Video | अहमदनगरमध्ये मृतदेहांचा खच, एकाचवेळी तब्बल 22 जणांना अग्नी, दिवसभरात 42 अत्यंसंस्कार

अहमदनगरच्या अमरधाममध्ये (Amar Dham) एकाच वेळी 22 जणांवर अंत्यसंस्कार (22 Corona Patient Funreal) करावे लागले आहेत.

Video | अहमदनगरमध्ये मृतदेहांचा खच, एकाचवेळी तब्बल 22 जणांना अग्नी, दिवसभरात 42 अत्यंसंस्कार
अहमदनगरमध्ये कोरोनाचं भयानक चित्र
Follow us
| Updated on: Apr 09, 2021 | 11:18 AM

अहमदनगर: कोरोना विषाणू संसर्गाचं भयानक रुप आता समोर येत आहे. कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणावर सामुहिक संसर्ग होतोय. काही दोन दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यातील आंबाजोगाईमध्ये एका सरणावर 8 जणांवर अंत्यंसस्कार केल्याचं समोर आलं होतं. तसाच प्रकार अहमदनगरमध्येही (Ahmednagar Corona News) समोर आला आहे. अहमदनगरच्या अमरधाममध्ये (Amar Dham) एकाच वेळी 22 जणांवर अंत्यसंस्कार (22 Corona Patient Funeral) करावे लागले आहेत. तर, दिवसभरात एकूण 42 जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. ( Ahmednagar Corona horrible reality  funeral done on 22 dead bodies at one time )

22 जणांचे सरणावर अंत्यसंस्कार  

अहमदनगर येथील अमरधाममध्ये असच ह्दयद्रावक चित्र समोर आलं असून अमरधाम मध्ये सरणावर एकाचवेळी 22 मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली. विद्युत दाहिनीत दिवसभरात 20 मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. दिवसभरात एकुण तब्बल 42 जणांवर अंत्यसंस्कार झाल्याच समोर आलंय.

अमरधाममधील ह्दयद्रावक चित्र

6 मृतदेह एकाच वेळी नेण्याची नामुष्की

अहमदनगर महापालिकेसमोर कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्याचं आव्हानं उभं राहिलं होतं. शववाहिनीतून एकाचवेळी सहा मृतदेह भरून अमरधाममध्ये नेण्याची नामुष्की महानगरपालिकेवर ओढावलीय.

अहमदनगरमधे 1270 रुग्णांचा मृत्यू

अहमदनगरमध्ये जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असुन कोरोनामुळे आत्तापर्यंत 1270 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्हा प्रशासनाने काल दिलेल्या आकडेवारीत 15 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिलीय. त्यामुळे संख्येचा ताळमेळ बसत नाही. अहमदनगर जिल्हयात सध्या 11 हजार 237 अँक्टिव्ह रुग्ण आहेत.

बीडच्या आंबाजोगाईमध्ये एकाच सरणावर 8 जणांवर अंत्यसंस्कार

अंबाजोगाईतील स्वामी रामानंद तीर्थ कोव्हिड सेंटरमध्ये कोरोनाने मृत्यू झालेल्या 8 जणांवर एकाच सरणावर अंत्यविधी करण्याची दुर्दैवी वेळ अंबाजोगाई नगर पालिकेवर आली. अंबाजोगाई नगर पालिकेने पठाण मांडवा रस्त्यावरील कोव्हिड रुग्णांच्या अंत्यसंस्काराच्या ठिकाणी एकाच सरणावर या 8 जणांना अग्निडाग दिला. यामध्ये 1 महिला असून सर्व मयत रुग्ण 60 वर्षापुढील आहेत.

दरम्यान, महाराष्ट्रात दररोज 50 हजारांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण समोर येत आहेत. गुरुवारी महाराष्ट्रात 56 हजार 286 कोरोना रुग्ण आढळले. महाराष्ट्रातमध्ये कोरोनाची दुसरी लाट असून कोरोना मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

संबंधित बातम्या:

कोरोनाचं भयाण वास्तव, अंबाजोगाईत एकाच सरणावर 8 जणांचा अंत्यविधी

कोरोनाचा विस्फोट! राज्यात 55,469 नव्या कोरोना रुग्णांचे निदान

(Ahmednagar Corona horrible reality  funeral done on 22 dead bodies at one time)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.