AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानासाठी थेट दुबईहून बारामतीला, इतके हजार रुपये खर्च करून गाठले गाव

मतदान करून वेगळे समाधान मिळाल्याची भावना सचिन लकडे यांनी व्यक्त केली..

ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानासाठी थेट दुबईहून बारामतीला, इतके हजार रुपये खर्च करून गाठले गाव
मतदानासाठी दुबईहून थेट बारामती गाठणारे दाम्पत्य.Image Credit source: tv 9
| Edited By: | Updated on: Dec 18, 2022 | 8:45 PM
Share

बारामती ग्रामपंचायत निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी एक दाम्पत्य ८० हजार रुपये खर्चून दुबईहून बारामती तालुक्यातील गडदरवाडीला आले आहे. गडदरवाडीतील सचिन गोकुळ लकडे हे दुबई देशातील शा विमानतळावर कामाला आहेत.  ते मूळचे बारामती तालुक्यातील गडदरवाडी गावातील आहेत. सन २०२२ ची ग्रामपंचायत निवडणूक लागली आहे. या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी ते आपली पत्नी सरिता यांच्यासह थेट दुबईहून गडदरवाडीला दाखल झाले आहेत. त्यासाठी त्या दाम्पत्याला दोन्ही बाजूकडील विमान प्रवासासाठी तब्बल ८० हजार रुपयांचा खर्च आला आहे.

मात्र असे असले तरी गाव कारभाराची धुरा योग्य व्यक्तीकडे जावी यासाठी मतदान करण्यासाठी आलो आहे. मतदान करून वेगळे समाधान भेटल्याची भावना सचिन लकडे यांनी व्यक्त केली..

राज्यभरातील 7 हजार 135 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्राथमिक अंदाजानुसार आज सरासरी सुमारे 74 टक्के मतदान झाले. यावेळी सदस्यपदांसह थेट सरपंचपदासाठीदेखील मतदान पार पडले.

राज्य निवडणूक आयोगाने 7 हजार 751 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली होती. त्यातील काही ठिकाणी सरपंचपदाच्या,  तर काही ठिकाणी सदस्यपदाच्या निवडणुका बिनविरोध झाल्या.

त्यामुळे आज प्रत्यक्षात 7 हजार 135  ग्रामपंचायतींसाठी सकाळी 7.30  ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान झाले. दुपारी 3.30 पर्यंत प्राथमिक माहितीनुसार सरासरी 67 टक्के मतदान झाले होते. नक्षलग्रस्तभागात दुपारी 3.30 वाजेपर्यंतच मतदानाची वेळ होती. सर्व ठिकाणी 20 डिसेंबर 2022 रोजी  मतमोजणी होईल.

प्रत्यक्ष मतदान झालेल्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या: ठाणे – 35, पालघर – 62, रायगड – 191, रत्नागिरी – 163, सिंधुदुर्ग – 291, नाशिक – 188, धुळे – 118, जळगाव – 122, अहमदनगर – 195, नंदुरबार – 117, पुणे – 176, सोलापूर – 169, सातारा – 259, सांगली – 416, कोल्हापूर – 429, औरंगाबाद – 208, बीड – 671, नांदेड – 160, उस्मानाबाद- 165, परभणी – 119, जालना – 254, लातूर – 338, हिंगोली – 61, अमरावती – 252, अकोला – 265, यवतमाळ – 93, बुलडाणा – 261, वाशीम – 280, नागपूर – 234, वर्धा – 111, चंद्रपूर – 58, भंडारा – 304, गोंदिया – 345, गडचिरोली- 25. एकूण – 7,135.

शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत....
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप.
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं.
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा.
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का.
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल.
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी.
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ.
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट.