना समोर आलीये. (cyber attack Pimpri Chinchwad Smart City project bitcoin)

पिंपरी चिंचवड स्मार्टसिटी प्रकल्पाच्या सर्व्हरवर सायबर अटॅक, हल्लेखोरांकडून बिटकॉईनची मागणी
प्रातिनिधिक फोटो
| Updated on: Mar 10, 2021 | 5:45 PM
Share

पुणे : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या सर्व्हरवर सायबर अटॅक (cyber attack) झाल्याची धक्कादायक घटना समोर आलीये. विशेष म्हणजे स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या (Pimpri Chinchwad Municipal Corporation Smart City project) सर्व्हरवर सायबर हल्ला केल्यानंतर सव्हर्वरमधील डाटा इन्क्रिप्ट करण्यात आला आहे. हा डेटा परत हवा असल्याच पैशांची मागणी करण्यात आलीये. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात करण्यात आला असून पोलिसांनी चौकशी सुरु केली आहे. (cyber attack on the server of Pimpri Chinchwad Municipal Corporation Smart City project cyber attacker demands bitcoin)

सर्व्हरवर सायबर हल्ला, बिटकॉईनची मागणी 

मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्मार्टसिटी उपक्रमांतर्गत डाटा सेंटर उभारणीचं काम खासगी संस्थांना देण्यात आले आहे. मात्र हे काम चालू असताना परदेशातून सर्व्हरवर सायबर हल्ला करण्यात आल्याचे उघड झाले. तसेच या सायबर हल्ल्यामध्ये स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या सर्व्हरमधील सर्व डाटा इन्क्रिप्ट करण्यात आलाय. विशेष म्हणजेच इन्क्रिप्ट केलेला परत घेण्यासाठी अज्ञाताने पैशांची मागणी केली आहे. ही रक्कम बिटकॉईनच्या स्वरूपात देण्याची अटही अज्ञाताने घातली आहे.

पुण्यात 2018 साली बँकेवर सायबर हल्ला, 94 कोटींची लूट

सायबर हल्ल्याची पुण्यातील ही पहिलीच घटना नाही. याआधी पुण्यातील कॉसमॉस बॅंकेवर 11 आणि 13 ऑगस्ट 2018 रोजी सायबर हल्ला  झाला होता. या प्रकरणी प्रमुख आरोपीला यूएई पोलिसांनी 6 मार्च रोजी अटक केली होती. या हल्ल्यात तब्बल 94 कोटी रुपये लुटण्यात आले होते. या प्रकरणातील तीन  प्रमुख आरोपींपैकी एकाला यूएईमध्ये बेड्या ठोकण्यात आल्या होत्या. 28 वर्षीय आरोपी सुमेर शेख असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे.

मुंबईच्या पॉवरकट मागे, चीनचा सायबर हल्ला

12 ऑक्टोबर 2020 मध्ये देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील बहुतांश भागात अचानक वीज गेली होती. त्यामुळे सर्वसामान्य मुंबईकरांना नाहक त्रासाला सामोरं जावं लागलं होतं. वीज पुरवठा अचानक खंडित झाल्याने त्याचा परिणाम मुंबईच्या लोकलवरही झाला होता. मात्र, मुंबईची बत्ती गुल करण्यामागे चीनचा हात असल्याचे समोर आले आहे. त्याला राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख आणि उर्जामंत्री नितीन राऊत यांनीही दुजोरा दिला होता. त्यानंतर आता पिंपरी चिंचवड माहापालिकेच्या स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या सर्व्हरवर सायबर अटॅक झाल्याचे समोर आले आहे.

दरम्यान, या सर्व्हरवर सायबर हल्ला करण्यामागे नेमकं कोण आहे, याची अधिकृत माहिती अद्याप समजलेली नाही. या प्रकरणी पोलिसांत तक्रार करण्यात आली असून पोलीस कसून चौकशी करत आहेत.

इतर बातम्या :

ऊर्जामंत्र्याचे अपयश झाकण्यासाठी चीनवर खापर फोडण्याचा प्रयत्न, चंद्रशेखर बावनकुळेंचा आरोप

स्लॅब कोसळून 1 ठार, 2 जखमी; CM फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश
स्लॅब कोसळून 1 ठार, 2 जखमी; CM फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश.
हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी, CM फडणवीस संतापले...
हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी, CM फडणवीस संतापले....
जमीन मोजणीदरम्यान वाद; राऊतांनी ट्विट केला नार्वेकरांचा व्हिडिओ
जमीन मोजणीदरम्यान वाद; राऊतांनी ट्विट केला नार्वेकरांचा व्हिडिओ.
सोयाबीन-कापूस आयात होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका
सोयाबीन-कापूस आयात होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका.
दादांची इच्छा पूर्ण करायची होती, पण...
दादांची इच्छा पूर्ण करायची होती, पण....
दादांचे 70% आमदार विलिनीकरणाच्या बाजूनं?
दादांचे 70% आमदार विलिनीकरणाच्या बाजूनं?.
भुजबळांचा संताप आणि संकेत... विलिनीकरणाच्या मुद्द्यावर मोठी अपडेट काय?
भुजबळांचा संताप आणि संकेत... विलिनीकरणाच्या मुद्द्यावर मोठी अपडेट काय?.
दादर मार्केट गुलाबांच्या रंगात रंगले; व्हॅलेंटाईन डेसाठी...
दादर मार्केट गुलाबांच्या रंगात रंगले; व्हॅलेंटाईन डेसाठी....
बंद दाराआड, भिंतीआड जे बोललं जातं, त्यावर का बोलू? संजय राऊतांचा सवाल
बंद दाराआड, भिंतीआड जे बोललं जातं, त्यावर का बोलू? संजय राऊतांचा सवाल.
VSR कंपनीचे बेनामी मालक कोण? संजय राऊत यांच्या सवालाने खळबळ
VSR कंपनीचे बेनामी मालक कोण? संजय राऊत यांच्या सवालाने खळबळ.