AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune : शेतात खोदलेल्या खड्ड्यात बुडून तीन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू; पुण्यातल्या आंबेठाण गावातली घटना

खेळता खेळता या डबक्यात ही मुले घसरली. त्यांना तत्काळ रुग्णवाहिकेद्वारे प्राथमिक उपचाराकरिता रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

Pune : शेतात खोदलेल्या खड्ड्यात बुडून तीन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू; पुण्यातल्या आंबेठाण गावातली घटना
शेतात खोदलेल्या याच खड्ड्यात बुडून तीन मुलांचा झाला मृत्यूImage Credit source: tv9
| Edited By: Pradeep Garad | Updated on: Jul 12, 2022 | 6:00 PM
Share

चाकण, पुणे : आंबेठाण गावातील लांडगे वस्तीवर शेतातील खड्ड्यात बुडून तीन चिमुकल्या भावडांचा दुर्दैवी मृत्यू (Children Dead) झाला आहे. खेड तालुक्यातील आंबेठाण गावातील लांडगे वस्तीवर शेतात एका खासगी व्यक्तीने खड्डा उकरून ठेवला आहे. या खड्ड्यात पाणी साचले होते. त्या ठिकाणी खेळता खेळता तीन भावडांचा पाण्यात बुडून मृत्यू (Drowning) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बिहार येथील किशोर दास यांचे कुटुंब कामाच्या निमित्ताने लांडगे वस्ती येथे भाड्याने राहत होते. मृत्यू पावलेले तीन चिमुकले हे त्यांची अपत्ये होती. किशोर दास हे मूळ बिहार (Bihar) राज्यातील रहिवासी आहेत. त्यांना एकूण चार अपत्ये आहेत. त्यातील रोहित दास (वय 8), राकेश दास (वय 6), श्वेता दास (वय 4) अशी मृत पावलेल्या मुलांची नावे आहेत.

डॉक्टरांनी घोषित केले मृत

एका बेजबाबदार व्यक्तीने हा खड्डा करून ठेवल्याने हा मोठा अनर्थ झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. घटनास्थळी मदत कार्याची टीम आणि महाळुंगे पोलीस चौकीचे पोलीस प्रशासन दाखल झाले. खेळता खेळता या डबक्यात ही मुले घसरली. त्यांना तत्काळ रुग्णवाहिकेद्वारे प्राथमिक उपचाराकरिता रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. तीन लहान भावंडे एकाच घरातील होती. दोन मुले आणि एक मुलगी यात मृत पावले आहेत.

‘पालकांनी पाल्यांवर लक्ष ठेवावे’

मृतदेह शवविच्छेदनासाठी वायसीएम रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. पुढील तपास महाळुंगे पोलीस करत आहेत. दरम्यान, सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. अनेक ठिकाणी पुराचीही स्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणच्या शाळा काही काळासाठी बंद ठेवण्यात आल्या आहेत. अशावेळी पालकांनी आपल्या मुलांवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. त्यांना अशा वातावरणात शक्यतो बाहेर पडू देऊ नये. पाण्याची खोली कुठे किती असेल याचा अंदाज येत नाही. अशावेळी जास्त काळजी घ्यावी. अशाप्रकारच्या खड्ड्यांच्या बाजूला अडथळा असणे गरजेचे आहे, अशी खबरदारी घेण्याचे आवाहन पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Follow Us
वर्षा गायकवाड आणि धांगेकरांसह अनेकांना मारहाण? पोलिसांवर नेत्यांचा...
वर्षा गायकवाड आणि धांगेकरांसह अनेकांना मारहाण? पोलिसांवर नेत्यांचा गंभीर आरोप
तिसऱ्यांदा इंडिया आघाडीतील नेत्यांची धरपकड; दिल्लीत नेमकं काय घडलं?
तिसऱ्यांदा इंडिया आघाडीतील नेत्यांची धरपकड; दिल्लीत नेमकं काय काय घडलं?
दिल्लीत इंडिया आघाडी आक्रमक; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
दिल्लीत इंडिया आघाडी आक्रमक; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
दिल्लीत इंडिया आघाडीचा मोर्चा; आतापर्यंत काय-काय घडलं?
India Alliance Morcha: दिल्लीत इंडिया आघाडीचा मोर्चा; आतापर्यंत काय-काय घडलं?
ज्ञानेश कुमारांना पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही; राऊतांचा हल्लाबोल
Sanjay Raut : ज्ञानेश कुमारांना पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही; संजय राऊतांचा थेट हल्लाबोल, पुढे म्हणाले....
सुधांशू त्रिवेदींचा राहुल गांधींना जोरदार पलटवार; काँग्रेसचा पराभव...
सुधांशू त्रिवेदींचा राहुल गांधींना जोरदार पलटवार; काँग्रेसच्या पराभवांचा इतिहास सांगत उपस्थित केला सवाल!
एकीकडे विद्यार्थ्यांची धरपकड तर, दुसरीकडे लोकशाही वाचवा चा एल्गार...
Mumbai : एकीकडे विद्यार्थ्यांची धरपकड तर, दुसरीकडे लोकशाही वाचवा चा एल्गार; मुंबईत राजकीय वातावरण तापलं
राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांची दिल्ली पोलिसांसोबत चर्चा सुरु
India Alliance Morcha : राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांची दिल्ली पोलिसांसोबत चर्चा सुरु
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत रणकंदन; राहुल गांधींसह....
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत रणकंदन; इंडिया आघाडीचा मोर्चा अन् राहुल गांधींसह अनेक खासदार ताब्यात
इंडिया आघाडीतचं तीव्र आंदोलन! राहुल गांधी, प्रियंका गांधींना पोलिस...
इंडिया आघाडीतचं तीव्र आंदोलन! राहुल गांधी, प्रियंका गांधींना पोलिसांनी ताब्यात घेतलं