AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raj Thackeray : खड्ड्यांच्या प्रश्नावर राज ठाकरे यांचं सडतोड उत्तर, ज्यांना मतं दिली त्यांना विचारा

Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांनी मनसे पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्यांनी जेन झी बद्दल महत्वाचं वक्तव्य केलं आहे.

Raj Thackeray : खड्ड्यांच्या प्रश्नावर राज ठाकरे यांचं सडतोड उत्तर, ज्यांना मतं दिली त्यांना विचारा
Raj Thackeray
| Updated on: Aug 14, 2026 | 12:27 PM
Share

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज मनसे पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्यांनी जेन झी बद्दल महत्वाचं वक्तव्य केलं आहे. “जेन झी वर लक्ष केंद्रीत करा. जेन झी वर फोकस करा. जेन झी मध्ये बदल घडवण्याची ताकद आहे. त्यांच्याशी समरस व्हा. पुढचं राजकारण जेन झी भोवती फिरणार आहे. त्यामुळे त्यांच्यावर लक्ष द्या” अशा सूचना राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. आज पुणे शहर कार्यालय येथे राज ठाकरेंची पदाधिकाऱ्यांसोबत बैठक पार पडली. त्यांनी पुण्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्याशी वन टू वन चर्चा केली. पुण्यातील खड्डे आणि एकतानगरमध्ये पाणी भरलेलं, त्या बद्दल विचारलं. त्यावर राज ठाकरे यांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिलं. ‘ज्यांना मतं दिली, त्यांना विचारा’ असं राज ठाकरे म्हणाले.

महाराष्ट्रात सध्या खड्ड्यांचा प्रश्न गंभीर बनलाय. रस्त्यांची दुरावस्था, खड्डे यामुळे अनेक निष्पाप नागरिकांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. नाशिकमध्ये चार ते पाच जणांचा मृत्यू खड्ड्यांमुळे झाला आहे. काही शाळकरी विद्यार्थ्यांनी रस्त्यांची दुरावस्था सांगणारे व्हिडिओ बनवले. हे व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. त्यामुळे खड्ड्यांच्या मुद्यावर राज ठाकरे यांनी ‘ज्यांना मत दिली, त्यांना विचारा’ ही प्रतिक्रिया बरच काही सांगून जाते. त्याशिवाय कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनामुळे जेन झी ची ताकद राज ठाकरे यांच्या लक्षात आली आहे. या जेन झीं च्या आंदोलनामुळे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला. म्हणून ते म्हणाले भविष्यात राजकारण जेन झी भोवती फिरणार आहे.

पक्ष संघटना बळकट करण्यावर लक्ष

राज ठाकरेंनी सध्या पक्ष बांधणीवर लक्ष केंद्रीत केलय. त्यामुळे ते सध्या विविध जिल्ह्यांच्या दौऱ्यावर आहेत. मागच्या आठवड्यात त्यांनी नाशिक दौरा केला. आज ते पुण्यामध्ये आहेत. मुंबई, पुणे, नाशिक या शहरांमध्ये मनसेचा मुख्य जनाधार आहे. या शहरांमध्ये मनसेला काही वर्षांपूर्वी चांगलं यश मिळालं होतं. आता मुंबई, पुणे, नाशिकमध्ये राज ठाकरे यांनी पक्ष संघटना बळकट करण्यावर लक्ष केंद्रीत केलं आहे.

Follow Us
उड्डाणपुलासाठी 86 कुटुंबांचे स्थलांतर, पण पर्यायी घरांचा मोठा प्रश्न!
Thakurli : उड्डाणपुलासाठी 86 कुटुंबांचे स्थलांतर, पण पर्यायी घरांचा मोठा प्रश्न! वाळवी, पाणी अन्.... रहिवाशांचा संताप
अंगारक चतुर्थीनिमित्त सिद्धिविनायक, दगडूशेठ मंदिराबाहेर भक्तांची गर्दी
Angarki Chaturthi : अंगारक संकष्टी चतुर्थीनिमित्त दर्शनासाठी रात्रीपासूनच भक्तांची गर्दी; सिद्धिविनायक अन् दगडूशेठ मंदिराबाहेर लांबच लांब रांगा
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाला अंतिम मुदत
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी दरम्यान बावनकुळे संतापले
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्हणाले...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत जाहीर
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं कारण काय?
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!