Eknath Shinde : पुण्यात शिवसेनेला खिंडार? नाना भानगिरेंची आमदार होण्यासाठी ‘फिल्डिंग’ तर 5 नगरसेवक शिंदे गटाच्या संपर्कात!

मागील दोन दोन दिवसांपासून ते मुंबईतच आहेत. बंडखोरी आणि त्यानंतर या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवल्यापासून नाना भानगिरे एकनाथ शिंदे यांच्यासोबतच त्यांच्या मदतीला पोहोचले होते.

Eknath Shinde : पुण्यात शिवसेनेला खिंडार? नाना भानगिरेंची आमदार होण्यासाठी 'फिल्डिंग' तर 5 नगरसेवक शिंदे गटाच्या संपर्कात!
एकनाथ शिंदेंसह नाना भानगिरे
Image Credit source: Youtube
प्रदीप गरड

|

Jul 06, 2022 | 3:57 PM

पुणे : शिवसेनेतील बंडाचे लोण पुण्यातही पोहोचले आहे. पुण्यात शिवसेनेचे नेते आणि माजी नगरसेवर नाना भानगिरे (Nana Bhangire) एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले आहेत. त्यांच्यासह इतर पाच नगरसेवकदेखील शिवसेनेतून शिंदे गटात जाण्याच्या तयारीत आहेत. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना मुख्यमंत्रीपद मिळाल्यानंतर तर अनेक शिवसैनिक आता शिंदे गटात सामील होऊ इच्छित आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे 40 आमदार आहेत. आता या आमदारांसोबतच स्थानिक पातळीवरही शिवसैनिकांत (Shivsainik) चलबिचल पाहायला मिळत आहे. सध्यातरी पुण्यातून पाच नगरसेवक शिंदे गटात सामील होण्याच्या तयारीत आहेत. पुण्यात तशा चर्चादेखील ऐकायला मिळत आहेत. एकनाथ शिंदे मुंबईत पोहोचल्यानंतर लगेच नाना भानगिरे यांनी त्यांची भेट घेतली. त्यांना यावेळी मदतदेखील भानगिरे यांनी केली.

निधीची तक्रार

मागील दोन दोन दिवसांपासून ते मुंबईतच आहेत. बंडखोरी आणि त्यानंतर या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवल्यापासून नाना भानगिरे एकनाथ शिंदे यांच्यासोबतच त्यांच्या मदतीला पोहोचले होते. पुण्यातील शिंदे गटाच्या प्रचाराची जबाबदारी आता नाना भानगिरे सांभाळतील अशी चर्चा सुरू झाली आहे. सध्या पुणे महापालिकेची मुदत संपली आहे. त्यामुळे त्याठिकाणी प्रशासक आहे. सध्या निधीची समस्या असून आपल्याला निधी मिळत नसल्याची तक्रार भानगिरे यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे केली. त्यानंतर महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याशी बोलत तत्काळ निधी देण्याची विनंती केली.

हे सुद्धा वाचा

मुख्यमंत्री शिंदे करणार पुण्याचा दौरा

पुण्यात शिवसेनेचे सध्या दहा नगरसेवक आहेत. त्यातील पाच नगरसेवक तर शिंदे गटात जाण्याच्या हालचाली करत आहेत. मग शिवसेनेचे संख्याबळ आणखी कमी होणार आहे. त्यामुळे शिवसेनेला हा धक्का मानला जात आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री शिंदे लवकरच पुण्याचा दौरा करणार आहेत. त्यावेळी अनेक पदाधिकारी त्यांना भेटणार आहेत. ते शिंदे गटात सामील होणार असल्याचे बोलले जात आहे. तर नाना भानगिरे यांना हडपसर विधानसभा मतदारसंघातून आमदार होण्याचे वेध लागले आहेत. त्यासाठी त्यांची फिल्डिंग असल्याचेही बोलले जात आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें