AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PUNE | दारु विक्रेत्याचा गांधीगिरी पद्धतीने गावाच्यासमोर सत्कार, मंदीरात दिली शपथ, गावकऱ्यांच्या धाडसाचं परिसरात कौतुक

गावात अवैध पध्दतीने दारु विक्री होत असल्यामुळे अनेक वादविवाद होत होते. ग्रामस्थांनी कंठाळून दारु विक्रेत्याला याबाबत एकदा समज सुध्दा दिली होती.

PUNE | दारु विक्रेत्याचा गांधीगिरी पद्धतीने गावाच्यासमोर सत्कार, मंदीरात दिली शपथ, गावकऱ्यांच्या धाडसाचं परिसरात कौतुक
कुरुंजाई देवीची दिली शपथ, गावकरी झाले खूप, पण...Image Credit source: tv9marathi
| Updated on: Jan 14, 2023 | 7:46 AM
Share

पुणे – गावातील यात्रा कमिटीच्या बैठकीत (Village Yatra Committee meetings) गावातील अवैध दारूविक्री बंद (Stop selling illegal liquor) करण्याचे ठरले होते. त्याला न जुमानता दारूविक्री करणाऱ्या दारू विक्रेतेचा, यात्रेदरम्यान ग्रामस्थांनी गांधीगिरीने (gandhigiri) पध्दतीने सत्कार केला. त्याचबरोबर अवैध धंदा बंद करण्याची त्याला शपथ दिली. गांधीगिरीने त्याचा सन्मान करून दारू विक्री बंद करण्यासाठी विक्रेत्याला भाग पाडल्याने संपुर्ण परिसरात त्याची काल दिवसभर चर्चा होती, मारुती कचरे असं त्या दारु विक्रेत्याचं नाव असल्याची माहिती समजली आहे. विशेष म्हणजे गावातील कुरुंजाई देवीच्या यात्रेदरम्यान हा प्रकार घडला आहे. त्यामुळे संपुर्ण गावात सकारात्मक वातावरण होते.

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील कुरुंजी गावात हे सगळं गावातील ग्रामस्थांनी घडवून आणलं. यापुर्वी असं सगळं काही करायचं असं नियोजन कमिटीने ठरवलं असल्याची सुध्दा माहिती मिळाली आहे. त्यामुळे सगळे ग्रामस्थ तयारीनिशी होते. गावातील दारुविक्री बंद झाल्याने संपुर्ण गावात आनंदाचं वातावरण आहे.

गावात अवैध पध्दतीने दारु विक्री होत असल्यामुळे अनेक वादविवाद होत होते. ग्रामस्थांनी कंठाळून दारु विक्रेत्याला याबाबत एकदा समज सुध्दा दिली होती. त्यानंतरही दारुविक्री होत असल्यामुळे ग्रामस्थांनी गांधीगिरी पध्दतीची मार्ग अवलंबला आणि गावातील अवैध दारु विक्री कायमची बंद केली.

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.