‘मला सोसावंच लागतं’, अजितदादांची सुनेत्राताईंकडे नजर आणि उपस्थितांमध्ये एकच हशा!

बारामतीमध्ये नगर परिषदेच्या स्ट्रीट लाईट आणि स्टॉर्म वॉटर लाईनच्या कामाचं भूमिपूजन आज अजित पवार यांच्या हस्ते पार पडलं.

'मला सोसावंच लागतं', अजितदादांची सुनेत्राताईंकडे नजर आणि उपस्थितांमध्ये एकच हशा!

बारामती : राज्याच्या उपमुख्यमंत्र्यालाही आपल्या ‘गृहमंत्र्यां’चा किती धाक आहे हे स्वत: अजितदादांनीच पुन्हा एकदा सांगितलं आहे. बारामतीमध्ये नगर परिषदेच्या स्ट्रीट लाईट आणि स्टॉर्म वॉटर लाईनच्या कामाचं भूमिपूजन आज अजित पवार यांच्या हस्ते पार पडलं. यावेळी अजित पवार यांच्यासह त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवारही उपस्थित होत्या. त्यावेळी अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्यानं उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकला.(Laughter in the audience after the statement made by Ajit Pawar)

बारामती शहरात बंद पाईपलाईनद्वारे आता गॅस घरपोच दिला जाणार आहे. त्याचं काम सध्या प्रगतीपथावर आहे. त्यामुळं आता तुमच्या बायकोनं गॅस घेऊन या म्हटलं तर तुम्ही सांगू शकता की गप बस, आता घरात पाईपने गॅस येतोय. तुम्ही तसं म्हणू शकता. पण मला तसं बोलता येत नाही. मला सोसावंच लागतं, असं अजित पवार म्हणाले. महत्वाची बाब म्हणजे हे बोलताना अजितदादांनी सुनेत्रा पवार यांच्याकडे नजर फिरवली आणि उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकला.

‘..तर थेट पोलिसांच्या ताब्यात देईन’

विरुद्ध बाजूने गाडी चालवू नका. आपल्याला कुणी रॉन्ग साईडने येताना दिसलं तर मी त्याला ताफा थांबवून परत पाठवतो. आता जस असं दिसलं तर थेट पोलिसांच्या ताब्यात देणार, असा इशाराच अजित पवार यांनी दिला आहे. बारामतीमध्ये कोणतेही अवैध व्यवसाय चालू देणार नाही. मी खपवून घेणार नाही, अशा शब्दात अजित पवार यांनी तंबी दिली आहे. त्याचबरोबर स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक बारामती बनवण्यासाठी अधिकाधिक वृक्ष लागवड करण्याचा सल्लाही अजित पवार यांनी बारामतीकरांना दिला आहे.

माजी आमदार रमेश थोरातांना चिमटा

जिल्हा बँकेचे अध्यक्ष आणि माजी आमदार रमेश थोरात यांना अजित पवारांनी चिमटा काढलाय. जिल्हा बँकेच्या शाखेचं सकाळी साडे सात वाजता उद्घाटन केलं. बँकेचे अध्यक्ष तथा माजी आमदार रमेश थोरातांना वाटलं कोण इतक्या सकाळी येईल. जेव्हा कार्यक्रम झाला तेव्हा त्यांना कळलं की कसं लोक विरोधकांचं डिपाझीट जप्त करतात. त्यासाठी सकाळी लवकर उठून काम करावं लागतं. तुम्हीही असं काम केलं असतं तर आमदार झाला असता, अशा शब्दात अजित पवार यांनी थोरातांना टोला लगावला.

संबंधित बातम्या :

वीजबिल भरा, अन्यथा महावितरण कंपनी अडचणीत येईल, अजित पवारांचे शेतकऱ्यांना आवाहन 

नाहीतर ठेकेदाराला बघून घेतो, उपमुख्यमंत्री अजितदादांनी भरला दम!

Laughter in the audience after the statement made by Ajit Pawar

Published On - 8:16 pm, Sun, 31 January 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI