PMPML च्या अध्यक्षपदी लक्ष्मीनारायण मिश्रांची नियुक्ती

PMPML च्या अध्यक्षपदी लक्ष्मीनारायण मिश्रांची नियुक्ती
लक्ष्मीनारायण मिश्रा

PMPML | PMPML च्या अध्यक्षपदी अधिकारी फारकाळ टिकत नाहीत, असा आजवरचा शिरस्ता आहे. गेल्या 14 वर्षात पीएमपीएलएमच्या अध्यक्षपदी 16 अधिकाऱ्यांची नियुक्ती झाली आहे.

अश्विनी सातव डोके

| Edited By: Rohit Dhamnaskar

Jul 10, 2021 | 9:14 AM

पुणे: रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांची पुणे महानगरपालिका परिवहन महामंडळाच्या (PMPML) अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्याकडे PMPML च्या व्यवस्थापकीय संचालकपदाची सूत्रेही सोपवण्यात आली आहेत. PMPML च्या अध्यक्षपदी अधिकारी फारकाळ टिकत नाहीत, असा आजवरचा शिरस्ता आहे. गेल्या 14 वर्षात पीएमपीएलएमच्या अध्यक्षपदी 16 अधिकाऱ्यांची नियुक्ती झाली आहे. (Laxminarayan Shukla will be new incharge of PMPML in Pune)

तर दुसरीकडे ठाकरे सरकारने कोरोना काळात चांगली कामगिरी करणारे नागपूरचे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांची बदली केली आहे. त्यांच्याजागी आर. विमला यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आर. विमला शनिवारी सकाळी रवींद्र ठाकरे यांच्याकडून पदभार स्वीकारतील. IAS रविंद्र ठाकरे यांना अद्याप पोस्टिंग देण्यात आलेले नाही.

पुण्यातील 23 नव्या गावांच्या वाहतुकीसाठी PMPML कडून चाचपणी

पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या 23 गावांत वाहतूक सुरु करण्याबरोबरच बस थांबे, आगारे निश्चित करण्याची प्रक्रिया पीएमपीएमएलने सुरु केली आहे. त्याबाबतचा आराखडा तयार करुन लवकरच तो महापालिकेत सादर करण्यात येणार आहे. नव्याने समाविष्ट 23 गावांपैकी 16 गावांत पीएमपीची वाहतूक सध्या सुरु आहे. मात्र, उर्वरित गावांतील वाहतूक सुरु करण्याबाबत आराखडा तयार करण्याचे काम सुरु आहे. 23 गावांपैकी किमान तीन ठिकाणी पीएमपीची आगारे उभारण्याची गरज आहे. बस थांबे, आगारे, पास केंद्र यांच्या जागांसाठी पीएमपीएमएल पहिल्या टप्प्यात आराखडा तयार करेल. त्यानंतर महापालिकेशी संपर्क साधून पीएमपीएमएलसाठी काही जागांचे आरक्षण निश्चित करण्यास सांगितले जाईल.

संबंधित बातम्या:

पुण्यातील 23 नव्या गावांच्या कचरा व्यवस्थापनाचे नियोजन, PMPML कडूनही वाहतुकीची चाचपणी

परीक्षेत पास झाल्यानंतर भरतीच रद्द; PMPML च्या नोकरीसाठी पुण्यात आंदोलन

PMPML बस सेवा सुरु करा, पुणे महापालिका आयुक्तांकडे प्रस्ताव

(Laxminarayan Shukla will be new incharge of PMPML in Pune)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें