AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्यात सापडलेलं ५ कोटी घबाड कोणाचे? संजय राऊतांनी थेट आमदाराचे नावचं सांगितलं, म्हणाले “मिंधेंच्या…”

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात ५ कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त झाली. ही रक्कम सत्ताधारी आमदाराच्या गाडीतून सापडल्याचा दावा आहे. संजय राऊत यांनी या प्रकरणी मिंधे गटातील आमदारांवर आरोप केले आहेत.

पुण्यात सापडलेलं ५ कोटी घबाड कोणाचे? संजय राऊतांनी थेट आमदाराचे नावचं सांगितलं, म्हणाले मिंधेंच्या...
संजय राऊतांचे ट्वीट
| Updated on: Oct 22, 2024 | 8:11 AM
Share

Pune 5 Crore Cash Seized : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे काही आठवडे शिल्लक राहिले आहेत. सध्या महाराष्ट्रात आचारसंहिता सुरु आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील नाक्या-नाक्यांवर, गल्लीबोळात सर्वत्र पोलिसांचे बारीक लक्ष आहे. त्यातच काल पुण्यात खेड-शिवापूर परिसरात एका गाडीतून जवळपास 5 कोटींची रोख रक्कम जप्त करण्यात आली. ही गाडी सत्ताधारी आमदाराची असल्याचा दावा केला जात आहे. त्यातच आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या एका ट्वीटने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.

संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमाचा एक व्हिडीओ त्यांच्या अधिकृत ट्वीटरवरुन शेअर केला आहे. या व्हिडीओत पुण्यात खेड-शिवापूर परिसरातून जप्त करण्यात आलेल्या रक्कमेबद्दलची माहिती पाहायला मिळत आहे. त्यावर आता संजय राऊतांनी चांगलाच निशाणा साधला आहे. ज्या गाडीत ही रक्कम सापडली ती गाडी मिंधे टोळीतील एका आमदाराची असल्याचे त्यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे तो आमदार कोण याचाही उल्लेख त्यांनी अप्रत्यक्षरित्या केला आहे.

संजय राऊत काय म्हणाले?

“मिंधे टोळीतील एका आमदाराच्या गाडीत खेड शिवापूर टोल नाक्यावर १५ कोटी सापडले! हे आमदार कोण? काय झाडी… काय डोंगर…. मिंधे यांनी निवडणुकीसाठी प्रत्येक उमेदवारास ७५ कोटी पाठवले. १५ कोटी चा हा पहिला हप्ता! काय बापू.. किती हे खोके?” असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

नेमकं काय घडलंय?

पुणे सातारा रस्त्याने एका वाहनातून रोख रक्कम घेऊन जाणार असल्याची माहिती राजगड पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार राजगड पोलिसांनी सोमवारी दुपारपासून खेड-शिवापूर टोल नाक्यावर सापळा रचला होता. संध्याकाळी सहाच्या सुमारास एक संशयित वाहन टोल नाक्यावर आले. यावेळी या वाहनाची तपासणी करण्यात आली. त्यात पोलिसांना रोख रक्कम असल्याचे दिसून आले. यावेळी पोलिसांनी संबंधित वाहनातील रोख रक्कम जप्त केली. तसेच या वाहनातील चार जणांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या गाडीत पोलिसांना जवळपास 5 कोटींची रोख रक्कम मिळाल्याचे बोललं जात आहे.

सध्या या प्रकरणाची संपूर्ण चौकशी सुरु आहे. सध्या खेड-शिवापूर पोलीस चौकीत वरिष्ठ पोलीस आणि महसूल अधिकारी दाखल झाले आहेत. या वाहनातील रक्कमेची शहानिशा करण्याचे काम सुरु आहे. दरम्यान या वाहनात नक्की किती रक्कम होती हे अजून स्पष्ट झालेले नाही; मात्र या वाहनात मोठी रोख रक्कम असल्याचे बोलले जात आहे. ही रक्कम कोणाची? कुठे नेण्यात येणार होती? इत्यादीची पडताळणी राजगड पोलिसांकडून सुरु आहे.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.