Ketan Agarwal Siya Goyal Lohgad Case : सियाची मुजोरी कायम, घराबाहेर पडताच दाखवली मिडल फिंगर, Video
Ketan Agarwal Siya Goyal Lohgad Case : केतन अग्रवाल हत्या प्रकरणात आरोपी असलेली सिया गोयल हिला काल पोलिस तिच्या घरी घेऊन गेले होते. मात्र तेथून बाहेर पडत असताना सियाची मुजोरी दिसून आली. खाली उतरताना मीडियाचे कॅमेर पाहताच सियाने अश्लील हावभाव केले, त्याचा एक व्हिडीओही समोर आला आहे.

पुण्यातील व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा मुलगा केतन याची लोहगडावरून ( Ketan Agarwal Death) ढकलून हत्या करण्यात आली. 18 जून रोजी घडलेल्या या दुर्दैवी घटनेनेन प्रचंड खळबळ माजली असून याप्रकरणी पोलिसांनी केतनची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा मित्र चेतन चौधरी यांना अटक केली. त्यांचा कसून तपास सुरू असून, दोघांच्या पोलीस कोठडीची मुदत आज (3 जुलै) संपणार आहे, त्यांना आज पुन्हा न्यायालयासमोर हजर केलं जाऊ शकतं. दरम्यान या प्रकरणात आता एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. सिया गोयल हिने जे केलं ते धक्कादायक कृत्य उघड झालंय. घरातून बाहेर पडताना तिने कथितरित्या अश्लील हावभाव केले.
केतन अग्रवाल हत्या प्रकरणाचा पोलिस विविध अनुषंगाने तपास करत असून त्याचाच एक भाग म्हणून काल पोलिसांनी सिया हिला तिच्या घरी घेऊन गेले होते. . घटनेनंतर आरोपीच्या उपस्थितीत पंचनामा करण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिस सियाच्या घरी पोहोचले होते. तिथे पोहोचल्यावर पोलिसांनी सियाचे कपडे, मोबाईल, इतर गोष्टींचा पंचनामा केला. तसेच 18 जून रोजी केतनच्या मृत्यूनंतर सिया हिने कोणते पुरावे नष्ट केले का, याचाही या दरम्यान तपास करण्यात आला.
सियाने केले अश्लील हातवारे
सियाच्या घरी तपास पूर्ण झाल्यानंतर पोलीस तिला घेऊन खाली उतरले, मात्र त्याच वेळी सियाने तिथून चालताना एक अतिशय धक्कादायक कृत्य केलं. तिच्या निवासस्थानातून सिया ही पोलिसांच्या गराड्यात बाहेर पडली. तिथे घटनेते वृत्तांकन करण्यासाठी आलेले मीडियाचे प्रतिनिधी तसचे कॅमेरामनही होते, मात्र त्यांना पाहताच सिया गोयल हिने अश्लील हावभाव केले. केतनच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सियाने मिडल फिंगर दाखवली. गजाआड असूनही तिचा मुजोरपणा काही कमी झालेला नाही, हेच तिच्या या कृत्यावरून दिसून येतं. पाहता पाहता तिचा हा व्हिडीओ वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाला असून तिची मग्रुरी पाहून युजर्स संताप व्यक्त करत आहेत.
सियाचे अश्लील वर्तन, व्हिडीओ समोर
#WATCH | Lonavala | Ketan Agarwal murder case | Police brings the accused, Siya, to her residence as the investigation into the murder of Ketan Agarwal continues pic.twitter.com/qt9OItx5vU
— ANI (@ANI) July 2, 2026
Pune, Maharashtra: Siya Goyal, accused in the Ketan Agarwal murder case, was taken by Pune Rural Police to her Market Yard residence for investigation. After the investigation was completed, while leaving the house, Siya Goyal allegedly made obscene gestures and showed the middle… pic.twitter.com/mHnQKlfRrq
— IANS (@ians_india) July 2, 2026
सियाची होणार लाय डिटेक्टर टेस्ट
दरम्यान, आता केतन अग्रवाल हत्याकांडातील सत्य लवकरच समोर येणार आहे. समोर आलेल्या माहितीनुसार मुख्य आरोपी सिया गोयल हिने तिची लाय डिटेक्टर टेस्ट म्हणजेच पॉलिग्राम चाचणी करण्यास परवानगी दिलेली आहे. सिया गोयलची बाजू मांडणारे ॲड विपुल दुशिंग यांनी, सियाने लाय डिटेक्टर चाचणी करण्यास सहमती दर्शवल्याचे सांगितलं आहे. त्यामुळे आता केतन अग्रवाल सिया गोयल आणि चेतन चौधरी यांची लाय डिटेक्टर (पॉलीग्राम) चाचणी होण्याची शक्यता आहे. मात्र ही चाचणी करण्याआधी पुणे ग्रामीण पोलिसांना न्यायालयाकडून परवानगी घ्यावी लागणार आहे. न्यायालयाने ही परवानगी देताच सियाच्या लाय डिटेक्टर चाचणीची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे.
