PMRDA विकास आराखड्यावर साडेआठ हजार हरकती दाखल, 30 ऑगस्टपर्यंत मुदत, कशा दाखल कराल हरकती आणि सूचना?

महापालिका हद्दीत समाविष्ट 23 गावांसह पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा (PMRDA) प्रारूप विकास आराखडा 2 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात आला. या विकास आराखड्यावर हरकती आणि सूचना नोंदवण्याचं काम सध्या सुरू आहे.

PMRDA विकास आराखड्यावर साडेआठ हजार हरकती दाखल, 30 ऑगस्टपर्यंत मुदत, कशा दाखल कराल हरकती आणि सूचना?
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा (PMRDA) प्रारूप विकास आराखडा

पुणे : महापालिका हद्दीत समाविष्ट 23 गावांसह पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा (PMRDA) प्रारूप विकास आराखडा 2 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात आला. या विकास आराखड्यावर हरकती आणि सूचना नोंदवण्याचं काम सध्या सुरू आहे. आतापर्यंत विकास आराखड्यावर साडे आठ हजार हरकती दाखल झाल्या आहेत. 30 ऑगस्टपर्यंत हरकती आणि सूचना नोंदवण्यासाठी अंतिम मुदत देण्यात आली आहे. (Eight and a half thousand objections have been lodged on the PMRDA development plan)

प्राधिकरणाने प्रसिद्ध केलेला विकास आराखडा अद्याप अनेक नागरिकांपर्यंत पोहोचलेला नाही. अनेक शेतकऱ्यांना आपल्या जमिनीवर कोणते आरक्षण पडले याची माहिती नाही. या सगळ्या पार्श्वभूमीवर हरकती नोंदवण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी होऊ लागली आहे.

कशा आणि कुठे दाखल कराल हरकती आणि सूचना?

सुरूवातीला प्राधिकरणाच्या औंध कार्यालयात हरकती नोंदवण्याची सुविधा होती. पण आता औंध कार्यालयासह आकुर्डी कार्यालय (नवीन प्रशासकिय इमारत पिपरी चिंचवड प्राधिकरण), वाघोली क्षेत्रीय कार्यालय, नसरापूर क्षेत्रीय कार्यालय, वडगाव मावळ क्षेत्रीय कार्यालय इथं हरकती नोंदवण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. याठिकाणी महानगर आयुक्त तथा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नावाने लिखित स्वरूपात हरकती आणि सूचना देता येणार आहेत.

ई-मेलवर दीड हजारांहून अधिक हरकती

कार्यालयांसोबतच ई-मेलच्या माध्यमातूनही हरकची दाखल करता येत आहेत. त्यासाठी नागरिकांना pmr.dp.planning@gmail.com या ई-मेलवरही हरकती आणि सूचना पाठवता येतील. आतापर्यंत ई-मेलच्या माध्यमातून 1 हजार 800 हरकती प्राप्त झाल्या आहेत. मुदतीनंतर आलेल्या सूचना आणि हरकती विचारात घेतल्या जाणार नाहीत.

कुठे पाहता येईल विकास आराखडा?

हरकती आणि सूचनांवर सुनावणी घेऊन काही दिवसांत विकास आराखडा मंजूर केला जाणार आहे. पुणेकरांना पीएमआरडीएच्या औंध इथल्या महाराजा सयाजीराव गायकवाड उद्योग भवन इथल्या कलादालनात हा विकास आराखडा उलपब्ध करून देण्यात आला आहे. सोबतच पीएमआरडीएच्या www.pmrda.gov.in या वेबसाईटवरही विकास आराखडा पाहता येईल.

काय आहे विकास आराखड्यात?

पुणे महानगर विकास प्राधिकरणाचे क्षेत्रफळ एकूण क्षेत्र 6914.26 चौ. किमी आहे. हे राज्यात सर्वात मोठं आणि देशात तिसऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठं क्षेत्र आहे. यामध्ये २ रिंग रोड, हायस्पीड आणि क्रिसेंट रेल्वे, 10 मेट्रो मार्गिका, 15 नागरी केंद्रे, 4 प्रादेशिक केंद्रे, पर्यटनस्थळं, विद्यापीठे, जैवविविधता उद्याने, अक्षय ऊर्जा निर्मिती केंद्रे, अग्नीशमन केंद्रे, औद्योगिक संशोधन आणि प्रशिक्षण केंद्रे, कृषी उत्पन्न बाजार केंद्रे, कृषी प्रक्रिया संशोधन आणि विकास केंद्र, ग्रामीण सबलीकरण केंद्र, सार्वजनिक गृह प्रकल्प, वैद्यकीय संशोधन केंद्र आणि अपघात उपचार केंद्र

संबंधित बातम्या :

पुणे महानगर नियोजन समिती निवडणुकीसाठी मतदार यादी जाहीर, नोव्हेंबरमध्ये निवडणूक होण्याची शक्यता, इथे पाहा संपूर्ण यादी

Pune Metro Update | मेट्रोच्या कामामुळे छत्रपती संभाजी महाराज पूल रात्री बंद!

पुण्यात नारायण राणेंच्या मॉलवर शिवसैनिकांची दगडफेक

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI