Pimpri Chinchwad| पोलिसांच्या वाटेत काटे; चालकांच्या अभावामुळे व्हॅन जागेवर, तपास करायचा तर कसा?

बऱ्याचदा आरोपीला पकडायला जायचे आहे , वाहन आहे पण वाहन चालक मिळेल का? अशी विचारणा पोलीस अधिकाऱ्यांच्याकडून केली आहे. पुणे शहर व ग्रामीण पोलीस दलाची विभागणी करुन पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाची निर्मिती केली. त्यामुळे तिथल्या जुन्या, बिघाड झालेल्या गाड्या इकडे आल्या

Pimpri Chinchwad| पोलिसांच्या वाटेत काटे; चालकांच्या अभावामुळे व्हॅन जागेवर, तपास करायचा तर कसा?
Pimpri Chinchwad police

पिंपरी – शहारातील वाढती गुन्हेगारी पोलिसांसाठी डोकेदुखी ठरत असतानाच दुसरीकडं अपुऱ्या साधना सुविधांमुळं पोलिसांच्या काम करण्याला मर्यादा निर्माण होताना दिसून आल्या आहेत. अपुऱ्या मनुष्यबळ समोरच आयुक्तालयात उपलब्ध सोबतच पोलीस कर्मचाऱ्यांबरोबरच वाहन चालवण्यासाठी वाहनचालकाचा तुटवडा असल्याने वाहने चालवताना पोलिसांची मोठी दमछाक होत आहे.

या अडचणी जाणवतात शहरात घरफोडी , चोरी, जबर चोरी या सारख्या घटनांच्या तपासासाठी जाताना पोलिसांना मोठी अडचण जाणवत आहे. वाहनांसाठी वाहनचालक नसल्याने अनेकदा वेळेत घटनेच्या ठिकाणी पोहचता येत नाही. बऱ्याचदा आरोपीला पकडायला जायचे आहे , वाहन आहे पण वाहन चालक मिळेल का? अशी विचारणा पोलीस अधिकाऱ्यांच्याकडून केली आहे. पुणे शहर व ग्रामीण पोलीस दलाची विभागणी करुन पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाची निर्मिती केली. त्यामुळे तिथल्या जुन्या, बिघाड झालेल्या गाड्या इकडे आल्या. त्यामुळे साहजिकच सुरुवातीपासून पोलीस आयुक्तालयांच्या वाहनाचा सुरुवातीपासुनचा प्रवासच ढकल स्टार्ट असा झाला आहे.

वाहन चालकांसाठी पदभरती कधी मागील काही दिवसांपूर्वी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात 720 कर्मचाऱ्यांसाठी भरती झाली मात्र या भरतीमध्ये वाहनचालकांच्या पदाचा समावेश नव्हता. वाहकना चालक पदाची भरती करावे याबाबतचा प्रस्ताव पोलीस आयुक्तालयाने वरिष्ठ पातळीवर सादर केला आहे. मात्र या प्रस्तावाला अद्याप मंजुरी मिळलेली नाही.

शहर पोलीस दलातील वाहनांची सद्यस्थिती

उपलब्ध वाहन चालक -98 आवश्यक वाहनचालक -277 वाहनचालकांची रिक्त पदे – 179 किती वाहनचालकांचा प्रस्ताव – 338

बेस्ट मायलेज आणि अधिक बूट स्पेसवाल्या टॉप 5 टू व्हीलर्स, किंमत 65000 रुपये

Shardul Thakur: ‘झुकती है दुनिया झुकानेवाला…’, आपल्या लॉर्ड शार्दुल ठाकूरसमोर झुकला हा दिग्गज क्रिकेटपटू

Video : ‘घर की मुर्गी दाल बराबर’, शिवसेना आमदाराची नाराजी जाहीर व्यासपीठावर उघड

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI