AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune rain : पुण्यात मुसळधार सुरूच, मुठा नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा जलसंपदा विभागाचा इशारा

मागील काही दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असून त्यामुळे खडकवासला धरणही आता 100 टक्के भरले आहे. धरणाच्या सांडव्यातून सुरू विसर्ग वाढवून दुपारी 1 वाजता 11 हजार 900 क्युसेक करण्यात येत आहे.

Pune rain : पुण्यात मुसळधार सुरूच, मुठा नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा जलसंपदा विभागाचा इशारा
पूर्ण क्षमतेनं भरलं खडकवासला धरणImage Credit source: tv9
| Updated on: Jul 12, 2022 | 3:52 PM
Share

पुणे : मुठा नदीच्या (Mutha river) वरच्या भागातील धरणांमध्ये 10.79 टीएमसी पाणीसाठा वाढल्याने, नदीच्या बाजूला राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. राज्याच्या जलसंपदा विभागाने नागरिकांना सतर्क केले आहे. धरणांमध्ये पाणी वाढल्याने नदीत पाणी सोडण्यात आले आहे. दरम्यान, पुणे महानगरपालिकेने (Pune Municipal Corporation) शहरात 26 जुलैपर्यंत सामान्य पाणीपुरवठा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. चार धरणांच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसाने गेल्या 24 तासांत धरणांमध्ये 2 टीएमसी पाण्याची आवक वाढली आहे. मध्यरात्रीपासून खडकवासला धरणातून 2,568 क्युसेक पाणी सोडण्यात येत असल्याचे जलसंपदा विभागाच्या निवेदनात म्हटले आहे. संपूर्ण आठवडाभर पाणलोट क्षेत्रात आणखी पावसाचा अंदाज हवामान विभागाने (IMD) वर्तवला आहे. पाऊस असाच सुरू राहिला तर जिल्ह्यातील धरणे लवकरच भरण्याच्या स्थितीत येतील, असे सध्या तरी दिसत आहे.

गेल्या 24 तासांत…

गेल्या 24 तासांत पानशेतमध्ये 141 मिमी पाऊस झाला असून वरसगावमध्ये 137 मिमी, टेमघरमध्ये 170 मिमी आणि खडकवासला धरणात 60 मिमी पाऊस झाला आहे. 4 जुलै रोजी पुणे महापालिकेने गेल्या महिन्यात झालेल्या पावसाच्या कमतरतेमुळे शहराच्या भागात पाणीपुरवठा मर्यादित केला होता, ज्यामुळे पाणीसाठा 2.5 टीएमसीपर्यंत खाली आला होता. त्यानंतर रविवारी आषाढी एकादशी आणि बकरी ईद सणाच्या संदर्भात 8 ते 11 जुलैपर्यंत पुरवठा पूर्ववत केला. त्यानंतर परिस्थितीचा आढावा घेऊन पाणी व्यवस्थापनाबाबत पुढील कोणताही निर्णय घेतला जाईल, असे त्यात म्हटले होते.

पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये संततधार

मागील काही दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असून त्यामुळे खडकवासला धरणही आता 100 टक्के भरले आहे. धरणाच्या सांडव्यातून सुरू विसर्ग वाढवून दुपारी 1 वाजता 11 हजार 900 क्युसेक करण्यात येत आहे. पावसाच्या प्रमाणानुसार विसर्ग कमी किंवा जास्त केला जाणार आहे. दरम्यान, नदीकाठच्या नागरिकांना दक्षता घेण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने केली आहे. तर तिकडे पिंपरी चिंचवड शहर आणि मावळ तालुक्यातील पवना धरणाच्या पाणीसाठ्यातदेखील कमालीची वाढ आहे. 24 तासात धरण परिक्षेत्रात जोरदार पाऊस झाला. 136 मि.मी.पेक्षा अधिक पाऊस झाला आहे. त्यामुळे येथील पाण्याची समस्याही सुटणार आहे.

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.