Pimpri Chinchwad crime | पिंपरीत पोलिसांची मोठी कारवाई; मध्य प्रदेश मधून विक्रीसाठी आणलेले 14 पिस्तूल पकडले

Pimpri Chinchwad crime | पिंपरीत पोलिसांची मोठी कारवाई; मध्य प्रदेश मधून विक्रीसाठी आणलेले 14 पिस्तूल पकडले
प्रातिनिधीक फोटो

पिंपरी चिंचवडमधील वडमुखवाडी येथे काहीजण संशयितरित्या फिरत असल्याची माहिती पिंपरी चिंचवड पोलिसांच्या दरोडा विरोधी पथकाला मिळाली. त्यानंतर त्यांनी तिथे सापळा रचून चौघांना ताब्यात घेतले.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: प्राजक्ता ढेकळे

Jan 19, 2022 | 10:05 AM

पिंपरी – शहरात गुन्हेगारीच्या घटना वाढत असताना या दुसरीकडं गुन्ह्यांसाठी बेकायदेशीरित्या पिस्तुलाची विक्री केली जात असल्याची घटना समोर आली आहे. एका टोळीने मध्य प्रदेश मधून पिंपरी चिंचवड शहर परिसरात विक्रीसाठी आणलेले 14 पिस्टल आणि आठ जिवंत काडतुसे पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या दरोडा विरोधी पथकाने पकडले.

अशी केली कारवाई

पिंपरी चिंचवडमधील वडमुखवाडी येथे काहीजण संशयितरित्या फिरत असल्याची माहिती पिंपरी चिंचवड पोलिसांच्या दरोडा विरोधी पथकाला मिळाली. त्यानंतर त्यांनी तिथे सापळा रचून चौघांना ताब्यात घेतले. यातील एका आरोपीकडून यापूर्वी देखील 24 पिस्टल आणि 16 जिवंत काडतुसे पोलिसांनी पकडली होती. आकाश अनिल मिसाळ , रुपेश सुरेश पाटील, ऋतिक दिलीप तापकीर, अजित उर्फ विकी रामलाल गुप्ता अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. कारवाई दरम्यान पोलिसांनी त्यांच्याकडून दुचाकी, दोन पिस्टल, दोन जिवंत काडतुसे, तीन मोबाईल फोन, मिरची पूड, नायलॉन दोरी असा ऐवज पोलिसांनी जप्त केला.

पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत

अटक करण्यात आलेल्या आरोपी हे पिस्तुलांची विक्री करण्याबरोबरच पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीने आले होते. त्यांच्याजवळ दरोड्यासाठी आवश्यक असलेली साहित्यही पोलिसांनी आढळून आले आहे. हे सर्व साहित्य जप्त करण्यात आले आहे. पोलिसांनी वेळीच कारवाई केल्याने दरोड्याची घटना टाळली आहे.अटक करण्यातआरोपीना 14 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

Nashik Crime | नाशिकमध्ये महिनाभरापूर्वी प्राणप्रतिष्ठा केलेले मंदिर फोडले; दीड किलोची मूर्ती लंपास

Video : अंडी घेण्याचा प्रयत्न करणाऱ्याला मोरानं शिकवला चांगलाच धडा, झडप घातली आणि…

TDR scam | नाशिकमधील 100 कोटींच्या टीडीआर घोटाळाप्रकरणी अहवाल सादर; काय कारवाई होणार?

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें