AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raj Thackeray : बाळा नांदगावकरांनी कुंभमधून पाणी आणलं, म्हटलं हड… मी नाही पिणार; राज ठाकरे यांची टोलेबाजी

Raj Thackeray on Mahakumbha 2025 : महाकुंभाची जगभर चर्चा झाली. या महाकुंभा मेळ्यात कोट्यवधी लोक पोहचले. गर्दीचे आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडीत निघाले. महाकुंभाविषयीचा एक किस्सा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगताच एकच हश्या पिकला.

Raj Thackeray : बाळा नांदगावकरांनी कुंभमधून पाणी आणलं, म्हटलं हड... मी नाही पिणार; राज ठाकरे यांची टोलेबाजी
Image Credit source: मनसे कार्यक्रम
| Updated on: Mar 09, 2025 | 12:56 PM
Share

महाकुंभ 2025 मध्ये पवित्र स्नानासाठी नाना सेलिब्रिटींपासून ते दिग्गज राजकारण्यांपर्यंत आणि सर्वसामान्य नागरिकांनी डुबकी मारली. महाकुंभाची जगभर चर्चा झाली. या महाकुंभा मेळ्यात कोट्यवधी लोक पोहचले. गर्दीचे आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडीत निघाले. पिंपरी चिंचवडमध्ये आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम झाला. त्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तुफान बॅटिंग केली. महाकुंभाविषयीचा एक किस्सा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगताच एकच हश्या पिकला.

इतकी पापं करता कशाला?

राज ठाकरे यांनी एका बैठकीतील किस्सा सांगितला. त्यात काही जण बैठकीला हजर झाले नव्हते. त्यांनी याविषयी झाडाझडती घेतली होती. “मुंबईत एक बैठक लावली होती. मुंबईतील शाखा अध्यक्ष , उपाध्यक्ष हजर झाले नाहीत. त्यांची हजेरी घेतली. प्रत्येकाला विचारलं, कारणं एक एक दिली. घरचे ते आजारी, हे होतं, ते होतं. पाच सहा जणांनी सांगितलं कुंभला गेलो होतो. म्हटलं गधड्यांनो पापं करता कशाला. हेही विचारलं आल्यावर अंघोळ केली ना?” असे राज ठाकरे म्हणताच पदाधिकार्‍यांमध्ये आज खसखस पिकली.

म्हटलं हड….

आमचे बाळा नांदगावकर कमंडलूमधून पाणी घेऊन आले. म्हटलं हड.. मी नाही पिणार, असे राज ठाकरे म्हणताच कार्यक्रमस्थळी हस्याचा कडेलोट झाला. त्यांनी यावेळी धार्मिक अंधश्रद्धेवर चांगलाच आसूड ओढला. त्यांनी या गोष्टींबाबत समाजाचे प्रबोधन केले. राज ठाकरे यांनी धार्मिक अंधश्रद्धांवर हंटर हाणला.

ते म्हणाले, “मला सांगा, पूर्वीच्या काळी ठिक होतं. आता सोशल मीडिया आला. माणसं, तिथं आलेल्या बायाबिया घासतात. आणि बाळा नांदगावकर साहेब गंगेचं पाणी. अरे कोण पेईल ते पाणी. चला आताच करोना गेला. त्याच्याशी कोणाला घेणं देणं नाही. दोन वर्ष तोंडाला फडकी बांधून फिरले. तिकडे जाऊन आंघोळ करतात. मी कित्येक स्विमिंग पुल पाहिले. आधी निळे होते. नंतर हिरवे झाले. कोण जाऊन पडेल त्यात. त्याने तिथे काही तरी केलं, ते मी इथे पितो.”

श्रद्धेला काही अर्थ आहे की नाही. एक नदी या देशातील स्वच्छ नाही. आणि आम्ही काय नदीला माता. परदेशातील नद्या स्वच्छ. ते काही माता म्हणत नाही. तरी नद्या स्वच्छ. आपल्याकडे पोल्युशनचं पाणी अस्वच्छ. राजीव गांधी असल्यापासून ऐकतोय गंगा साफ होणार. मध्ये राज कपूरने पिक्चर काढला. त्यात वेगळीच गंगा, असा चिमटा त्यांनी काढताच सभागृहात हास्य पिकले.

राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.