AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बिग बॉस विजेता सूरज चव्हाणला घर कधी मिळणार? अजित पवार यांनी पाहणी करत थेट सांगितले मी शब्दाचा पक्का…

Suraj Chavan and Ajit Pawar : सूरज चव्हाण याच्या 'झापुक झुपुक' सिनेमाबद्दल अजित पवार यांनी त्याला शुभेच्छा देखील दिल्यात. दोन दिवसांपूर्वी मंत्रालयाध्ये सूरज चव्हाण याने अजित पवार यांची भेट घेतली होती. त्यावेळी सूरज चव्हाण याने अजित पवार यांना घराच्या कामाची प्रगती सांगितली होती. त्यानंतर अजित पवार स्वत: त्याच्या घराची पाहणी करुन गेले.

बिग बॉस विजेता सूरज चव्हाणला घर कधी मिळणार? अजित पवार यांनी पाहणी करत थेट सांगितले मी शब्दाचा पक्का...
अजित पवार, सूरज चव्हाणImage Credit source: TV 9 Marathi
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Apr 14, 2025 | 7:17 AM
Share

Suraj Chavan and Ajit Pawar : बारामती तालुक्यातील मोढवे गावातील सूरज चव्हाण सोशल मीडियाचा स्टार आहे. परंतु बिग बॉस मराठी सिझन पाचमध्ये विजेतेपद मिळाल्यानंतर तो सुपरस्टार झाला. त्याला विजेतेपद मिळाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी त्याला घर देण्याचे आश्वासन दिले होते. विजेतेपदानंतर अजित पवार यांची सूरज चव्हाण याने भेट घेतली होती. त्यावेळी अजित पवार यांना सूरज चव्हाणकडे घर नसल्याचे समजले. अजितदादांनी लागलीच त्याला घर देण्याची सूचना केली. आता रविवारी ग्रामीण भागाच्या दौऱ्यावर असलेल्या अजित पवार यांनी सूरज चव्हाण याच्या गावी जाऊन त्याच्या घराच्या कामाचा प्रगतीचा आढावा घेतला.

दिवाळीपर्यंत घर मिळणार

उपमुख्यमंत्री अजित पवार रविवारी ग्रामीण भागाच्या दौऱ्यावर होते. बारामती तालुक्यातील पाणी पुरवठा योजनेची पाहणी करण्यासाठी ते आले होते. यावेळी ते रस्त्यावर असलेल्या सूरज चव्हाण याच्या गावात दाखल झाले. त्यांनी सूरज चव्हाण याच्या घराच्या बांधकामाच्या प्रगतीचा आढावा घेतला. ठेकेदारास बोलवून घर कधी पूर्ण होणार? अशी विचारणा केली. त्यावेळी दिवाळीपर्यंत सूरज चव्हाण स्वत:च्या घरात जाणार असल्याचे त्या ठेकेदाराने अजित पवार यांना सांगितले.

काय म्हणाले अजित पवार?

यावेळी ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलताना अजित पवार म्हणाले, मी शब्दाचा पक्का आहे. जे सांगितले ते करतोच. हे लोकांना माहीत आहे. परवाच मला सूरज चव्हाण भेटला होता. त्याने घराचे काम सुरु असल्याचे सांगितले होते. आता दिवाळीच्या आधीच त्याला त्याचे घर मिळणार आहे. ग्रामीण भागातील व्यक्तीला संधी मिळाली की तो पुढे जाऊ शकतो. हे सूरज चव्हाण याने दाखवून दिले. तो चांगले प्रयत्न करत आहे, असे अजित पवार यांनी सांगितले.

सूरज चव्हाण याच्या ‘झापुक झुपुक’ सिनेमाबद्दल अजित पवार यांनी त्याला शुभेच्छा देखील दिल्यात. दोन दिवसांपूर्वी मंत्रालयाध्ये सूरज चव्हाण याने अजित पवार यांची भेट घेतली होती. त्यावेळी सूरज चव्हाण याने अजित पवार यांना घराच्या कामाची प्रगती सांगितली होती. त्यानंतर अजित पवार स्वत: त्याच्या घराची पाहणी करुन गेले.

Follow Us
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
Abhijeet Dipake On CM Fadnavis : जेलमध्ये टाकलं तर... मीच तेच म्हणेल जे तुम्ही म्हणायचे; मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल...मुख्यमंत्री फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
Abhijeet Dipke : खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर अभिजीत दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
Abhijeet Dipke : मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; अभिजीत दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं तोंडभरून कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा