AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रविवार स्पेशल : असं काय घडलं की आमिर खानलाही साताऱ्याच्या रोहितच्या तब्येतीची भुरळ, म्हणतो, ‘व्वा भावा नाद खुळा…!’

जीम मालकाने वडिलांदेखतच त्याचा घोर अपमान करुन त्याला पैशाच्या कारणास्तव बाहेर काढलं. हा अपमान त्याच्या जिव्हारी लागला... मग सुरु झाला प्रवास, रोहित बनसोडे ते बॉडीबिल्डर रोहित बनसोडे.....!

रविवार स्पेशल : असं काय घडलं की आमिर खानलाही साताऱ्याच्या रोहितच्या तब्येतीची भुरळ, म्हणतो, 'व्वा भावा नाद खुळा...!'
Akshay Adhav
Akshay Adhav | Updated on: Jan 17, 2021 | 8:56 AM
Share

मुंबई : सातारा जिल्ह्यातला गोंदवले गावचा रोहित बनसोडे नावाचा तरुण… शिक्षणासाठी तालुक्याच्या गावी गेला. कॉलेजची वेळ संपल्यानंतर रिकाम्या वेळेत काय करायचं?, असा विचार करत असताना आपल्याला जीममध्ये जाता येईल, असा विचार त्याच्या मनामध्ये आला. लागलीच तो तालुक्याच्या गावी वडीलांसोबत जीममध्ये प्रवेश मिळवण्यासाठी गेला. परंतू जीम मालकाने वडीलांदेखतच त्याचा घोर अपमान करुन त्याला पैशाच्या कारणास्तव बाहेर काढलं. हा अपमान त्याच्या जिव्हारी लागला… मग सुरु झाला प्रवास, रोहित बनसोडे ते बॉडीबिल्डर रोहित बनसोडे…..! (Gondwale Satara Rohit Bansode Journey Paani Foundation Amir Khan)

जीममधून अपमानित होऊन बाहेर पडल्यावर आपण अशी तब्येत करायची की लोकं म्हटली पाहिजेत तब्येत असावी तर अशी… असा निर्धार रोहितने केला. मग सकाळी पाच-साडेपाचला उठून घरासमोरच्या डोंगरावर व्यायामाला जायला सुरुवात केली…. धावायला सुरूवात केली… झाडाला लोंबकळायला सुरूवात केली…. यामुळे रोहितच्या शरीरात दोन चार महिन्यात बदल जाणवू लागले…. रोहितने आपल्या वडिलांच्या सल्ल्याने डोंगरावर असणाऱ्या किंवा माळरानावर असणारे 15 ते 20 किलो वजनाचे दगड खांद्यावर घेऊन 10 ते 12 फूट लांब फेकायला सुरूवात केली.. दिवसभरातून तो रोज असा प्रकार 40 ते 50 वेळा करू लागला. यामुळे रोहितचे दंड आणि छाती फुगू लागली…

तब्येत कमावण्यासाठी रोहितने काही विशेष आहार घेतला नाही कारण घरची परिस्थिती गरिबीची असल्याने त्याला फळं खाणं, दूध पिणं किंवा सप्लिमेंट खाणं परवडणारं नाही, हे त्याने जाणलं. मग रोहितची आई सकाळी रोहितला लवकर जेवणं लागतं म्हणून रात्रीच्या वेळीच रोहितसाठी जेवण बनवून ठेवायची… रोहितने पाच, साडेपाचला उठून व्यायाम केला की सकाळी साडे सहा वाजता त्याचं पहिल्या वेळचं जेवण असतं. मग घरच्यांबरोबर परत 10 वाजण्याच्या सुमारास तो जेवण करतो… परत दुपारच्या वेळी आणि संध्याकाळी 5 वाजता तो जेवण करतो. तसंच संध्याकाळी 9 वाजता घरच्यांबरोबर तो जेवण करतो. असं दिवसातून तो 5 वेळा जेवण करतो.

व्यायाम करताना आजूबाजूला सगळा निसर्ग भकास जाणवायचा…. नजर जाईल तिकडे नुसतं माळरान… मग रोहितने हेच उजाड माळरान हिरवंगार करण्याचा चंग बांधला… आमिर खान यांचा ‘सत्य मेव जयते’ या कार्यक्रमातली चिमणीची कथा ऐकली आणि ती कथा पाहून प्रेरित झालो… दुष्काळाची आग कायम कायमची मिटावी, म्हणून प्रयत्न करायला सुरूवात केल्याचं रोहित सांगतो. त्यातूनच त्याने आणि त्याच्या बहिणीने विहीर खोदली…. चारी खोदल्या… त्यात पाणी जिरवलं… अन् मग हजारो झाडं लावली आणि डोक्यावरून पाण्याचे कॅन वाहून ती झाडं जगवलीसुद्धा.. या कामात त्याला त्याची बहीण रक्षिताची त्याला मोलाची साथ मिळाल्याचं रोहित सांगतो.

रोहितच्या गावात बारमाही दुष्काळ होता. गावात पडलेला दुष्काळ नुसता पाहत बसण्यापेक्षा आपण जर पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून श्रमदानाच्या कामात झोकून द्यायला सुरुवात केली तर आपण गावाचं रुपडं पालटू शकतो, असा विचार त्याने केला. झाडं लावण्याबरोबर ती जगली पाहिजेत, असा मानस ठेऊन त्यादृष्टीने त्याने काम केलं… तसंच मुके जीव पाण्यावाचून तडफडत असतात. त्यांना दोन घोट पाणी मिळावं म्हणून रोहितने खास त्यांच्यासाठी विहीर खोदली.

या सर्व कामातून आणि पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून रोहितची अभिनेते आमिर खान यांची पुण्याच्या बालेवाडी स्टेडियममध्ये भेट झाली. रोहितला पाहिल्याबरोबर ‘व्वा ….. तब्येत असावी तर अशी’…, असं आमिर खान म्हणाल्याचं रोहित सांगतो. आमिर खान यांनी स्तुती केल्यावर मला आभाळ ठेंगण झालं होतं, अशी भावना रोहितने व्यक्त केली. तसंच आमिर खान यांनी घरी येऊन भेटण्याची इच्छा व्यक्त केल्याचंही रोहितने बोलताना सांगितलं.

घरची परिस्थिती गरिबीची… रोज करीन तेव्हा खाईल, अशी कुटुंबावर वेळ…. आई घरकाम करते तर वडील गवंडी काम करतात… रोहित सध्या कला शाखेच्या द्वितीय वर्षामध्ये शिकत आहे. पुढे भारताच्या सैन्यामध्ये भरती होऊन देशसेवा करण्याचं स्वप्न असल्याचं रोहित सांगतो.. जिवंत असेपर्यंत काळ्या आईची आणि भारतमातेची सेवा करण्याची भावना बोलून दाखवताना देशभक्तीची व्याख्या काय असते, हे रोहित नकळतपणे सांगून जातो.

तरुण पिढीकडे पाहिलं तर सध्याचे तरूण (काही अपवाद वगळता) व्यसनात अडकले आहेत. तसंच अनेक नादाच्या पायी ते आपल्या आयुष्याची महत्त्वाची वर्ष वाया घालवताना पाहायला मिळतात. पण मला त्यांना सांगायचंय की ध्येय डोळ्यासमोर ठेवा आणि त्या दृष्टीने मेहनत करा, जगात काहीच अशक्य नाही, असा संदेश रोहितने आजच्या तरुण पिढीला दिलाय. तसंच मी जीवनभर निर्व्यसनी राहणार आहे, असं सांगत तरूण पिढीनेही व्यसनाकडे वळू नये, अशी कळकळीची विनंती रोहित करतो.

आजपर्यंत कोणतीही मदत आम्हाला मिळाली नाही. पण जर कुणी आम्हाला मदत केली किंवा मदत मिळाली तर रोहितने पाहिलेली आभाळभर स्वप्न पूर्ण करण्याला तुमचा मदतीचा हात लागेल तसंच आमच्या कामाला देखील हुरूप येईल, असं रोहितने आणि त्याचे वडिल शंकर बनसोडे यांनी सांगितलं.

(Gondwale Satara Rohit Bansode Journey Paani Foundation Amir Khan)

हे ही वाचा

Special Story | ‘दुसऱ्या लफड्याची तिसरी गोष्ट’; मुंडेंना राजकीय किंमत मोजावी लागणार?

Special Story : 2021 मध्ये इलेक्ट्रिक कार्सचा जलवा, टाटा, महिंद्रा ते टेस्ला, अनेक बड्या कंपन्या शानदार कार लाँच करणार

Special story | ठाकरे सरकारमधील मंत्र्यावर गंभीर आरोप, फडणवीसांच्या काळात कितींचे राजीनामे?

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
Akhil Chitre : पाकिस्तानच्या बॉर्डरवर आलोय का? अखिल चित्रे पोलीस अधिकाऱ्यात जुंपली; आंदोलकांना ताब्यात घेतल्यानं वातावरण तापलं!.

Akhil Chitre : पाकिस्तानच्या बॉर्डरवर आलोय का? अखिल चित्रे पोलीस अधिकाऱ्यात जुंपली; आंदोलकांना ताब्यात घेतल्यानं वातावरण तापलं!

मोदींच्या माफींची राहुल गांधींची नवी मागणी… मागण्यांमध्येच घोळ.

मोदींच्या माफींची राहुल गांधींची नवी मागणी… मागण्यांमध्येच घोळ

दिल्लीच्या आंदोलनावेळी कॉकरोच जनता पार्टीचे इन्स्टाग्राम सस्पेंड, पुढच्या क्षणात रिकव्हर, नेमकं काय घडलं?.

दिल्लीच्या आंदोलनावेळी कॉकरोच जनता पार्टीचे इन्स्टाग्राम सस्पेंड, पुढच्या क्षणात रिकव्हर, नेमकं काय घडलं?

मोदींचा घातपात करण्याचा कट होता का? एकनाथ शिंदे यांचा राहुल गांधींना सवाल.

मोदींचा घातपात करण्याचा कट होता का? एकनाथ शिंदे यांचा राहुल गांधींना सवाल

ICC Ranking: वनडेत गिलचं अव्वल स्थान 1 गुणाने हुकलं, मालिका पराभव आणि इतक्या धावांमुळे नुकसान.

ICC Ranking: वनडेत गिलचं अव्वल स्थान 1 गुणाने हुकलं, मालिका पराभव आणि इतक्या धावांमुळे नुकसान

जंतरमंतरवर सीजेपीचं आंदोलन? जागतिक मीडियाने काय म्हटलं?.

जंतरमंतरवर सीजेपीचं आंदोलन? जागतिक मीडियाने काय म्हटलं?