वारकरी यंदाही विठुरायाच्या दर्शनाला मुकणार? आषाढी वारीवर कोरोनाचं सावट

सध्याची परिस्थिती पाहता आषाढी वारीवर कोरोनाचे (Coronaviurs) सावट आहे. | Ashadi ekadashi vari 2021

वारकरी यंदाही विठुरायाच्या दर्शनाला मुकणार? आषाढी वारीवर कोरोनाचं सावट
फाईल फोटो
Follow us
| Updated on: May 26, 2021 | 11:09 AM

पुणे: राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा धोका कायम असल्यामुळे वारकऱ्यांना यंदाही विठुरायाच्या दर्शनाला मुकावे लागण्याची शक्यता आहे. सध्याची परिस्थिती पाहता आषाढी वारीवर कोरोनाचे (Coronaviurs) सावट आहे. दरवर्षी वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी पायी चालत पंढरीला जातात. गेल्यावर्षी कोरोनाच्या प्रकोपामुळे आषाढीवारी रद्द झाली होती. यंदाच्या पायी वारीसंदर्भात उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार येत्या शुक्रवारी बैठक घेणार आहेत. (Ashadi ekadashi vari 2021 decision will be take soon)

त्यामुळे या बैठकीत काय निर्णय घेतला जाणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. मुंबई आणि पुणे या शहरी भागांतील कोरोना नियंत्रणात असला तरी ग्रामीण भागांमध्ये कोरोनाचा धोका अद्याप कायम आहे. राज्यातील 18 जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट जास्त आहे. त्यामुळे राज्य सरकार कोणताही धोका पत्कारायला तयार नाही.

Maharashtra Lockdown: ‘पुण्यात 1 जूनपासून सरसकट सगळीच दुकानं उघडायला परवानगी देऊ नका’

‘पुणे जिल्ह्यातील 42 गावांनी कोरोनाला वेशीवरचं रोखलं’

पुणे जिल्ह्यातील 42 गावांनी कोरोनाला वेशीवरचं रोखले आहे. जिल्ह्यातील एकूण 13 तालुक्यांमध्ये कोरोनाचे 913 रुग्ण आहेत. तर 442 गावांमध्ये सध्या कोरोनाचा एकही सक्रिय रुग्ण नाही. कोरोनाच्या दूसऱ्या लाटेचा शहरापेक्षा ग्रामीण भागात शिरकाव झाला होता. मात्र आता जिल्हा परिषदेच्या उपाययोजनांमुळे गावं कोरोनामुक्त व्हायला सुरुवात झाली आहे. तरीही 913 गावांमध्ये अजून कोरोनाचे रुग्ण असल्यानं गावात कडक निर्बंधांची अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

बारामती, दौंड,हवेली, जून्नर, मावळ, या तालुक्यातील एकही गाव कोरोनापासून सुटलं नाही. या तालुक्यांतील सगळ्याच गावात कोरोनाचा शिरकाव झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

राज्यात काल 24,136 रुग्ण सापडले; 36,176 रुग्ण कोरोनामुक्त

राज्यात मंगळवारी 24,136 नवीन रुग्णांचे निदान झाले असून, राज्यात आज 601 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झालाय. त्यामुळे मृत्यूदर हा 1.61 टक्के एवढा झालाय. राज्यात आज 24,136 नवीन रुग्ण सापडल्यानंतर आज रोजी एकूण 3,14,368 सक्रिय रुग्ण आहेत. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 56,26,155 झालीय.

संबंधित बातम्या:

Mumbai Lockdown: तोपर्यंत मुंबई अनलॉक करणं घातक; पालकमंत्र्यांचं मोठं वक्तव्य

‘मुख्यमंत्री टीव्हीवर येऊन फक्त ‘ज्ञान’ देतात, आता काहीही कारवाई करा, पण 1 जूनपासून दुकानं उघडणारच’

Maharashtra Lockdown: राज्यात 4 टप्प्यात अनलॉकिंग; काय आहे ठाकरे सरकारचा प्लॅन?

(Ashadi ekadashi vari 2021 decision will be take soon)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.