Video | “योग्य वेळी दांडक्याला हात घातला” पुणे पालिका अधिकाऱ्यांची गाडी फोडणाऱ्या मनसे नगरसेवकाचा नवा किस्सा

कोरोनामुळे निधन झालेल्या नातेवाईकाचे पार्थिव नेण्यासाठी वेळेत रुग्णवाहिका न मिळाल्याने पुण्यातील मनसेचे नगरसेवक वसंत मोरे यांनी पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्याची गाडी फोडली होती (Pune MNS Corporator Vasant More)

Video | योग्य वेळी दांडक्याला हात घातला पुणे पालिका अधिकाऱ्यांची गाडी फोडणाऱ्या मनसे नगरसेवकाचा नवा किस्सा
पुण्यातील मनसे नगरसेवक वसंत मोरे
Follow us
| Updated on: Feb 14, 2021 | 5:39 PM

पुणे : कोरोनामुळे निधन झालेल्या नातेवाईकाचे पार्थिव नेण्यासाठी वेळेत रुग्णवाहिका न मिळाल्याने पुण्यातील मनसे नगरसेवकाने गेल्या वर्षी पालिका अधिकाऱ्याची गाडी फोडली होती. तेच नगरसेवक वसंत मोरे (Vasant More) उर्फ ‘तात्या’ भेटायला येणार आहेत, असं समजताच कोरोनामुळे मृत्यू झालेल्या निवृत्त शिक्षकाचं बिल माफ झालं. खुद्द वसंत मोरेंनीच सोशल मीडियावरुन हा किस्सा सांगितला आहे. (Pune MNS Corporator Vasant More who vandalizes car shares experience)

“योग्य वेळी दांडक्याला हात घातला होता, असं आजही वाटतंय. कारण आजसुद्धा कोरोनामुळे एका 72 वर्षीय ग्रामीण भागातील रिटायर्ड शिक्षक पुण्यातील एका नामांकित हॉस्पिटलमध्ये मयत झाले. मयताच्या नातेवाईकाने नुसते नाव सांगितले की, थोड्याच वेळात “तात्या” इकडे भेट द्यायला येणार आहेत. एक लाख 68 हजार माफ झाले. नुसतं नाव घेतलं की काम होतंय” असं वसंत मोरे यांनी फेसबुकवर लिहिलं आहे.

योग्य वेळी दांडक्याला हात घातला होता असं आजही वाटतय,

कारण,

आज सुद्धा कोरोनामुळे एक ७२ वर्षीय ग्रामीण भागातील रिटायर्ड…

Posted by Vasant More on Saturday, 13 February 2021

वसंत मोरेंनी गाडी का फोडली?

कोरोनामुळे निधन झालेल्या नातेवाईकाचे पार्थिव नेण्यासाठी वेळेत रुग्णवाहिका न मिळाल्याने पुण्यातील मनसेचे नगरसेवक वसंत मोरे यांनी पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्याची गाडी फोडली होती. सप्टेंबर 2020 मध्ये हा प्रकार घडला होता.

रुग्णालयातून मृतदेह नेण्यासाठी पालिकेच्या वाहन आगाराजवळ रुग्णवाहिका मागवण्यात आली होती, परंतु वारंवार फोन करुनही रुग्णवाहिका येण्यास साडेतीन तासापेक्षा जास्त कालावधी लागला, असं वसंत मोरेंनी सांगितलं होतं. त्यानंतर रागाच्या भरात त्यांनी अधिकाऱ्याच्या गाडीच्या काचा फोडल्या होत्या. (Pune MNS Corporator Vasant More who vandalizes car shares experience)

पुणे महापालिकेला इशारा

“रुग्णांना रुग्णवाहिका मिळेना आणि तुम्ही अधिकारी कसे गाडीत फिरतात?” असा सवाल विचारात नियोजन न केल्यास एकाही अधिकाऱ्याला गाडीने फिरु देणार नाही” असा इशारा त्यांनी पुणे महापालिकेला दिला होता.

“आम्ही माणूस आहोत, कोरोना भयाण परिस्थितीत माणसांना जगवा. उपाययोजना द्या रे बाबांनो, हात जोडून खूप वेळा सांगितले. लोकप्रतिनिधी असून न्याय देऊ शकत नसू, तर आम्ही नालायक असू” अशा शब्दात त्यांनी हतबलता व्यक्त केली होती. पुण्यातील मनसेच्या नगरसेविका रुपाली पाटील ठोंबरे यांनीही हा व्हिडीओ शेअर करत पालिकेवर संताप व्यक्त केला होता.

संबंधित बातम्या :

रुग्णवाहिका वेळेत न मिळाल्याने संताप, पुण्यात मनसे नगरसेवकाने पालिका अधिकाऱ्याची गाडी फोडली

(Pune MNS Corporator Vasant More who vandalizes car shares experience)

Non Stop LIVE Update
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.