AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai-Pune : मुंबई-पुणे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी; प्रवासाचा 25 मिनिटांचा वेळ वाचणार, वाचा सविस्तर…

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील खोपोली एक्‍झिट ते कुसगाव या भागातील 13.3 किलोमीटरच्या राहिलेल्या मिसिंग लिंकचे काम एमएसआरडीसीकडून हाती घेण्यात आले आहे. या प्रकल्पामुळे बोर घाटातील सहा किलोमीटर वळणाच्या मार्गाला हा पर्यायी मार्ग उपलब्ध होणार आहे.

Mumbai-Pune : मुंबई-पुणे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी; प्रवासाचा 25 मिनिटांचा वेळ वाचणार, वाचा सविस्तर...
मुंबई-पुणे (प्रातिनिधिक छायाचित्र)Image Credit source: tv0
Reporter Ashwini Satav Doke
Reporter Ashwini Satav Doke | Edited By: Pradeep Garad | Updated on: May 30, 2022 | 11:02 AM
Share

पुणे : मुंबई-पुणे (Mumbai-Pune) अंतर आता आणखी कमी होणार आहे. प्रवासाचा वेळ वाचणार आहे. पुणे-मुंबईचे अंतर सहा किलोमीटरने कमी होणार असून त्यामुळे वेळेत 25 मिनिटांची बचत होणार आहे. या दोन्ही शहरातील अंतर कमी करणाऱ्या द्रुतगती महामार्गावरील लोणावळा ते खोपोली एक्‍झिट या भागातील पर्यायी रस्त्यासाठी तयार करण्यात येण्यात असलेल्या दोन बोगद्यांपैकी (Tunnel) एका बोगद्याचे काम जवळपास सत्तर टक्क्यांहून अधिक पूर्ण झाले आहे. डिसेंबर अखेरपर्यंत बोगद्यांचे काम शंभर टक्के पूर्ण करण्याचे लक्ष्य महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून ठेवण्यात आले आहे. मुंबई पुणे द्रुतगती मार्ग व मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार हे दोन्ही कॉरिडॉरच देखभाल, दुरुस्तीसाठी बीओटी (बांधा, वापरा व हस्तांतरित करा) या तत्त्वावर 30 वर्षाच्या कालावधीसाठी राज्य सरकारने 1999पासून एमएसआरडीसीकडे (MSRDC) हस्तांतरीत केला आहे.

दरडींमुळे डोंगरालगतची वाहतूक ठेवावी लागते बंद

मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग व मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार हे खालापूर टोल प्लाझाजवळ एकत्र मिळतात व पुढे खंडाळा एक्‍झिट येथे वेगळे होतात. अडोशी बोगदा ते खंडाळा एक्‍झिट ही रुंदी सहापदरी असून या भागात 10 पदरी वाहतूक येऊन मिळते. तसेच भागामध्ये घाट व चढ उताराचे प्रमाण जास्त असून पावसाळ्यात दरडी कोसळण्याचे प्रकार वारंवार होत असतात. त्यामुळे मुंबईकडे येणारी डोंगरालगतची एक लेन ही पावसाळ्यत बंद ठेवावी लागते. या पार्श्‍वभूमीवर मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील खोपोली एक्‍झिट ते कुसगाव या भागातील 13.3 किलोमीटरच्या राहिलेल्या मिसिंग लिंकचे काम एमएसआरडीसीकडून हाती घेण्यात आले आहे.

आठ पदरी नवा रस्ता

या प्रकल्पामुळे बोर घाटातील सहा किलोमीटर वळणाच्या मार्गाला हा पर्यायी मार्ग उपलब्ध होणार आहे. लोणावळ्यापासून सुरू होणारा हा बोगदा पुढे खोपोली एक्‍झिट इथे संपणार आहे. प्रकल्पातंर्गत दोन बोगदे व दोन व्हाया डक्‍टसह आठ पदरी नवीन रस्ता बांधण्याचे काम सुरू आहे. पुण्याकडून मुंबईला जाताना असणारा बोगदा सुमारे 9 किलोमीटर लांबीचा असणार आहे. यातील साडेसहा किलोमीटर लांबीच्या बोगद्याचे खोदकाम पूर्ण झाले आहे. या बोगद्याची रुंदी 23.5 मीटर इतकी आहे.

बोगद्याचे काम लवकरच होणार पूर्ण

मुंबईकडून पुण्याकडे येताना याच भागात एक किलोमीटर लांबीचा एक बोगदा आहे. त्या बोगद्याचे काम पूर्ण झाले आहे. पुण्याकडून मुंबईकडे जाताना सर्वांत मोठ्या लांबीचा म्हणजे नऊ किलोमीटर लांबीचा बोगदा आहे. त्याचे काम जवळपास 72 टक्के पूर्ण झाले आहे. याशिवाय दोन दरीपूल आहेत. मिसिंग लिंक प्रकल्पामुळे पुणे-मुंबई हे अंतर सहा किलोमीटरने कमी होणार आहे. यामुळे 25 मिनिटांचा वेळ वाचणार आहे. आता हे काम डिसेंबर 2023पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

Follow Us
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल