मनसेची निवडणूक मोर्चेबांधणी, पुण्यात खांदेपालट; ‘या’ आक्रमक नेत्याकडे मोठी जबाबदारी

काही दिवसांपूर्वीच पुण्यातील मनसे नेत्यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली होती. | MNS Vasant More

मनसेची निवडणूक मोर्चेबांधणी, पुण्यात खांदेपालट; 'या' आक्रमक नेत्याकडे मोठी जबाबदारी
काही दिवसांपूर्वीच पुण्यातील मनसे नेत्यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यानंतर बुधवारी राज ठाकरे यांच्याकडून पुण्यातील पदाधिकाऱ्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.
Follow us
| Updated on: Mar 03, 2021 | 3:05 PM

पुणे: आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून (MNS) खांदेपालट करण्यात आला आहे. यामध्ये मनसेचे डॅशिंग आणि आक्रमक नेते वसंत मोरे (Vasant More) यांच्याकडे शहराध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. तर विद्यमान शहर अध्यक्ष अजय शिंदे यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे आगामी काळात पुण्यात मनसेकडून विविध मुद्द्यांवर आक्रमक भूमिका घेतली जाण्याची शक्यता आहे. (Vasant More appointed as new Pune city MNS cheif)

काही दिवसांपूर्वीच पुण्यातील मनसे नेत्यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यानंतर बुधवारी राज ठाकरे यांच्याकडून पुण्यातील पदाधिकाऱ्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. शहराध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आलेले वसंत मोरे हे आक्रमक नेतृत्त्वासाठी ओळखले जातात. त्यांनी कोरोनाच्या काळात अनेक कामे केली होती. याच कामगिरीमुळे वसंत मोरे यांच्याकडे शहराध्यक्षपद सोपवण्यात आल्याचे समजते.

रुग्णवाहिका वेळेत न मिळाल्याने संताप, पुण्यात मनसे नगरसेवकाने पालिका अधिकाऱ्याची गाडी फोडली

कोरोनामुळे निधन झालेल्या नातेवाईकाचे पार्थिव नेण्यासाठी वेळेत रुग्णवाहिका न मिळाल्याने वसंत मोरे यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्याची गाडी फोडली होती. रुग्णालयातून मृतदेह नेण्यासाठी पालिकेच्या वाहन आगाराजवळ रुग्णवाहिका मागवण्यात आली होती, परंतु वारंवार फोन करुनही रुग्णवाहिका येण्यास साडेतीन तासापेक्षा जास्त कालावधी लागला. त्यानंतर रागाच्या भरात त्यांनी अधिकाऱ्याच्या गाडीच्या काचा फोडल्या.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे सक्रिय

पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांत कृष्णकुंजवर बैठकांचं सत्र सुरु आहे. या बैठकांमध्ये राज ठाकरे विविध जिल्ह्यातील आपल्या पदाधिकाऱ्यांकडून स्थानिक पातळीवरील माहिती जाणून घेत आहेत. सोबतच कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना काही सूचना देत आहेत. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत मनसे पुन्हा एकदा जोमाने उतरेल अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

संबंधित बातम्या:

रुग्णवाहिका वेळेत न मिळाल्याने संताप, पुण्यात मनसे नगरसेवकाने पालिका अधिकाऱ्याची गाडी फोडली

“योग्य वेळी दांडक्याला हात घातला” पुणे पालिका अधिकाऱ्यांची गाडी फोडणाऱ्या मनसे नगरसेवकाचा नवा किस्सा

(Vasant More appointed as new Pune city MNS cheif)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.