AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune News | राजगड किल्ल्यावर पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला, काही जण बेशुद्ध

Pune Honey Bee attack | पुणे जिल्ह्यातील राजगड किल्ल्यावर मधमाशांनी पर्यटकांवर हल्ला केला. या हल्ल्यात काही जण बेशुद्ध झाले. जखमी पर्यटकांना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Pune News | राजगड किल्ल्यावर पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला, काही जण बेशुद्ध
honey bee attack
| Updated on: Oct 08, 2023 | 4:07 PM
Share

पुणे | 8 ऑक्टोंबर 2023 : छत्रपती शिवाजी महाराज यांची पहिली राजधानी असलेल्या राजगड किल्लावर नेहमी पर्यटकांची वर्दळ असते. पुणे शहरापासून 48 किलोमीटर अंतरावर असलेला हा किल्ला भोर गावाच्या जवळ आहे. वेल्हे तालुक्यात असलेला हा किल्ला समुद्र सपाटीपासून सुमारे 1394 मीटर उंचीवर आहे. या किल्लावर नेहमी पर्यटकांची वर्दळ असते. किल्ल्यास ऐतिहासिक महत्व असल्यामुळे शिवप्रेमींची वर्दळ असते. रविवार सुटीचा दिवस साधून राजगडावर पर्यटक आले होते. यावेळी मधमाशांनी पर्यटकांवर हल्ला केला.

मधमाशांचा हल्ला, अनेक जण जखमी

किल्ले राजगडावर रविवार असल्यामुळे पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांची चांगलीच वर्दळ होती. त्याचवेळी सकाळी अचानक पर्यटकांवर मधमाशांकडून हल्ला झाला. काही कळण्याच्या आताच मधमाशांनी अनेकांना चावा घेतला. या घटनेत 15 ते 20 जण जखमी झाले. मधमाशांच्या हल्ल्यामुळे घाबरलेल्या पर्यटकांपैकी काही जण बेशुद्ध पडले. त्यात दोन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले. या चार जणांसह इतर तेरा पर्यटक किरकोळ जखमी झाले आहे, अशी माहिती पुरातत्त्व विभागाची कर्मचारी बापू साबळे यांनी दिली आहे.

मधमाशांनी हल्ला केल्याचे हे कारण?

पुण्याच्या वेल्हा तालुक्यातील राजगड किल्ल्यावर हल्ल्याची ही घटना सुवेळा माची परिसरात घडली. या हल्ल्याची माहिती स्थानिक यंत्रणेस मिळाली. त्यानंतर वेल्हा पोलीस आणि स्थानिक यंत्रणेकडून पर्यटकांना गडावरून खाली आणण्यात आले. पर्यटकांनी लावलेल्या सुगंधी द्रव्यांमुळे मधमाशांनी हल्ला केल्याची शक्यता स्थानिक लोकांनी व्यक्त केली. पर्यटकांमध्ये डोंबिवली, मुंबई तसेच पुणे येथील सोळा जणांचा ग्रुपचा समावेश होता.

काय आहे किल्ल्याचे महत्व

छत्रपती शिवाजी महाराज यांची पहिली राजधानी राजगड होती. या किल्ल्यावर शिवाजी महाराज यांचे पुत्र राजाराम यांचा जन्म झाला. तसेच महाराजांच्या पत्नी सईबाई यांचा मृत्यू या ठिकाणी झाला. महाराज आग्रा येथून आल्यानंतर याच ठिकाणी पोहचले. या किल्ल्याच्या महादरवाजाच्या भिंतीत अफझलखानाचे शीर दफन केले आहे. अनेक घटनांचा हा किल्ला साक्षीदार असल्यामुळे पर्यटक येथे नेहमी येत असतात.

चंद्रपूरमध्ये भाजपची ठाकरेंच्या सेनेला ऑफर? महापौर कोणाचा; चर्चा सुरु
चंद्रपूरमध्ये भाजपची ठाकरेंच्या सेनेला ऑफर? महापौर कोणाचा; चर्चा सुरु.
बारामतीत होणारी पोटनिवडणूक एकतर्फी? संजय शिरसाट नेमकं काय म्हणाले?
बारामतीत होणारी पोटनिवडणूक एकतर्फी? संजय शिरसाट नेमकं काय म्हणाले?.
PF Withdrawal Update : खोटं बोलून PF काढताय? लगेच थांबा
PF Withdrawal Update : खोटं बोलून PF काढताय? लगेच थांबा.
नवी मुंबईत मद्यधुंद इनोवा चालकाची वाहनांना धडक | VIDEO
नवी मुंबईत मद्यधुंद इनोवा चालकाची वाहनांना धडक | VIDEO.
जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील पनवेल टोल नाक्यावर गोंधळ
जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील पनवेल टोल नाक्यावर गोंधळ.
रहेजाच्या ऑफिसची तोडफोड; वंचितचे कार्यकर्ते अटकेत
रहेजाच्या ऑफिसची तोडफोड; वंचितचे कार्यकर्ते अटकेत.
संघाच्या शाखेत राजकारण होत नाही! मोहन भागवतांनी स्पष्टच सांगित
संघाच्या शाखेत राजकारण होत नाही! मोहन भागवतांनी स्पष्टच सांगित.
फडणवीसांकडून मेक इन इंडिया व औद्योगिक विकासावर भर
फडणवीसांकडून मेक इन इंडिया व औद्योगिक विकासावर भर.
भारताची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर जाणार! फडणवीसांनी व्यक्त केला
भारताची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर जाणार! फडणवीसांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाला सलमान खान आला म्हणून काय बिघडलं? संजय शिरसाट यांचा प्रश्न
कार्यक्रमाला सलमान खान आला म्हणून काय बिघडलं? संजय शिरसाट यांचा प्रश्न.