बावधनच्या बगाड यात्रेचं आयोजन महागात पडलं, भाविकांसह बंदोबस्तावरील पोलीस बाधित, 61 जणांना कोरोना

बावधनच्या बगाड यात्रेमध्ये सहभागी झालेले भाविक आणि बंदोबस्तावर असणाऱ्या पोलिसांना कोरोना संसर्ग झाला आहे. Bavdhan Bagad Festival

बावधनच्या बगाड यात्रेचं आयोजन महागात पडलं, भाविकांसह बंदोबस्तावरील पोलीस बाधित, 61 जणांना कोरोना
बावधनची बगाड यात्रा
Follow us
| Updated on: Apr 12, 2021 | 11:59 AM

सातारा: जिल्हा प्रशासनानं दिलेले आदेश डावलून बगाड यात्रा आयोजित करणं सातारा जिल्ह्यातील बावधन येथील ग्रामस्थांना महागात पडलं आहे. बावधनच्या बगाड यात्रेमध्ये सहभागी झालेले भाविक आणि बंदोबस्तावर असणारे पोलीस असे एकूण 61 जणांना कोरोना संसर्ग झाला आहे. बगाडाला झालेली गर्दी पाहता कोरोना संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. (Maharashtra Satara Wai Taluka Bavdhan sixty one people corona infected after Bagad Festival held on Rang Panchami)

कोरोना नियम डावलून बगाड यात्रा

सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील बावधन या गावात रंगपंचमीच्या दिवशी बगाड यात्रा प्रशासनाने घालून दिलेले कोरोनाचे नियम‌ डावलुन ग्रामस्थांनी साजरी केली होती. या यात्रेसाठी हजारोंच्या संख्येने नागरिक यात्रेसाठी एकत्र आले होते.आता यात्रा झाल्यापासून गावात कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली आहे. आतापर्यंत 61 लोक कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. बावधन गावाच्या आजूबाजूच्या वाघजाईवाडी,पांढरेचीवाडी, म्हातेकरवाडीमध्ये कोरोनाचा आकडा वाढला आहे.

ग्रामस्थांसह आरोग्य अधिकारी आणि पोलीस कोरोनाबाधित

विशेष म्हणजे बावधनच्या ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत. या यात्रेच्या बंदोबस्तात असणारे 8 पोलीस कर्मचारी आणि एक पोलीस उपनिरिक्षक कोरोनाबाधित झाले आहेत. यामुळे वाई तालुक्यात कोरोनाबाधितांचा वाढता आलेख पाहायला मिळत आहे. साताऱ्यातील बावधन गावात काढलेल्या बगाड यात्रेला ग्रामस्थांसह बंदोबस्तावर असणाऱ्या पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे कोरोना संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

पंचक्रोशीतही कोरोना रुग्ण

बावधन गावाबरोबरच पंचक्रोशीतील वाघजाईवाडी, पांढरेचीवाडी, म्हातेकरवाडी गावामध्ये कोरोना रुग्ण आढळून येत आहेत.

रंगपंचमीला बगाड यात्रा

रंगपंचमी म्हणजेच 2 एप्रिलला सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील बावधनची बगाड यात्रा आज हजारोच्या संख्येने उपस्थित राहून ग्रामस्थांनी पार पाडली होती. प्रशासनानं यात्रेपूर्वी ग्रामस्थांसोबत बैठका आयोजित केल्या होत्या. त्या बैठकांमधील चर्चा डावलून बगाड यात्रा संपन्न झाली होती. यात्रेला कारणीभूत ठरलेल्या बावधन गावातील लोकांवर प्रशासनानं गुन्हे दाखल करुन त्याना अटक केली होती. मात्र, त्यानंतर जामिनावर त्यांची मुक्तता करण्यात आली होती.

सातारा जिल्ह्यातील इतर मोठ्या यात्रा रद्द

सातारा जिल्ह्यात कोरोना संसर्गामुळं जिल्हा प्रशासनाच्या आदेशानं वाई तालुक्यातील काळुबाईची यात्रा, कराड तालुक्यातील पालच्या खंडोबाची यात्रा अशा मोठ्या यात्रा रद्द करण्यात आल्या होत्या.

संबंधित बातम्या:

कोरोना आहे की गेला? साताऱ्यातील या तुफान गर्दीचं कारण काय? वाचा सविस्तर

(Maharashtra Satara Wai Taluka Bavdhan sixty one people corona infected after Bagad Festival held on Rang Panchami)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.