Video | गॅस भरण्यासाठी थांबले..अन सादर केलं लावणी नृत्य, बारामतीच्या रिक्षाचालकाच्या व्हायरल व्हिडीओचं सत्य

बाबा कांबळे या रिक्षा चालकाने वाजले की बारा या लावणीवर नृत्य सादर केलं त्याचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला त्याची इनसाईड स्टोरी Baba Kamble Lavani Dance Video inside story

Video | गॅस भरण्यासाठी थांबले..अन सादर केलं लावणी नृत्य, बारामतीच्या रिक्षाचालकाच्या व्हायरल व्हिडीओचं सत्य
बाबा कांबळे, रिक्षाचालक, बारामती
Follow us
| Updated on: Mar 08, 2021 | 10:05 AM

पुणे: व्यवसायानं रिक्षाचालक असलेल्या बाबा कांबळे यांनी केलेल्या लावणी नृत्याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झालाय. गॅस भरण्यासाठी थांबलेल्या बाबा कांबळे यांनी मित्रांच्या मनोरंजनासाठी लावणीवर नृत्य केलं आणि बघता बघता त्यांचं नृत्य राज्यभर गाजलं. नटरंग चित्रपटातील जाऊद्या ना घरी वाजले की बारा या लावणीवर केलेल्या नृत्याला नेटकऱ्यांनी तुफान प्रतिसाद दिला आहे. ( Inside story of Baba Kamble Auto Driver in Baramati Lavani Dance Video Viral on Social Media)

कसा झाला व्हिडीओ व्हायरल..?

दोन दिवसांपूर्वी बाबा कांबळे हे अन्य सहकाऱ्यांसमवेत बारामतीत माळेगाव रस्त्यावरील पंपावर आपल्या रिक्षात गॅस भरण्यासाठी गेले होते. त्यावेळी वीज नसल्यानं तीन तास थांबावं लागेल असं सांगण्यात आलं. तीन तास काय करायचं असा विचार सुरु असतानाच बाबा कांबळे यांनी एका लावणीवर नृत्य सुरु केलं.. त्यांचं हे नृत्य पाहून त्यांचे रिक्षाचालक सहकारीही तिथे आले. रस्त्यावरुन येजा करणाऱ्या नागरीकांनाही हे नृत्य पाहण्याचा मोह आवरला नाही. त्यातच काहींनी त्यांचं हे नृत्य आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केलं.. आणि बघता बघता हा व्हिडीओ राज्यभर व्हायरल झाला..

लहानपणापासून नृत्याची आवड..!

बारामती तालुक्यातल्या गुणवडी येथील रहिवासी असलेले बाबा कांबळे हे ग्रामपंचायत सदस्य आहेत.. त्यांना लहानपणापासूनच नृत्याची आवड आहे.. त्यातूनच त्यांनी विविध नृत्य प्रकार आत्मसात केलेत.. त्या दिवशी फावला वेळ मिळाला आणि मित्रांचं मनोरंजन व्हावं यासाठी हे नृत्य केल्याचं बाबा कांबळे सांगतात.

व्हायरल व्हिडीओ

बाबा कांबळे यांचा आनंद गगनात मावेना..

सहज गंमत म्हणून केलेल्या नृत्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानं बाबा कांबळेही आनंदात आहेत. आपण कधी विचारही केला नव्हता की या नृत्याचा व्हिडीओ इतका व्हायरल होईल. पण, आता व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आपला आनंद गगनात मावत नाही असं बाबा कांबळे सांगतात..

संधी मिळाली तर पुढे वाटचाल करु..

बाबा कांबळे यांच्या नृत्याला नेटकऱ्यांनी अक्षरश: डोक्यावर घेतलं आहे.. आजपर्यंत कधीच अशा पद्धतीनं प्रसिद्धी मिळाली नाही. मात्र एकाच रात्रीत आपल्याला एका व्हिडीओनं सर्वत्र प्रसिद्धी मिळवून दिलीय. आता पुढे जर संधी मिळाली तर आपण आणखी या क्षेत्रात पुढे जाण्याचा प्रयत्न करु असंही बाबा कांबळे सांगतात.

संबंधित बातम्या:

Video | मराठमोळ्या रिक्षावाल्याचं लावणी सम्राज्ञीलाही लाजवेल असे लावणी नृत्य

कुणी म्हणाले वेडी कुठली, कुणी म्हणाले खुळी… अमृता फडणवीस यांचे नवे गाणे

( Inside story of Baba Kamble Auto Driver in Baramati Lavani Dance Video Viral on Social Media)

Non Stop LIVE Update
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला.
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग.
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट.
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न.
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप.
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला.
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?.
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?.
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?.
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका.