नव्या मलनिस्सारण प्रकल्पाला ‘स्थायी’ची मान्यता, पुणे महापालिकेतल्या 11 गावांना होणार फायदा

पुणे महापालिकेत 2017 मध्ये नव्याने समाविष्ठ झालेल्या 11 गावांच्या मलनिस्सारण प्रकल्पासाठी महानगरपालिकेच्या स्थायी समितीने 323 कोटींच्या कामांना मान्यता दिली आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून या अकरा गावांमध्ये मैलापाणी वहन, मैलापाणी शुद्धिकरण केंद्र उभारणे आणि देखभाल दुरुस्ती केली जाणार आहे.

नव्या मलनिस्सारण प्रकल्पाला 'स्थायी'ची मान्यता, पुणे महापालिकेतल्या 11 गावांना होणार फायदा
पुणे महानगरपालिका
Follow us
| Updated on: Sep 01, 2021 | 12:14 PM

पुणे : पुणे महापालिकेता 2017 मध्ये नव्याने समाविष्ठ झालेल्या 11 गावांच्या मलनिस्सारण प्रकल्पासाठी महानगरपालिकेच्या स्थायी समितीने 323 कोटींच्या कामांना मान्यता दिली आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून या अकरा गावांमध्ये मैलापाणी वहन, मैलापाणी शुद्धिकरण केंद्र उभारणे आणि देखभाल दुरुस्ती केली जाणार आहे. या कामांच्या निविदांवरून गेल्या महिनाभरात अनेकदा आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या आहेत. मात्र, आता स्थायी समितीत कुठलीही चर्चा न करता या कामांना मान्यता देण्यात आली आहे. (Drainage project has been approved for 11 villages in Pune Municipal Corporation)

प्रकरण न्यायालयात, तरीही प्रस्तावाला मान्यता

या प्रकल्पासाठी विशिष्ठ ठेकेगदारांना समोर ठेवून अटी आणि शर्ती टाकण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. तसेच या कामांची निविदा उघडण्यापूर्वी कोणत्या ठेकेदाराला काम मिळणार हे जाहीर करण्यात आले होते. त्याच ठेकेदाराला प्रत्यक्षात काम देण्यात आले आहे. त्यामुळे काँग्रेस नगरसेवक अरविंद शिंदे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर सोमवारी म्हणजेच ६ सप्टेंबरला सुनावणी होणार आहे. न्यायालयीन प्रक्रिया सुरू असतानाही स्थायी समितीत हा प्रस्ताव मान्य करण्यात आला आहे.

प्रकल्पात मलवाहिन्या, दुरूस्तीची कामं

पुणे महापालिका प्रशासनाने 2017 मध्ये समाविष्ठ करण्यात आलेल्या गावांमध्ये मैलापाणी शुद्धिकरणाच्या प्रकल्पासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला होता. त्यानुसार मैलापाणी गोळा करण्यासाठी 111 किमीच्या मलवाहिन्या आणि 57 किमीच्या मुख्य मलवाहिन्या टाकण्याचं नियोजन करण्यात आलं होतं. त्यासोबतच सध्या अस्तित्वात असलेल्या 14 किमीच्या मलवाहिन्यांमध्ये सुधारणा करण्यात येणार आहे. या कामांसाठी अनुक्रमे 100 कोटी 63 लाख, 101 कोटी 8 लाख आणि 13 कोटी 37 लाख रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.

कंत्राटदार कंपनीने कमी दराने भरल्या निविदा

मांजरी बुद्रुक इथं 93.50 एमएलडी आणि केशवनगर इथे 12 एमएलडी मैलापाण्यावर प्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यासाठी 177 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार 392 कोटी रूपयांच्या निविदा काढण्यात आल्या होत्या. मात्र, कंत्राटदार कंपनीने कमी दराने निविदा भरल्या आहेत. त्यानुसार 323 कोटी 47 लाख रुपयांच्या निविदा मान्यतेसाठी स्थायी समितीसमोर सादर करण्यात आल्या होत्या. या निविदांना सर्वपक्षीयांनी मान्यता दिली आहे. उघडण्यात आलेल्या निविदा पुन्हा मूल्यांकन समितीसमोर ठेवण्यात येणार आहेत. या समितीने मान्यता दिल्यानंतर त्या अंतिम मान्यतेसाठी स्थआयी समितीसमोर सादर करण्यात येणार आहेत.

या गावांना नव्या प्रकल्पाचा लाभ

2017 मध्ये शिवणे, उत्तमनगर, धायरी, आंबेगाव खूर्द, आंबेगाव बुद्रुक, उंड्री, उरूळी देवाची, फुरसुंगी, मुंढवा, हडपसर आणि लोहगाव या गावांचा पुणे महापालिकेत समावेश करण्यात आला होता. या गावांसाठी हा मलनिस्सार प्रकल्प उभारण्यात येणार आहे. यासाठी खिलारी इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. आणि एस. ए. इन्फ्रा या ठेकेदारांकडून काम करून घेण्यास मंजूरी देण्यात आली आहे.

इतर बातम्या :

ज्या आमदारांच्या जीवावर मुख्यमंत्री झालात त्यांना समजून घ्या; राष्ट्रवादीच्या आमदाराचा मुख्यमंत्र्यांना घरचा आहेर

वृद्ध दाम्पत्याच्या घरावर दरोडा, निघताना पाया पडून चोरांनी 500 ​​रुपये दिले, म्हणाले सहा महिन्यांत सगळा ऐवज परत करु

नंदुरबारला यलो ॲलर्ट, शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा; धुळ्यात रात्रभर मुसळधार, रेल्वे रुळ पाण्यात

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.