AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

निवडणूक आयोगाने दिले संकेत, राज्यात निवडणुकांचा बिगुल वाजणार

election commission : राज्यात निवडणुका होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. निवडणूक आयोगाच्या एका परिपत्रकामुळे हे संकेत मिळाले आहे. त्यामुळे आता इच्छुकांना निवडणुकीच्या तयारीला लागावे लागणार आहे.

निवडणूक आयोगाने दिले संकेत, राज्यात निवडणुकांचा बिगुल वाजणार
Image Credit source: tv9
| Updated on: Jul 07, 2023 | 8:54 AM
Share

योगेश बोरसे, पुणे : राज्यात गेल्या काही दिवसांपासून राजकीय घडामोडी सुरु आहेत. वर्षभरापूर्वी शिवसेना गटातून एकनाथ शिंदे गट वेगळा झाला होता. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसमधून अजित पवार यांचा गट वेगळा झाला. आता सत्ताधारी भाजप-शिवसेना युतीसोबत राष्ट्रवादी अजित पवार गट सत्तेत आला. सत्ताधारी पक्ष राज्यात अधिक मजबूत झाला. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राज्यात निवडणुका होणार असल्याचे संकेत मिळाले आहे. राज्य निवडणूक आयोगाने येत्या सप्टेंबर-ऑक्टोंबरमध्ये निवडणुका घेण्याचे संकेत दिले आहे.

कोणत्या होणार निवडणुका

राज्यात 23 महानगरपालिकांची मुदत संपली आहे. त्यांच्या निवडणुका अद्याप झालेल्या नाहीत. तसेच 25 जिल्हा परिषदा आणि 207 नगरपालिकांच्या निवडणुका रखडल्या आहेत. ग्रामीण भागासाठी जिल्हा परिषदांच्या निवडणुका महत्वाच्या असतात. जिल्हा परिषदेसोबतच पंचायत समित्यांच्या निवडणुका होतात. तसेच राज्यातील 92 नगरपरिषदांमधल्या ओबीसी राजकीय आरक्षणाचाही मुद्दा प्रलंबित आहे. या सर्व निवडणुकांची वाट स्थानिक पातळीवर पाहिली जात होती. आता निवडणूक आयोगाने राज्यात सप्टेंबर-ऑक्टोबरदरम्यान निवडणुका घेण्याची संकेत दिले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागण्याची शक्यता असल्यामुळे इच्छुकांनी तयारी करायला सुरुवात करायला हरकत नाही.

राजपत्रात केला उल्लेख

राज्य निवडणूक आयोगाच्या राजपत्रात निवडणुकीचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यात सप्टेंबर-ऑक्टोबरदरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होण्याची शक्यता आयोगाच्या राजपत्रात उल्लेख आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सार्वत्रिक आणि पोटनिवडणुकींसाठी मतदार याद्या तयार करण्यासाठी अधिसूचित करण्यात येत असल्याचा देखील पत्रात उल्लेख केला आहे. हे परिपत्रक सोशल मीडियावरसुद्धा व्हायरल झाले आहे. ५ जुलै २०२३ रोजी काढलेले हे परिपत्रक आहे. याआधी सर्वोच्च न्यायालयात निवडणूक आयोगाने पावसाळानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे म्हटले होते.

पुणे, मुंबई निवडणुका कधी होणार

मुंबई, पुण्यासह राज्यातील महापालिकांच्या रखडलेल्या निवडणुका सप्टेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे. तर जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुका ऑक्टोबरमध्ये होण्याची शक्यता आहे. या निवडणुका आगामी विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीमच असणार आहे.

राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.