AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bhagat Singh Koshyari : राज्यपाल भगत सिंग कोश्यारी, नका करू दुनियादारी; महाराष्ट्राविषयीच्या अपमानजनक वक्तव्याचा मनसेकडून निषेध

बई, ठाण्यातून गुजराती, राजस्थानी लोकांना बाहेर काढले तर महाराष्ट्रात पैसाच उरणार नाही. मुंबई आर्थिक राजधानी म्हणूनही ओळखली जाणार नाही, असे वादग्रस्त वक्तव्य राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांनी केले होते.

Bhagat Singh Koshyari : राज्यपाल भगत सिंग कोश्यारी, नका करू दुनियादारी; महाराष्ट्राविषयीच्या अपमानजनक वक्तव्याचा मनसेकडून निषेध
राज्यपालांवर टीका करताना हेमंत संभूसImage Credit source: tv9
| Updated on: Jul 30, 2022 | 3:28 PM
Share

पुणे : राज्यपाल भगत सिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी महाराष्ट्रासाठी आणि मराठीसाठी जे विधान केले ते अतिशय चुकीचे आहे, असे म्हणत राज्यपाल भगत सिंह कोश्यारी नका करू दुनियादारी, अशी टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस आणि राज्याचे प्रवक्ते हेमंत संभूस (Hemant Sambhus) यांनी केली आहे. ते पुण्यात बोलत होते. राज्यपाल कोश्यारी यांनी महाराष्ट्रात राहून महाराष्ट्राला अपमानास्पद असे वक्तव्य केले आहे, त्याचा सर्वच स्तरातून निषेध होत. आहे. राज्यपाल पदाचा मान कोश्यारींनी धुळीला मिळवला, अशाप्रकारची टीकाही होत आहे. त्या पार्श्वभूमीवर मनसेनेही कोश्यारींना लक्ष्य केले आहे. मराठीसाठी आक्रमक असलेल्या मनसेने राज्यपाल कोश्यारींना दुनियादारी करू नका, असे सुनावले आहे. संविधानिक पदावर असणाऱ्या व्यक्तीने अशाप्रकारचे वक्तव्य करणे अत्यंत चुकीचे असल्याचे मनसेचे (MNS) म्हणणे आहे.

‘महाराष्ट्र राज्याचा इतिहास माहीत नाही’

राज्यपाल भगत सिंग कोश्यारी, नका करू दुनियादारी असे म्हणत हेमंत संभूस यांनी कोश्यारींवर हल्ला चढवला. तुम्ही मराठी द्वेशी असल्याचे वारंवार दाखवून देत आहात. संविधानिक पदावर असताना हे विधान करणे चुकीचे आणि संतापजनक असल्याचा आरोप संभुस यांनी केला आहे. त्याचसोबत राज्यपालांना महाराष्ट्र राज्याचा इतिहास माहीत नाही, अशी जहरी टीकादेखील संभुस यांनी केली आहे.

‘आमच्याकडून स्वत: ला अपमानित करून घेऊ नका’

किती मराठी माणसांनी महाराष्ट्रासाठी रक्त सांडले आहे, हे तुम्हाला माहीत नाही. मराठी माणसांनी महाराष्ट्र उभा केला, त्या महाराष्ट्राकडे गुजराती, राजस्थानी आकर्षित झाला. तो निर्भयपणे इथे व्यवसाय करू लागला. आपण काय बोलतो, कुणाविषयी बोलतो, याचे भान कोश्यारी तुम्ही राखले पाहिजे, अशी आठवण त्यांनी करून दिली. त्याचबरोबर आमच्याकडून स्वत: ला अपमानित करून घेऊ नका, असेही ते म्हणाले.

काय म्हणाले होते कोश्यारी?

महाराष्ट्र आणि मराठी माणसांसदर्भात अपमानजनक वक्तव्य करताना कोश्यारी म्हणाले होते, की महाराष्ट्रातून विशेषत: मुंबई, ठाण्यातून गुजराती, राजस्थानी लोकांना बाहेर काढले तर महाराष्ट्रात पैसाच उरणार नाही. मुंबई आर्थिक राजधानी म्हणूनही ओळखली जाणार नाही. दरम्यान, या वक्तव्याचा राज्यभरातून तीव्र निषेध होत आहे.

फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.