Pune Crime | पुणे हादरले, किरकोळ वादातून शहरात गोळीबार

Pune Crime News | पुणे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेसंदर्भात चिंता निर्माण होणारी परिस्थिती आहे. पुणे शहरात रविवारी मध्यरात्री गोळीबार झाल्याची घटना घडली. सर्वत्र क्रिकेटचा जल्लोष सुरु असताना किरकोळ वादातून हा गोळीबार झाला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोळीबारात एक जण गंभीर जखमी झाला आहे.

Pune Crime | पुणे हादरले, किरकोळ वादातून शहरात गोळीबार
Follow us
| Updated on: Nov 20, 2023 | 8:48 AM

योगेश बोरसे, पुणे, दि. 20 नोव्हेंबर | पुणे शहरात कोयता गँगचा (koyta gang) अधुनमधून धुडघुस सुरु असतो. पुणे पोलिसांनी कोयता गँगच्या विरोधात (Crime News) धडक कारवाया केल्यानंतर गुन्हेगारांचे हल्ले सुरुच असतात. पुणे पोलिसांनी कोयता गँगचा म्होरक्यासह अनेक जणांना अटक केली. काही जणांवर मकोका लावण्यात आला आहे. तसेच काही जणांना हद्दपार करण्याची कारवाई झाली. त्यानंतर चोरी, दोरोडे या घटनाही वाढत आहेत. आता रविवारी सर्वत्र क्रिकेटचा जल्लोष सुरु असताना पुणे शहरात गोळीबार झाला. या घटनेत एक जण गंभीर झाला. पुण्यातील बाणेर परिसरात घडलेल्या या घटनेमुळे सर्व परिसर हादरला होता. तसेच पुणे परिसरात दिवाळी दरम्यान अनेक ठिकाणी घरफोडी झाली. त्यात लाखो रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे.

किरकोळ वादातून तरुणावर गोळीबार

पुणे येथील बाणेरच्या महाबळेश्वर हॉटेलजवळ किरकोळ वादातून गोळीबाराचा थरार झाला. आकाश पोपट बाणेकर आणि रोहित ननावरे यांच्या रविवारी मध्यरात्री किरकोळ वाद झाला. त्यानंतर रोहित याने आकाशवर सरळ गोळी चालवली. रविवारी मध्यरात्री ही घडली आहे. गोळीबारामुळे आकाश बाणेकर जखमी झालेला झाला. त्याला कासारसाई येथील एका रुग्णालयामध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले. या प्रकरणी रोहित ननावरे याच्यासह साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला. चतुशृंगी पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला. जुलै महिन्यात स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंदिर परिसरात एकावर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. त्यानंतर आता पुन्हा गोळीबार झाला आहे.

हे सुद्धा वाचा

पुणे शहरात चोरट्यांची दिवाळी

पुणे शहरात गोळीबार झाल्याच्या घटनेबरोबर अनेक ठिकाणी चोरट्यांनी घरफोडी केली. दिवाळीच्या दिवसांत पुण्यातील घरे बंद असल्याचा फायदा घेत अनेक भागात घरफोड्या झाल्या आहेत. शहराच्या विविध भागातील सदनिकांमधून सोन्याचे दागिने आणि रोकड असा लाखो रुपयांचा ऐवज चोरी झाल्याची घटना घडली. पुण्यातील केशवनगरमध्ये घरफोडीत १३ लाखांचा ऐवज चोरी झाली. या प्रकरणी गोपाल झा यांनी मुंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दुसरीकडे कर्वेनगर भागात चोरट्याने सदनिकेचे कुलूप तोडून बेडरूमधील कपाटातून ३० हजारांची रोकड लंपास केली.

Non Stop LIVE Update
तीन राज्यात भाजपचा चौफेर उधळलेला वारू मविआ महाराष्ट्रात रोखणार?
तीन राज्यात भाजपचा चौफेर उधळलेला वारू मविआ महाराष्ट्रात रोखणार?.
चित्रा वाघ यांचा पनवतीवर पलटवार, देश की गॅरेंटी मोदी अन् राहुल गांधी..
चित्रा वाघ यांचा पनवतीवर पलटवार, देश की गॅरेंटी मोदी अन् राहुल गांधी...
'नेमकी पनवती कोण?' फडणवीसांनी राहुल गांधींची बोलती केली बंद, म्हणाले..
'नेमकी पनवती कोण?' फडणवीसांनी राहुल गांधींची बोलती केली बंद, म्हणाले...
काळ्या दगडावरची रेघ, मोदींच्या नेतृत्वावर दादांचा पुन्हा शिक्कामोर्तब
काळ्या दगडावरची रेघ, मोदींच्या नेतृत्वावर दादांचा पुन्हा शिक्कामोर्तब.
अरे देवा, हे काय झालं? CM शिंदेंच्या हातात बॅटचा दांडा अन बॅट दुसरीकडे
अरे देवा, हे काय झालं? CM शिंदेंच्या हातात बॅटचा दांडा अन बॅट दुसरीकडे.
राऊत जेलमधून मोदींचा शपथविधी सोहळा बघणार; नितेश राणे यांचा मोठा दावा
राऊत जेलमधून मोदींचा शपथविधी सोहळा बघणार; नितेश राणे यांचा मोठा दावा.
इंडिया आघाडी टिकणार की नाही? शिवसेनेच्या नेत्यानं स्प्ष्ट म्हटलं...
इंडिया आघाडी टिकणार की नाही? शिवसेनेच्या नेत्यानं स्प्ष्ट म्हटलं....
... हा आमचा पायगुण, चार राज्यात भाजप आघाडीवर; हसन मुश्रीफ काय म्हणाले?
... हा आमचा पायगुण, चार राज्यात भाजप आघाडीवर; हसन मुश्रीफ काय म्हणाले?.
चार राज्यातील निकालावर वडेट्टीवार म्हणाले, सेमीफायनल जिंकलो आता फायनल
चार राज्यातील निकालावर वडेट्टीवार म्हणाले, सेमीफायनल जिंकलो आता फायनल.
विधानसभा निवडणुकीतील काँग्रेस-भाजपच्या विजयाचं राऊतांनी काय केलं भाकित
विधानसभा निवडणुकीतील काँग्रेस-भाजपच्या विजयाचं राऊतांनी काय केलं भाकित.