AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune rain : पुणे आणि घाट परिसरात 15 ऑगस्टपर्यंत मुसळधार! हवामान विभागाच्या अंदाजानं नुकसानग्रस्तांची चिंता वाढवली

19 ऑगस्टपर्यंतच्या आठवड्यात मध्य महाराष्ट्र, कोकण आणि गोव्यात पाऊस मोठ्या प्रमाणावर राहणार आहे. मराठवाड्याच्या दक्षिण भागात आणि मध्य महाराष्ट्रात 19 ऑगस्टपर्यंत सामान्य पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Pune rain : पुणे आणि घाट परिसरात 15 ऑगस्टपर्यंत मुसळधार! हवामान विभागाच्या अंदाजानं नुकसानग्रस्तांची चिंता वाढवली
पुणे पाऊस, संग्रहित छायाचित्रImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Aug 13, 2022 | 10:47 AM

पुणे : पुण्यात जोरदार पाऊस (Pune rain) सुरू असून येत्या काही दिवसांत शहरात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने हा अंदाज वर्तवला आहे. पुणे जिल्ह्याच्या आसपासच्या घाटमाथ्याच्या भागात 15 ऑगस्टपर्यंत अत्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, असे भारतीय हवामान अंदाज विभागाचे प्रमुख अनुपम कश्यपी (Anupam Kashyapi) यांनी सांगितले आहे. आयएमडीने शुक्रवारी जारी केलेल्या विस्तारित श्रेणीच्या अंदाजानुसार, 19 ऑगस्टपर्यंत महाराष्ट्राच्या बहुतांश भागात पाऊस सामान्य राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शुक्रवारी ताम्हिणी घाटात 24 तासांत 31.5 सेमी पाऊस झाला. अनुपम कश्यपी यांनी सांगितले, की मान्सूनची (Monsoon) स्थिती दक्षिणेकडे झुकली आहे. पुणे शहरासाठी आम्ही 15 ऑगस्टपर्यंत हलका ते मध्यम पाऊस पडणार असल्याचा अंदाज जारी केला आहे.

‘यलो अलर्ट फक्त घाट क्षेत्रांसाठी’

पुणे परिसरातील घाटमाथ्याच्या क्षेत्रांमध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे. यलो अलर्ट फक्त घाट क्षेत्रांसाठी आहे, असे कश्यपी म्हणाले. विस्तारित श्रेणीच्या अंदाजाबाबत बोलताना, कश्यपी म्हणाले, की 19 ऑगस्टपर्यंतच्या आठवड्यात मध्य महाराष्ट्र, कोकण आणि गोव्यात पाऊस मोठ्या प्रमाणावर राहणार आहे. मराठवाड्याच्या दक्षिण भागात आणि मध्य महाराष्ट्रात 19 ऑगस्टपर्यंत सामान्य पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर इतर भागांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे, असे कश्यपी म्हणाले.

20 ऑगस्ट ते 26 ऑगस्टपर्यंत सामान्य पाऊस

20 ऑगस्ट ते 26 ऑगस्ट दरम्यान असलेल्या दुसऱ्या आठवड्यातही राज्यातील बहुतांश भागात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. कश्यपी म्हणाले, की मध्य महाराष्ट्र आणि मथवाडाच्या अगदी उत्तरेला वगळता, या दोन प्रदेशांमध्ये 20 ऑगस्ट ते 26 ऑगस्टपर्यंत सामान्य पाऊस पडण्याची शक्यता आहे.

हे सुद्धा वाचा

आर्थिक नुकसान

सध्या सुरू असलेल्या पावसामुळे पुणे जिल्ह्यात मात्र मोठे नुकसान होताना दिसून येत आहे. मावळ परिसरातील काही नागरिकांच्या घरावरचे छप्पर उडाले. त्यामुळे ऐन पावसाळ्यात संबंधित कुटुंबांची मोठी गैरसोय झाली आहे. अनेक ठिकाणी झाडे, दरडी कोसळण्याच्याही घटना घडत आहेत. येत्या काळात आणखी पाऊस होणार असल्याने नुकसानग्रस्तांची चिंता अधिक वाढली आहे.

.. तर राजकारण सोडेल; अजित पवारांनी थेट सांगितलं
.. तर राजकारण सोडेल; अजित पवारांनी थेट सांगितलं.
विमान दुर्घटनेतून रमेश विश्वास कुमार कसे बचावले? पाहा थरारक व्हिडीओ
विमान दुर्घटनेतून रमेश विश्वास कुमार कसे बचावले? पाहा थरारक व्हिडीओ.
वाशी प्लाझा परिसरात मोठी दुर्घटना! भिंत खचल्याने अनेक वाहनं दबली
वाशी प्लाझा परिसरात मोठी दुर्घटना! भिंत खचल्याने अनेक वाहनं दबली.
मंत्री शिरसाट यांच्या भेटीनंतर जरांगे यांचं मोठं विधान
मंत्री शिरसाट यांच्या भेटीनंतर जरांगे यांचं मोठं विधान.
मुंबईत मुसळधार; अंधेरी सब वे वाहतुकीसाठी बंद
मुंबईत मुसळधार; अंधेरी सब वे वाहतुकीसाठी बंद.
इंग्रजी माध्यमाच्या शाळेविरोधात अविनाश जाधव आक्रमक
इंग्रजी माध्यमाच्या शाळेविरोधात अविनाश जाधव आक्रमक.
कुंडमळा पूल अपघातात बाप-लेकाचा दुर्दैवी अंत
कुंडमळा पूल अपघातात बाप-लेकाचा दुर्दैवी अंत.
गोगावलेंची निवडणुकीपूर्वी आघोरी पूजा.. ठाकरेंच्या नेत्याचा गंभीर आरोप
गोगावलेंची निवडणुकीपूर्वी आघोरी पूजा.. ठाकरेंच्या नेत्याचा गंभीर आरोप.
आपत्ती विभागाचा अहवाल, 24 तासांत 18 मृत्यू, रायगडला रेड अलर्ट जारी
आपत्ती विभागाचा अहवाल, 24 तासांत 18 मृत्यू, रायगडला रेड अलर्ट जारी.
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतरची ड्रॉनमधून टिपलेली दृश्य
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतरची ड्रॉनमधून टिपलेली दृश्य.