AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नणंद-दिराने तिच्या चारित्र्यावर… सासऱ्यांनी तर…; हगवणेंच्या थोरल्या सुनेने केलेल्या आरोपाचे 5 मुद्दे

वैष्णवी हगवणे प्रकरणात वेगवेगळी माहिती समोर येत आहे. हगवणेंची मोठी सून मयूरी जगतापने या प्रकरणावर मुलाखत दिली. त्यावेळी तिने कोणते मुद्दे मांडले जाणून घेऊया...

नणंद-दिराने तिच्या चारित्र्यावर... सासऱ्यांनी तर...; हगवणेंच्या थोरल्या सुनेने केलेल्या आरोपाचे 5 मुद्दे
Mayuri jagtapImage Credit source: Tv9 Marathi
| Updated on: May 22, 2025 | 5:56 PM
Share

पुण्यातील मुळशी तालुक्यातील वैष्णवी हगवणे या विवाहित महिलेने हुंड्याच्या छळामुळे आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकले आहे. वैष्णवीने आधीही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. तिचे लव्ह मॅरेज झाले होते, पण लग्नानंतर तिचा सासऱ्यांकडून छळ सुरू झाला. या प्रकरणावर हगवणे कुटुंबीयांची थोरली सून मयूरी जगतापने प्रतिक्रिया दिली. ती नेमकं काय म्हणाली जाणून घ्या…

  1. वैष्णवीचं लग्न झाल्यानंतर तिला माझ्या विरोधात भरवलं गेलं. मला तिच्या विरोधात भरवलं गेलं. मयुरीला बाळ होत नाही, तिच्याकडे तुझं बाळ देऊ नको असं तिला सांगायचे.
  2. ही घटना घडली तेव्हा माझे पती माझ्या सासू बाई आणि वैष्णवीची आईसाठी खेड मंचरला डबा घेऊन गेले होते. नवलेंची आमची आत्या आहे, तिच्या मुलीचे पती वारले होते त्यामुळे ते तिकडे गेले होते.
  3. वैष्णवी माझ्याशी बोलली जरी असती तरी मी तिची साथ दिली असती. कारण त्या घरात मी डेअरिंग दाखवली म्हणून आज जिवंत आहे. मी गप्प बसले असते तर मीही कदाचित इथे नसतेच. पण वैष्णवीने मला सांगायला हवं होतं. तिने घरच्यांना सांगायचं होतं. तिने तसं केलं नाही. नवरा आणि नणदेचं ती ऐकत गेली. माझ्याशी ती बोलली असती तरी तिला या लोकांनी मारलं असतं. इतके ते डेंजर होते. तिला त्रास होऊ नये म्हणून मी तिच्याशी बोलले नाही.
  4. दीड वर्ष आम्ही वेगळं राहत होतो. तिला अॅडमिट केलं हे आम्हाला समजलं होतं. पण ती विष प्यायली होती हे आम्हाला माहीत नव्हतं. तिला फूड पॉयझनिंग झालं असं सांगितलं गेलं होतं. कालांतराने तिने विष प्यायल्याचं आम्हाला कळलं होतं.
  5. (वैष्णवीच्या) तिच्या चारित्र्यावर संशय घेतला जात होता की नाही माहीत नाही. सासू, नणंद आणि दीर यांच्यातच सर्व चालायचं. आमच्यापर्यंत काही येत नव्हतं. माझ्या मिस्टरांनाही कधी काही कळू दिलं नाही.

काय आहे नेमकं प्रकरण?

वैष्णवी कसपटे आणि शशांक हगवणे यांचे लव्ह मॅरेज झाले होते. घरच्यांचा विरोध असूनही वैष्णवीने हे लग्न केले. वैष्णवीच्या हट्टाखातर आई-वडिलांनी मोठ्या थाटामाटात लग्न केले. या लग्नात शशांकला ५१ तोळे सोनं आणि फॉर्च्युनर गाडी देण्यात आली होती. तसेच २० हजार रुपयांचे घड्याळ देण्यात आले होते. काही चांदीच्या वस्तू देखील देण्यात आल्या होत्या. तरीही हगवणे कुटुंबियांची हाव कमी झाली नाही. सतत वैष्णवीला मारहाण करण्यात येत असे. सासरच्यांनी तिचा बराच छळ केल्याचे म्हटले जाते.

Follow Us
पुण्यात वंचित बहुजन आघाडीची काळी दिवाळी! चटणी-भाकरी खाऊन सरकारचा...
पुण्यात वंचित बहुजन आघाडीची काळी दिवाळी! चटणी-भाकरी खाऊन सरकारचा निषेध, शेतकऱ्यांसाठी अनुदानाची मागणी
सिलसिला बैठकांचा निर्णय विलीनीकरणाचा? पार्थ पवारांची पुन्हा एकदा...
NCP Merger : सिलसिला बैठकांचा निर्णय विलीनीकरणाचा? पार्थ पवारांची पुन्हा एकदा सिल्व्हर ओकवर बैठक
दोन्ही शिवसेना एकत्र... विलीनीकरणाच्या चर्चांबाबत ओमराजे निंबाळकर...
Omraje Nimbalkar : दोन्ही शिवसेना एकत्र... विलीनीकरणाच्या चर्चांबाबत ओमराजे निंबाळकरांचं मोठं विधान
पंतप्रधान मोदींवर बोलताना शिंदे गटातील नेत्याची जीभ घसरली; असं काय...
पंतप्रधान मोदींवर बोलताना शिंदे गटातील नेत्याची जीभ घसरली; असं काय म्हणाले?
दिवाळीच्या मंगलपर्वावर परळी वैजनाथ मंदिरात भाविकांची अलोट गर्दी;
दिवाळीच्या मंगलपर्वावर परळी वैजनाथ मंदिरात भाविकांची अलोट गर्दी; हर हर महादेवचा जयघोष!
नक्षलवाद्यांची आर्थिक कंबर मोडली! मोदींनी सांगितली सरकारच्या कठोर...
नक्षलवाद्यांची आर्थिक कंबर मोडली! मोदींनी सांगितली सरकारच्या कठोर निर्णयांची Inside Story
नाशिक TCS प्रकरणात मोठी अपडेट! इम्तियाज जलील, मतीन पटेल यांच्यासह...
नाशिक TCS प्रकरणात मोठी अपडेट! इम्तियाज जलील, मतीन पटेल यांच्यासह 11 जणांविरोधात पुरवणी दोषारोपपत्र दाखल
मोठी बातमी! फळबागा वाचवण्यासाठी फडणवीसांचा मोठा निर्णय; बोअरवेल...
मोठी बातमी! फळबागा वाचवण्यासाठी फडणवीसांचा मोठा निर्णय; बोअरवेल वापरण्याची...
मुख्यमंत्र्यांच्या शेतकरी दिवाळीवर संजय राऊतांचा सवाल; 5000 रुपयांत...
मुख्यमंत्र्यांच्या शेतकरी दिवाळीवर संजय राऊतांचा सवाल; 5000 रुपयांत कशी साजरी होणार दिवाळी?
दुष्काळाने शेतकरी हतबल! जनावरे विकण्याची वेळ, रोहित पवार पाहणीसाठी...
दुष्काळाने शेतकरी हतबल! जनावरे विकण्याची वेळ, रोहित पवार पाहणीसाठी गेले असताना शेतकऱ्यान मांडली व्यथा