मोठी बातमी! शरद पवारांचा सर्वात जवळचा शिलेदार अजितदादांच्या गाडीत, एकत्र प्रवास अन् चर्चेला उधाण

मोठी बातमी समोर येत आहे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एकाच गाडीतून प्रवास केला आहे. त्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे.

मोठी बातमी! शरद पवारांचा सर्वात जवळचा शिलेदार अजितदादांच्या गाडीत, एकत्र प्रवास अन् चर्चेला उधाण
| Updated on: Mar 01, 2025 | 5:37 PM

मोठी बातमी समोर येत आहे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांनी एकाच गाडीमधून प्रवास केला आहे. पुण्यातील सर्किट हाऊसपासून ते कौन्सिल हॉलपर्यंत उत्तम जानकर यांनी अजित पवार यांच्यासोबत एकाच गाडीमधून प्रवास केला आहे. उत्तम जानकर यांच्यासोबत यावेळी उमेश पाटील हे देखील उपस्थित होते. यावेळी अजित पवार, उत्तम जानकर आणि उमेश पाटील यांची जवळपास दहा मिनिटे चर्चा झाली. उत्तम जानकर यांची अजित पवार यांच्यासोबत महत्त्वाच्या विषयावर चर्चा झाल्याचं बोललं जात आहे, मात्र नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली हे अद्याप समोर येऊ शकलेलं नाहीये.

दरम्यान यावर प्रतिक्रिया देताना उमेश पाटील यांनी म्हटलं आहे की,  उजनी धरणातून माळशिरस तालुक्यात पंधरा दिवस अगोदर पाणी सोडावे, अशी जानकर यांची मागणी आहे. यासाठीच भेट घ्यायाची होती, मात्र दादांकडे गर्दी असल्यामुळे दादा म्हणाले गाडीत बसून बोलू, दादा मला आणि उत्तमराव जानकर यांना म्हणाले गाडीत बसा आपण गाडीत बोलूया, असं पाटील यांनी म्हटलं आहे. मात्र या भेटीमुळे आता चर्चेला उधाण आलं आहे.

उत्तम जानकर हे राष्ट्रवदाी शरद पवार गटाचे नेते आहेत. त्यांनी विधानसभा निवडणुकीनंतर ईव्हीएमच्या मुद्द्यावर आंदोलन उभारत सरकारची कोंडी केली आहे. निवडणुका या बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात अशी त्यांची मागणी आहे. यावरून त्यांनी आंदोलनाचा इशारा देखील दिला आहे. मात्र त्यानंतर दोनच दिवसांपूर्वी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर जयंत पाटील आणि उत्तम जानकर यांच्यासाठी सरकारनं पीएची नियुक्ती केली, या पीएंचा खर्च हा सरकारी तिजोरीमधून होणार आहे.

त्यानंतर आता उत्तम जानकर यांनी अजित पवार यांची भेट घेतली, दोघांनी एकाच गाडीतून प्रवास देखील केला. दहा मिनिटं चर्चा झाली. त्यामुळे आता चर्चेला उधाण आलं आहे.