Loudspeaker : सत्ताधारी अन् विरोधकांनी भोंग्यावरून समाजात तेढ निर्माण करणं थांबबावं, अन्यथा…; मराठा क्रांती ठोक मोर्चाचा पुण्यात इशारा

भोंग्यांच्या वादात मराठा क्रांती ठोक मोर्चाने उडी घेतली आहे. भोंगे (Loudspeaker) प्रकरणावरून राज्यात वाद थांबला नाही, तर मराठा क्रांती ठोक मोर्चा रस्त्यावर उतरेल, असा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चातर्फे देण्यात आला आहे.

Loudspeaker : सत्ताधारी अन् विरोधकांनी भोंग्यावरून समाजात तेढ निर्माण करणं थांबबावं, अन्यथा...; मराठा क्रांती ठोक मोर्चाचा पुण्यात इशारा
मराठा क्रांती ठोक मोर्चा (संग्रहित छायाचित्र)Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 27, 2022 | 3:23 PM

पुणे : सत्ताधारी आणि विरोधी पक्षाने दोन समाजात तेढ निर्माण करणे थांबवावे, असे मराठा क्रांती ठोक मोर्चाने (Maratha kranti thok morcha) म्हटले आहे. भोंग्यांच्या प्रकरणावरून मराठा क्रांती ठोक मोर्चाने सरकारवर टीका केली आहे. यानिमित्ताने भोंग्यांच्या वादातही उडी घेतली आहे. भोंगे (Loudspeaker) प्रकरणावरून राज्यात वाद थांबला नाही, तर मराठा क्रांती ठोक मोर्चा रस्त्यावर उतरेल, असा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चातर्फे देण्यात आला आहे. सध्या राज्यात भोंग्यांचा विषय तापला असून विविध पक्ष आक्रमक झाले आहेत. तर दुसरीकडे गुणरत्न सदावर्ते यांच्यावर अनेक ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. सदावर्ते यांची सनद रद्द करण्याच्या मागणीसाठी लवकरच बार कौन्सिलच्या (Bar council) अध्यक्षांची भेट घेणार असल्याचेही मराठा क्रांती मोर्चातर्फे सांगण्यात आले आहे.

एक मेला होतेय राज ठाकरेंची सभा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची 1 मे रोजी औरंगाबादमध्ये जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. राज ठाकरे यांच्या या सभेला काही राजकीय पक्षांनी विरोध केला आहे. त्यात मराठा क्रांती मोर्चाने उडी घेतली आहे. हा वाद म्हणजे दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रकार आहे. हे जर थांबले नाही, तर मराठा क्रांती ठोक मोर्चा आंदोलन करेल, असा इशारा देण्यात आला आहे.

सदावर्तेंविरोधात आक्रमक

गुणरत्न सदावर्ते यांना शरद पवारांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी झालेल्या हल्लाप्रकरणानंतर ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर त्यांची रवानगी सातारा पोलिसाांच्या ताब्यात होती. मग तिथून त्यांचा ताबा कोल्हापूर पोलिसांकडे देण्यात आला होता. दरम्यान, यानंतर कोल्हापूर आणि साताऱ्यातून जामीन मिळाल्यानंतर सदावर्ते यांना आर्थर रोड जेलमध्ये आणण्यात आले होते. तिथेही पुणे पोलीस सदावर्तेंचा ताबा घेण्यासाठी आले होते. या सर्व पार्श्वभूमीवर मराठा क्रांती ठोक मोर्चा आक्रमक झाली असून अशाप्रकारचे गुन्हे दाखल असलेल्या माणसाची सनद रद्द करावी, या मागणीसाठी बार कौन्सिलकडे जाण्याचीही तयारी मराठा क्रांती ठोक मोर्चा करीत आहे.

आणखी वाचा :

Pune Sachin Kharat : तुमचंच रक्त मनुवादी आहे, ते आधी बदलून घ्या म्हणजे बाष्कळ बडबड थांबेल, सचिन खरात यांचा संभाजी भिडेंना टोला

पुणे : पावसाळ्यापूर्वी नालेसफाई होणार, पुणे पालिकेचा दावा; मात्र आतापर्यंत नाले अन् पावसाळी गटारांची झालीय अवघी 8 टक्केच स्वच्छता

Pune accident : जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर ट्रकनं दिली दुचाकीला धडक; 10 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.