
Mahesh Landge criticized Ajit Pawar: माझ्यावर 70 हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचा आरोप झाला. पण ज्यांनी माझ्यावर आरोप केले मी सत्तेत त्यांच्यासोबतच बसल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. भाजप आणि राष्ट्रवादीत मोठी ठिणगी पडली. या वादात भाजपचे सर्व नेते विरुद्ध अजितदादा असा सामना रंगला आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेत दोन्ही राष्ट्रवादीविरुद्ध भाजप असा सामना होत आहे. महापालिकेतील वर्चस्व आणि सत्तेवरून सध्या भाजप आणि राष्ट्रवादीत चांगलीच जुंपल्याचे दिसून येत आहे. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यानंतर आता आमदार महेश लांडगे यांनी तर अजितदादांवर एकेरी भाषा वापरत निशाणा साधला आहे.
महेश लांडगेंची दादांवर एकेरी भाषेत टीका
पिंपरी चिंचवडमध्ये भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी अजितदादांवर एकेरी भाषेत निशाणा साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 70 हजार कोटींच्या घोटाळ्यात शिक्षा होणार असं म्हटलं अन संध्याकाळी हे भाजपमध्ये दाखल झाले.आता देवा भाऊंनी इशारा दिल्यावर आपले घोटाळे काढणारे सुद्धा जमा होणारेत, असा इशाराही लांडगे यांनी दिला. पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने अजित पवारांनी महेश लांडगेंचा भ्रष्टाचाराचा आका असा उल्लेख केला होता. त्याला त्यांनी अशा शब्दात उत्तर दिले.
त्यामुळे पिंपरी चिंचवड निवडणुकीचा आखाडा झाल्याचे म्हटले जात आहे.
आमच्या नादी लागू नका
त्यानंतर संतापलेल्या लांडगेंनी तू आमचा कार्यक्रम करणार म्हणतो, मग आम्ही काय बांगड्या घातल्यात का? असा एकेरी उल्लेख करत तुझा कार्यक्रम आमच्या लाडक्या बहिणी करतील. आमच्या नादी लागू नको, अशी एकेरी भाषेत लांडगेंनी टीका केली आहे.आता डोक्यात गदा घालण्याची वेळ आलीये, असा इशारा ही महेश लांडगेंनी थेट अजित पवारांना दिला.आपले देवा भाऊ शांत बसतात, पण एखाद्याला इशारा देतात. त्याला तो इशारा समजला की मग 70 हजारांचा घोटाळा करणारे पण आपले घोटाळा काढणारे जमा होणार आहेत, असं ही लांडगे बोलून गेलेत. त्यामुळे दादांच्या विधानाने भाजपला मिरच्या झोंबल्याची चर्चा पुण्यात रंगली आहे.
पवारांच्या नादी लागू नका
पनवेल शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला का संपला कोण जबाबदार आहे याला शहाजी बापू पाटील यांनी बाळाराम पाटलांना डिवचले. शरद पवारांच्या नादी लागू नका कधी मोदींच्या मांडीला मांडी लावून बसतील सांगता येत नाही, असा टोला शहाजीबापूंनी लगावला. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्याने जणू काही अमेरिका -युक्रेनच एकत्र बसलेत अशी बातमी आली गावात असा चिमटाही त्यांनी काढला. महानगरपालिकेच्या जागेसाठी दोघे भाऊ एकत्र आलेत निवडणुका झाल्या की एकमेकांना शिव्या देऊन तीन महिन्यात परत नाही गेलेत तर मला बोला, असा दावा त्यांनी केला. शहाजी बापू यांनी लाडकी बहीण योजना मुद्द्यावर विरोधकांवर केली टीका . नारळाच्या झाडाखाली बसून संजय राऊत हे सकाळचा भोंगा चालू करतात असा टोलाही शहाजीबापू पाटील यांनी हाणला.