AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune | पाश्चात्य गोष्टी स्वीकारताना आपली संस्कृतीही जपावी : डॉ. सदानंद मोरे

संत साहित्याचे अभ्यासक डॉ. श्रीरंग गायकवाड यांनी संपादीत केलेल्या ।।ज्ञानबातुकाराम।। या वार्षिक अंकाच्या 'बा तुकोबा' या संत तुकाराम महाराज विशेषांकाचे प्रकाशन डॉ. मोरे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

Pune | पाश्चात्य गोष्टी स्वीकारताना आपली संस्कृतीही जपावी : डॉ. सदानंद मोरे
नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी प्रकाशन
| Edited By: | Updated on: Jan 09, 2022 | 2:09 PM
Share

चाकण : पाश्चात्य कालगणनेसारख्या गोष्टी आपण स्वीकारल्या तरी, त्यासोबत आपल्या संस्कृतीतील गोष्टीही जपल्या पाहिजेत. चांगल्या गोष्टी कुठूनही घ्याव्यात, पण आपल्या चांगल्या गोष्टी विसरू नयेत, असे आवाहन संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी येथे केले. संत साहित्याचे अभ्यासक डॉ. श्रीरंग गायकवाड यांनी संपादीत केलेल्या ।।ज्ञानबातुकाराम।। या वार्षिक अंकाच्या ‘बा तुकोबा’ या संत तुकाराम महाराज विशेषांकाचे प्रकाशन डॉ. मोरे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे, संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे प्रमुख माणिकमहाराज मोरे, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार भास्कर हांडे, जेष्ठ पत्रकार संजीव शाळगावकर, महेश म्हात्रे, यमाजी मालकर, ह. भ. प. सचिन पवार, प्राचार्य पांडुरंग गायकवाड, माजी शिक्षणाधिकारी संभाजी लोंढे, नानासाहेब लोंढे, बाळासाहेब लोंढे, ह. भ. प. मधुकर गायकवाड, हरिती पब्लिकेशनचे दीपक कसाळे, हर्मिस प्रकाशनचे सुशील धसकटे, जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे, सर्व माध्यमांतील पत्रकार, भामचंद्र सप्ताह समितीचे सर्व पदाधिकारी, वारकरी, गावकरी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डॉ. मोरे यांचं मार्गदर्शन

यावेळी डॉ. मोरे म्हणाले,

पाश्चात्य गोष्टीही आपण आपल्या पद्धतीने बदल करून स्वीकारल्या. उदाहरणार्थ, पोर्तुगिजांनी आपल्याकडे पाव आणला. आपण त्याचा वडापाव केला. ‘मिराशी’ हा तुकोबारायांनी अभंगात वापरलेला शब्द पर्शियन आहे. म्हणजे परकीय भाषेतील शब्दही आपण आपलेसे केले. म्हणजेच कालानुरुप बदल व्हावेत. वारकरी परंपरेत ज्ञानेश्वर माउलींच्या ज्ञानेश्वरीवर प्रवचन केले जाते. आता तुकाराम महाराजांच्या गाथेवरही प्रवचन होण्यास हरकत नसावी.

यावेळी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रकाशनापूर्वी उपस्थितांनी भामचंद्र डोंगरावर जाऊन तुकोबारायांच्या ध्यान स्थानाचे दर्शन घेतले. या ठिकाणी महेश म्हात्रे यांनी तुकाराम महाराजांच्या कार्याचे महत्त्व विशद केले. तर, डॉ. श्रीरंग गायकवाड आणि ह. भ. प. दत्तात्रय महाराज ढोणे यांनी संत तुकाराम महाराजांच्या अभंगांचे गायन केले.

प्रकाशनानंतर भामचंद्र डोंगराच्या पायथ्याशी आईनाना प्रतिष्ठानच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. दर १ जानेवारीला नवे वर्षे तुकाराम महाराजांच्या सान्निध्यात सुरू करण्याचा निश्चय यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला. आभार प्राचार्य पांडुरंग गायकवाड यांनी व्यक्त केले.

विशेषंकाचं वैशिष्ट्य काय?

या विशेषांकातील तीन विभागांत तुकाराम महाराजांचे अनोखे दर्शन घडते. ‘पाऊलखुणा’ विभागात तुकारामांचे जन्मगाव देहू, आजोळ लोहगाव, गुरूंचे गाव ओतूर, पंढरपूर, तपोभूमी भामचंद्र, भंडारा आणि घोरावडेश्वर यांचा समावेश आहे. तर ‘तत्त्ववेत्ता’ या विभागात भामचंद्र डोंगर परिसरात उभ्या राहणाऱ्या डाऊ कंपनीविरोधात वारकऱ्यांनी उभारलेले आंदोलन, तुकोबा आणि शिवराय, तुकोबा आणि जोतिबा, तुकोबा आणि थोरो, तुकोबा आणि संविधान, तुकोबांचा अर्थविचार आदी विषय आहेत.

विशेषांकातील ‘संस्कृतीपुरुष’ या तिसऱ्या भागात तुकोबांच्या पाठीशी उभ्या राहिलेल्या महिला, पर्यावरणप्रेमी तुकोबा, इंटरनेटवरील तुकोबा, अमराठी गायकांनी गायलेले तुकोबांचे अभंग, ‘अभंग तुकयाचे’ कॅसेटच्या निर्मितीची कहाणी, तुकोबांना जगभर घेऊन जाणारे चित्र, शिल्प साहित्य आदी विषय आहेत. अनेक दुर्मिळ सुंदर छायाचित्रांनी हा आर्ट पेपरवरील संपूर्ण रंगीत अंक सजला आहे.

काय आहे उपक्रम?

“चला भामचंद्र डोंगरावर जाऊ, तुकोबारायांना समजून घेऊ” या घोषनेनुसार दर वर्षी १ जानेवारीला अनेक समविचारी मित्र तुकोबारायांची तपोभूमी भामचंद्र डोंगरावर जातात आणि तुकोबारायांच्या विचारांची उजळणी करतात. “वृक्षवल्ली आम्हा सोयरी” असा पर्यावरण रक्षणाचा मंत्र संत तुकारामांनी दिला होता. त्याला अनुसरून ‘आईनाना’ प्रतिष्ठानच्या वतीने भामचंद्र डोंगर परिसरात वड, पिंपळासारखी देशी झाडे लावण्यात येत आहेत.

संत विचारांना उजळणी देण्यासाठी यंदापासून ।।ज्ञानबातुकाराम।। या वार्षिकाची सुरुवात करण्यात आली आहे. या वार्षिकाचा ‘बा तुकोबा’ हा संत तुकाराम महाराजांवरील विशेषांक महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला.

इतर बातम्या –

Guru Gobind Singh Jayanti 2022 | जेव्हा 10 लाख सैनिकांवर 43 शीख भारी पडले होते, वाचा अंगावर काटे आणणारी इतिहासातील घटना

Numerology | तुमचा जन्म 8, 17 आणि 26 तारखेला झाला आहे का? मग शनिदेवाची कृपा होणार

Chanakya Niti | काहीही झालं तरी या गोष्टी कधीच कोणासोबत शेअर करु नका,अन्यथा वाईट परिणामांसाठी तयार रहा

नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.