Pune crime : खडकीच्या आर्मी बेस वर्कशॉपमधून चोरत होते लढाऊ विमानांचे सुटे भाग, लष्कराच्या अधिकाऱ्यांनी दिलं पोलिसांच्या ताब्यात

स्टील आणि तांब्यासाठी स्पेअर्स चोरीला जात असल्याचा संशय असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. परंतु इतर सर्व शक्यता तपासल्या जातील असे पोलिसांतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

Pune crime : खडकीच्या आर्मी बेस वर्कशॉपमधून चोरत होते लढाऊ विमानांचे सुटे भाग, लष्कराच्या अधिकाऱ्यांनी दिलं पोलिसांच्या ताब्यात
लढाऊ विमानांचे सुटे भाग चोरणाऱ्या कंत्राटदार आणि कामगारांवर कारवाईImage Credit source: Express
Follow us
| Updated on: Jul 30, 2022 | 9:47 PM

पुणे : खासगी कंत्राटदारासह (Private contractor) त्याचे चार कामगार रणगाड्याचे सुटे भाग विकताना आढळून आले आहेत. लष्कराच्या अधिकाऱ्यांनी त्यांना पकडले आहे. खडकी येथील 512 आर्मी बेस वर्कशॉपमधून चिलखती वाहनांचे म्हणजेच रणगाडे तसेच लढाऊ विमाने (Armoured vehicles) यांचे मुख्य सुटे भाग टेम्पो ट्रकच्या सीटखाली लपवून चोरताना एका खासगी कंत्राटदाराच्या चार कामगारांना लष्कराच्या अधिकाऱ्यांनी पकडले. त्यानंतर चार संशयितांना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले. खडकी पोलीस ठाण्यातील (Khadki Police Station) अधिकाऱ्यांनी सांगितले, की या संदर्भात 512 आर्मी बेस वर्कशॉपमधील सुभेदार दर्जाच्या अधिकाऱ्याने तक्रार नोंदवली. पोलिसांनी सांगितले, की शुक्रवारी, लष्कराच्या अधिकाऱ्यांनी बेस वर्कशॉपच्या ठिकाणी या चार संशयितांना पकडले. आठ युनिट्स जनरेटर आर्मेचर आणि बीएमपीसाठी वापरल्या जाणार्‍या दोन रेडिएटर्ससह डिकॅम्प करण्याचा प्रयत्न ते करीत होते.

चौघांना अटक

हे रणगाडे म्हणजे रशियन मूळ उभयचर पायदळ लढाऊ वाहने आहेत. सचिन सिद्धप्पा बनसोडे (32), आमोगसिद्ध केशव आठवले (38), विकास आदिनाथ साबळे (31, सर्व रा. पिंपळे गुरव) आणि मोहन उत्तम रासकर (43, भोसरी) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. या प्रकरणाचा तपास करणार्‍या उपनिरीक्षकाने सांगितले, की सैन्य अधिकाऱ्यांनी बाहेर जाणाऱ्या वाहनांची तपासणी केली असता चोरी होत असल्याचे लक्षात आले. बेस वर्कशॉपमध्ये काम करणाऱ्या कंत्राटदाराने कामावर घेतलेल्या चार जणांना लष्कराच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेऊन आमच्या ताब्यात दिले. आम्ही गुन्हा नोंदवला आणि चौघांना अटक केली.

हे सुद्धा वाचा

‘सर्व शक्यता तपासल्या जातील’

स्टील आणि तांब्यासाठी स्पेअर्स चोरीला जात असल्याचा संशय असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. परंतु इतर सर्व शक्यता तपासल्या जातील असे पोलिसांतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. खडकी येथील 512 आर्मी बेस वर्कशॉप ही भारतीय लष्कराची प्रमुख तळ कार्यशाळा आहे आणि ती आर्मर्ड कॉम्बॅट व्हेइकल्स, आर्मर्ड रिकव्हरी व्हेइकल्स आणि भारतीय सेनेच्या उभयचर पायदळ लढाऊ वाहनांच्या दुरुस्तीमध्ये गुंतलेली आहे. याठिकाणी वाहनांचे पार्ट्स चोरीला जात असल्याचे समोर आले.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.