कोल्हापुरात अनोखं संकट, दररोज 15 हजार लसीकरण, लस घेतलेल्यांना रक्तदान करता येईना, 1600 पिशव्याच शिल्लक

कोरोनाचं संकट निर्माण झालेलं असतानाच संपूर्ण राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. (kolhapur faces acute shortage of blood)

कोल्हापुरात अनोखं संकट, दररोज 15 हजार लसीकरण, लस घेतलेल्यांना रक्तदान करता येईना, 1600 पिशव्याच शिल्लक
Blood

कोल्हापूर: कोरोनाचं संकट निर्माण झालेलं असतानाच संपूर्ण राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. कोल्हापुरात रक्तसाठ्यात केवळ 1600 रक्त पिशव्याच शिल्लक आहेत. त्यातच लस घेतल्यानंतर दात्यांना दोन महिने रक्तदान करता येत नसल्याने त्याचा थेट परिणाम कोल्हापूरच्या रक्तसाठ्यावर झाला आहे. या अनोख्या संकटामुळे कोल्हापूरच्या आरोग्य यंत्रणेचे धाबे दणाणले आहेत. (kolhapur faces acute shortage of blood)

कोल्हापूर जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा जाणवू लागला आहे. केवळ आठ दिवस पुरेल इतका रक्त साठा शिल्लक आहे. छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयासह जिल्ह्यातील सामाजिक संस्थांमध्ये केवळ 1600 रक्त पिशव्या शिल्लक आहेत. सध्या कोरोना प्रतिबंधक लस घेण्यास जिल्हा अग्रेसर आहे. दिवसभरात जवळपास 15 हजार जणांना कोरोना प्रतिबंधक लस दिली जाते. लसीकरणानंतर संबंधित नागरिकाला दोन महिने रक्तदान करता येत नाही. त्यामुळे त्याचा थेट परिणाम आहे, रक्तसाठ्यावर झाला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात संभाव्य गरज लक्षात घेऊन रक्तदानासाठी नागरिकांनी पुढे यावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केलं आहे.

अमरावतीतही रक्ताचा तुटवडा

अमरावतीत ग्रामीण भागातील उपजिल्हा रुग्णालय व महत्त्वाच्या ग्रामीण रुग्णालयात रक्ताचा पुरवठा करणाऱ्या अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालय रक्तपेढीत केवळ दोन दिवस पुरेल एवढाच साठा आहे. सध्या अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयातील रक्तपेढीत केवळ 67 बॉटल एवढेच रक्त आहे. यात प्रत्येक ग्रुपच्या दहा-पंधरा बॉटल्स आहेत. त्यामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. अमरावती जिल्हा ग्रामीण रुग्णालयातून जिल्हा स्त्री रुग्णालय, सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल व जिल्हा ग्रामीण रुग्णालयाला रक्त पुरवल्या जाते. आता मात्र अचानक रक्तसाठा कमी झाल्याने आगामी काही दिवसात रक्तासाठी धावपळ होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी रक्तदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल व जिल्हा शल्य चिकित्सक श्यामसुंदर निकम यांनी केले आहे.

5-6 दिवस पुरेल एवढाच साठा

राज्यात केवळ 5 ते 6 दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा आहे. त्यामुळे रक्तदात्यांनी रक्तदान करण्यासाठी पुढे यावे, असं आवाहन राज्याचे अन्न व औषध विभाग मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी केलं आहे. खासगी संस्था आणि राजकीय नेत्यांनी रक्तदान शिबीराचं आयोजन करावं, असं आवाहनही त्यांनी केलं आहे. तसेच राज्यात रेमडेसिव्हीर आणि इतर औषधांचा मुबलक साठा असल्याचंही त्यांनी सांगितलं.

पुण्यात रक्ताची कमतरता

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पुण्यातही रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. गेल्या वर्षापासूनच रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. सार्वजनिक रक्तदान शिबिरांमध्ये घट झाल्याने रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे नागरिकांनी आणि रक्तदात्यांनी रक्तदान करावे, असं आवाहन आरोग्य प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. (kolhapur faces acute shortage of blood)

लातूरमध्ये रक्तदान

कोरोना काळात रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन लातूरच्या चकोते ग्रुपच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात चकोते ग्रुपचे कर्मचारी, ग्राहक आणि व्यापारी यांनी सहभाग घेतला. या शिबिरात सुमारे 100 व्यक्तींनी रक्तदान केलं. चकोते ग्रुपचे संचालक अण्णासाहेब चकोते यांच्या वाढदिवसानिमित्ताने या शिबिराचे आयोजन करण्यात आलं होतं. (kolhapur faces acute shortage of blood)

संबंधित बातम्या:

नाशिकमध्ये तीन आठवड्यांचा लॉकडाऊन?; छगन भुजबळांकडून संकेत

lockdown updates: वर्धा, नंदूरबार, बीड, चांदवडमध्ये कडक लॉकडाऊन; दुकानांपासून रिक्षापर्यंत सबकुछ बंद

Corona Cases and Lockdown News LIVE : येवल्यात एका कोरोनाबाधित रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू

(kolhapur faces acute shortage of blood)

Published On - 4:15 pm, Sat, 3 April 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI