AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra News LIVE : बाहेरचे लोक येऊन माझ्या मतदार संघात अराजक माजवत आहेत – आमदार श्वेता महाले

| Edited By: | Updated on: Sep 29, 2026 | 7:33 PM
Share

Maharashtra News LIVE : निवडणूक आयोगाविरोधात विरोधकांकडून देशभरात आंदोलनाचं रणशिंग फुंकण्यात आलं आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. यासाठी काँग्रेसकडून देशभरात आंदोलनं करण्यात येत असून विरोधक रस्त्यावर उतरले आहेत.

Maharashtra News LIVE : बाहेरचे लोक येऊन माझ्या मतदार संघात अराजक माजवत आहेत - आमदार श्वेता महाले
लाइव्ह अपडेट्सImage Credit source: Tv9

LIVE NEWS & UPDATES

  • 29 Sep 2026 07:33 PM (IST)

    ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी समाजवादी पक्षाचे मुबईत आंदोलन

    ‘मतदार चोरी’च्या आरोपांविरोधात तसेच ज्ञानेश्वर कुमार यांच्या राजीनामा आणि अटकेच्या मागणीसाठी समाजवादी पार्टी मुंबई प्रदेशाच्या वतीने आंदोलन. समाजवादी पार्टीचे नेते आमदार अबू आसिम आझमी आणि नेते फरहान आझमी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन. पोलिसांनी ५ मिनिटांत आंदोलन ऊरकण्यास सांगितल्याने पक्षातील कार्यकर्ते आक्रमक

    आम्हाला राजिनामा पाहिजे… संविधानाच्या विरोधातलं काम त्यांनी केलं

    जे आधी मोदींचे गुणगाण गात होते ते आत्ता एकत्र मोर्चा काढत आहेत. त्यामुळे ठाकरेंचेया मोर्च्यात आम्हाला अद्याप निमंत्रण नाही पण ज्ञानेश कुमारच्या विरोधात जे पक्ष एकत्र येतील त्यांच्या सोबत आम्ही निश्चित राहू, असं फरहान आझमी म्हणाले.

  • 29 Sep 2026 06:49 PM (IST)

    महायुती समन्वय समितीची थोड्याच वेळात बैठक

    मंत्री शंभूराजे देसाई यांच्या शासकीय निवासस्थानी महायुती समन्वय समितीची थोड्याच वेळात बैठक सुरु होत आहे. या बैठकीला समितीचे सगळे मंत्री उपस्थित राहणार आहेत. राज्यातील दुष्काळाबाबत काय उपाय योजना करता येतील यावर चर्चा होणार असून पदवीधर निवडणूकांबाबत देखील चर्चा होण्याची शक्यता आहे.

  • 29 Sep 2026 06:37 PM (IST)

    जळगाव जिल्हा बँकेत लवकरच स्व. अजितदादा पवार यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण होणार

    जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत स्व. अजितदादा पवार यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे लवकरच अनावरण होणार आहे. १२ ते १४ ऑक्टोबरदरम्यान अनावरण सोहळ्याचे जिल्हा बँकेतर्फे नियोजन करण्यात आले आहे.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना अनावरण सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले आहे. शरद पवार यांच्यासह विविध मान्यवरांना निमंत्रण देण्याची प्रक्रिया पार पाडण्यात आली आहे.

  • 29 Sep 2026 06:19 PM (IST)

    बाहेरचे लोक येऊन माझ्या मतदार संघात अराजक माजवत आहेत – आमदार श्वेता महाले

    महायुती धर्माचं पालन सगळ्यांनी करावं , बाहेरचे लोक येऊन माझ्या मतदार संघात अराजक माजवत आहेत… चुकीची माहीती देत आहेत असा आरोप भाजप आमदार श्वेता महाले यांनी केला आहे.

  • 29 Sep 2026 03:57 PM (IST)

    ‘पैशांचा पाऊस’ पाडण्याचं आमिष दाखवणाऱ्या टोळीचा अहिल्यानगरमध्ये पर्दाफाश , तिघांना अटक

    ‘पैशांचा पाऊस’ पाडण्याचं आमिष दाखवणाऱ्या टोळीचा अहिल्यानगरमध्ये पर्दाफाश करण्यात आला असून तिघांना अटक करण्यात आली. तर आरोपींचे दोन साथीदार फरार आहेत.  स्थानिक गुन्हे शाखेने 93 लाख रुपयांच्या बनावट पाचशेच्या नोटा जप्त केल्या. वडगाव गुप्ता परिसरात छापा टाकून LCBने कारवाई केली.  25 हजार रुपयांना मालेगावातून बनावट नोटा आणल्याची कबुली आरोपींनी दिली. पैसे दुप्पट करून देण्याचं आमिष दाखवत नागरिकांची फसवणूक केल्याचा पोलिसांना संशय आहे.

  • 29 Sep 2026 03:45 PM (IST)

    जळगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचे पीक विमा कंपनीच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन

    जळगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनीच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केलं.  केळी पिक विम्याच्या रकमेपासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांनी घोषणाबाजी केली.  कंपनीने कुठलीही नोटिस न देता थेट सर्व २५ हजारांहून अधिक शेतकऱ्यांचे पीक विमा नाकरला, असा शेतकऱ्यांचा आरोप आहे.  आधीच दुष्काळी परिस्थिती त्यातच केळीच्या नुकसानीच्या विम्याची रक्कम मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात आहे.  अनेकदा आंदोलन करूनही पीक विम्याची रक्कम मिळत नसल्याने शेतकरी आक्रमक झालेत.  जोपर्यंत पिक विम्याच्या रकमेसंदर्भात ठोस लेखी मिळतं नाही तोपर्यंत ठिय्या आंदोलन मागे घेणार नाही असा इशारा शेतकऱ्यांनी दिला.

  • 29 Sep 2026 03:35 PM (IST)

    तुळजाभवानी मंदीर संस्थान दुष्काळग्रस्तांना करणार मदत

    धाराशिव –  तुळजाभवानी मंदीर संस्थान दुष्काळग्रस्तांना मदत करणार आहे.  तुळजाभवानी मंदिर संस्थान मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी लवकरच मदत करणार. दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तुळजाभवानी मंदिर संस्थान याबाबत सर्व विश्वस्तांशी चर्चा करून लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा मंदीर संस्थांनचे अध्यक्ष किर्ती किरण पुजार यांनी दिली. यापूर्वीदेखील पूर परिस्थितीमध्ये मंदीर संस्थानने मदत केली होती.

  • 29 Sep 2026 03:22 PM (IST)

    बारामती तालुक्यातील शेरेवाडीमध्ये 2 महिलांची हत्या

    पुण्यातील बारामती तालुक्यातील शेरेवाडीमध्ये 2 महिलांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या दुहेरी हत्येचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही, मात्र या हत्याकांडामुळे परिसरात प्रचंड खळबळ माजली असून भीतीचं वातावरण आहे. सुपे पोलिसांकडून मारेकऱ्यांचा शोध सुरू आहे.

  • 29 Sep 2026 03:06 PM (IST)

    अमरावती – अंजनगाव बारी परिसरात महाविद्यालयीन विद्यार्थीनीवर चाकूने हल्ला, आरोपीला अटक

    अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव बारी परिसरात महाविद्यालयीन विद्यार्थीनीवर चाकूने हल्ला करण्यात आला.  राम मेघे कॉलेज मध्ये एका युवतीवर हल्ला झाला महाविद्यालयीन तरुणीवर हल्ला होण्याची एका महिन्यातली दुसरी घटना आहे.  आरोपीने विद्यार्थीनीवर हल्ला केल, मात्र इतर विद्यार्थ्यांनी त्याला ताब्यात घेऊन चोप दिला.  हल्ल्यात जखमी झालेल्या युवतीला उपचारासाठी रीम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर आरोपी नवीन वनवानी याला अटक करण्यात आली आहे.

  • 29 Sep 2026 02:56 PM (IST)

    लाडकी बहीण योजनेमुळे आदिवासींच्या योजना बंद पडल्या-पद्माकर वळवी

    लाडकी बहीण योजनेमुळे आदिवासींच्या योजना बंद पडल्या. माजी मंत्री पद्माकर वळवींचा सरकारवर आरोप. अनुसूचित जाती-जमातींना सरकारला निधीच द्यायचा नाहीय-वळवी

  • 29 Sep 2026 02:45 PM (IST)

    जळगावच्या अमळनेर तालुक्यातील भिलाली गावात दोन गटात हाणामारीची घटना

    जळगावच्या अमळनेर तालुक्यातील भिलाली गावात दोन गटात हाणामारीची घटना. जातीवाचक शिवीगाळ केल्याच्या वादातून 2 गटात हाणामारी. मारवड पोलीस ठाण्यात दोन्ही गटाच्या 20 जणांवर गुन्हे, 18 जणांना अटक, दोघांचा शोध सुरू. गावात अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांकडून दोन वेळा पाहणी

  • 29 Sep 2026 02:36 PM (IST)

    लातूरच्या अहमदपूर पंचायत समितीमध्ये शेतकरी आक्रमक

    लातूरच्या अहमदपूर पंचायत समितीमध्ये शेतकरी आक्रमक. मंजूर झालेले अनुदान देण्यास टाळाटाळ केल्याने शेतकरी आक्रमक. शेतकरी आणि रोजगार सेवक एकमेकांच्या अंगावर धावून गेले. अनुदान वाटप करण्यासाठी 5 हजार रुपये लाच मागण्यात येत असल्याचा आरोप

  • 29 Sep 2026 02:26 PM (IST)

    अँटिलिया स्फोटक प्रकरण, सचिन वाझेला जामीन मंजूर

    सचिन वाझेला जामीन मंजूर. अँटिलिया स्फोटक प्रकरण, सचिन वाझेला जामीन मंजूर

  • 29 Sep 2026 02:24 PM (IST)

    ज्ञानेश कुमारांना जावंच लागेल- राहुल गांधी

    ज्ञानेश कुमारांना जावंच लागेल. ज्ञानेश कुमारांना राजीनामा द्यावाच लागेल. काँग्रेसच्या बैठकीत राहुल गांधींचं वक्तव्य

  • 29 Sep 2026 02:12 PM (IST)

    निलेश घायवळची खंडणीच्या गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता

    पुण्यातील निलेश घायवळ आणि त्याच्या इतर साथीदारांची विशेष मकोका न्यायालयाने खंडणीच्या गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता. निलेश घायवळ कारागृहात असताना खटला दाखल करण्यात आला होता. तक्रारदाराने माघार घेतल्याने निलेश घायवळ ची निर्दोष मुक्तता…..

  • 29 Sep 2026 01:47 PM (IST)

    खासदार विशाल पाटलांनी पत्नी आणि आईसह जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी दाखल केली उमेदवारी

    सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीमध्ये आता खासदार आपल्या पत्नीसह मैदानात उतरणार आहेत.खासदार विशाल पाटील आणि त्यांच्या पत्नी पूजा पाटील या दोघांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. जोरदार शक्ती प्रदर्शन करत खासदार विशाल पाटलांनी पत्नी पूजा पाटील आणि खासदार विशाल पाटील यांची आई शैलजा पाटील यांची उमेदवारी दाखल केली आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 21 संचालक पदांसाठी निवडणूक पार पडत आहे, यासाठी उमेदवारी दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून गेल्या दोन दिवसात 100 हून अधिक जणांनी आपली उमेदवारी दाखल केली आहे. भाजपाकडून या ठिकाणी महायुती म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्धार करण्यात आला आहे. तर सत्ताधारी काँग्रेस,राष्ट्रवादी शरद पवार पक्ष, शिवसेना ठाकरे पक्ष यांच्यासह संजयकाका पाटील यांनी सर्व पक्षीय पॅनलच्या माध्यमातून निवडणूक लढवण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. मात्र खासदारांनी आपल्याचं कुटुंबातील पत्नी व आईसह उमेदवारी अर्ज दाखल केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

  • 29 Sep 2026 01:37 PM (IST)

    नांदेड- मुखेड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रास्ता रोको आंदोलन

    नांदेड येथील मुखेड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं आहे. तास भर शेतकऱ्यांकडून रास्ता रोको करण्यात आला.  मुखेड तालुक्याचा दुष्काळी यादीमध्ये समावेश करा, शेतकऱ्यांना तात्काळ हेक्‍टरी एक लाख रुपयांची मदत जाहीर करा, शेतकऱ्यांना शंभर टक्के पिक विमा मिळवून द्या… अशा विविध मागण्यांसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी रास्ता रोको केलं आहे. आंदोलकांकडून शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

  • 29 Sep 2026 01:25 PM (IST)

    गरोदर नृत्यांगनेला जाळून टाकल्याच्या प्रकरणाचं बीड कनेक्शन

    धुळे जिल्ह्यातील जंगलात गरोदर नृत्यांगनेला जाळून टाकल्याच्या प्रकरणाचे बीड कनेक्शन समोर आलंय. मांजरसुंबा येथील एका घरात पिडीतेला अमानुष मारहाण करण्यात आली. अंतर्गत वादातून, बीड जिल्ह्यातील मांजरसुंबा चौफुली येथील एका घरात 31 वर्षीय पीडित गरोदर नृत्यांगणेला सर्व आरोपींनी एकत्र येऊन अत्यंत क्रूरपणे बेदम मारहाण केली. या मारहाणीमुळे महिला जागीच बेशुद्ध पडली. ती मृत झाल्याचे समजून पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपींनी तिला वाहनात टाकले आणि धुळ्यातील मुरुमाड टेकडी भागात नेऊन तिच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला जिवंत जाळून मारले. या हत्याकांडात बीड व धाराशिव परिसरातील सहा आरोपी निष्पन्न झाले असून, चार अटक आहेत तर दोन आरोपींचा शोध सुरू आहे.

  • 29 Sep 2026 01:12 PM (IST)

    बोरिवलीतील हॉटेलमध्ये डोशात मृत उंदीर सापडल्याचा आरोप; ग्राहकाला उलट्या

    मुंबईच्या बोरिवली पश्चिम परिसरातून अन्नाच्या स्वच्छतेबाबत धक्कादायक प्रकार समोर आला आहे बोरिवली स्टेशनजवळ एल.टी. रोडवरील राधाकृष्ण हॉटेलमध्ये खाद्यपदार्थात मृत उंदीर आढळल्याचा आरोप करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमित त्रिवेदी हे आपल्या दोन भावांसह आणि मुलासोबत या हॉटेलमध्ये दक्षिण भारतीय पदार्थ खाण्यासाठी गेले होते त्यांनी म्हैसूर मसाला डोसा ऑर्डर केला डोशाचे काही घास खाल्ल्यानंतर त्यामध्ये छोटा मृत उंदीर आढळल्याचा दावा त्यांनी केला आहे. हा प्रकार लक्षात येताच अमित त्रिवेदी यांना धक्का बसला आणि त्यांना उलट्या सुरू झाल्याचे सांगण्यात येत आहे त्यानंतर त्यांनी बोरिवली पोलिसांशी संपर्क साधून या प्रकाराची माहिती दिली. या घटनेमुळे हॉटेलमधील स्वच्छता आणि अन्नाच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत आता या प्रकरणात अन्न आणि औषध प्रशासन किंवा महापालिका प्रशासनाकडून तपासणी आणि कारवाई होते का याकडे लक्ष लागलं आहे.

  • 29 Sep 2026 12:50 PM (IST)

    प्रसिद्ध चायनीज रेस्टॉरंटमध्ये उंदरांचा सुळसुळाट

    बोरीवली पश्चिम आय सी कॉलनी परिसरातील प्रसिद्ध चायनीज रेस्टॉरंटमध्ये उंदरांचा सुळसुळाट असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हॉटेलमध्ये खाली नागरिक विश्वासाने अन्न सेवन करत असताना वरती 5 ते 6 उंदीर फिरतानाचा व्हिडिओ मनसेचे उपविभाग अध्यक्ष किरण नकाशे यांनी उघडकीस आणला आहे.

  • 29 Sep 2026 12:49 PM (IST)

    देशातून फरार असलेला निलेश घायवळ निर्दोश मुक्त

    देशातून फरार असलेला निलेश घायवळ निर्दोश मुक्त. निलेश घायवाळ आणि त्याच्या साथीदारावर लावलेल्या मोक्का मधून निर्दोष मुक्तता झाली आहे. २०२० साली जीप निलेश घायवळ याने जीप साठी खंडणी मागितली होती असा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र कोर्टाने या प्रकरणात निलेश घायवळ आणि त्याच्या साथीदाराची निर्दोष मुक्तता केली आहे

  • 29 Sep 2026 12:40 PM (IST)

    अंबरनाथच्या कल्पना हॉटेलसमोर क्रेनची ॲम्बुलन्सला धडक

    अंबरनाथच्या कल्पना हॉटेलसमोर क्रेनची ॲम्बुलन्सला धडक झाली आहे. बदलापूरहून कल्याणला पेशंट घेऊन जात होती ॲम्बुलन्स. सुदैवानं पेशंटला दुखापत नाही, मात्र ॲम्बुलन्सचं नुकसान झाले आहे.

  • 29 Sep 2026 12:20 PM (IST)

    निवडणूक आयोगावर बोलतोय तर भाजपला त्रास का होतो?- राज ठाकरे

    निवडणूक आयोगावर बोलतोय तर भाजपला त्रास का होतो? खाई त्याला खवखवे म्हणत राज ठाकरेंची भाजपवर टीका.

  • 29 Sep 2026 12:14 PM (IST)

    राजकीय पक्षाचे झेंडे मोर्चात नसतील- राज ठाकरे

    राजकीय पक्षाचे झेंडे मोर्चात नसतील, तिरंगा घेऊन मोर्चात या. स्पर्धेचा विषय नाही. अजेंडा एकाच, तो कुणी कसाही राबवावा असे राज ठाकरे म्हणाले.

  • 29 Sep 2026 12:10 PM (IST)

    4 तारखेचा मोर्चा क्रुडास कंपनी गेट ते CSMT पर्यंत- राज ठाकरे

    निवडणूक आयोगाविरोधात 4 तारखेला संयुक्त मोर्चा असेल. मुंबई महापालिकेसमोर सांगता सभा असणार. क्रुडास कंपनी गेट ते CSMT पर्यंत मोर्चा असणार. जे.जे. उड्डाणपुलावरून मोर्चा निघणार असे राज ठाकरे यांनी सांगितले.

  • 29 Sep 2026 11:58 AM (IST)

    राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत पत्रकार परिषदेला संबोधित करणार

    राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हे या पत्रकार परिषदेला संबोधित करतील, रविवारी होणाऱ्या मोर्चासंदर्भात ही पत्रकार परिषदेत महत्त्वाचे मुद्दे मांडले जाणार आहे.

  • 29 Sep 2026 11:56 AM (IST)

    त्रंबकेश्वर मध्ये शेतकऱ्यांचे रस्ता रोको आंदोलन

    त्रंबकेश्वर मध्ये शेतकऱ्यांचे रस्ता रोको आंदोलन. त्र्यंबकेश्वर तालुका दुष्काळग्रस्त यादीतून वगळल्याने आंदोलन. त्र्यंबकेश्वर मध्ये भात,नागली,मका, सोयाबीन या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान. मात्र तरी देखील नाशिक दुष्काळग्रस्त जाहीर न झाल्याने रास्ता रोको

  • 29 Sep 2026 11:54 AM (IST)

    भाजपच्या नेत्या नवनीत राणा सोयाबीनच्या नुकसानीची पाहणी

    पावसा अभावी अमरावती जिल्ह्यामधील सोयाबीन ,कपाशी पीक हातातून गेलं..भाजपच्या नेत्या नवनीत राणा सोयाबीनच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी शेताच्या बांधावर. भातकुली तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी.

  • 29 Sep 2026 11:50 AM (IST)

    राहुल गांधींचा ‘गुळगुळीत मेंदू’ आता राज ठाकरेंना प्रिय झाला का?- नवनाथ बन

    भाजप मुख्य प्रवक्ते नवनाथ बन म्हणाले की,” राहुल गांधींचा ‘गुळगुळीत मेंदू’ आता राज ठाकरेंना प्रिय झाला का?  सावरकरांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधींसोबत राज ठाकरे संवाद का साधतायत? राहुल गांधींसोबतच्या संवादाचा राज ठाकरेंनी महाराष्ट्राला खुलासा करावा. संजय राऊतांमुळे राहुल गांधींचं ‘गुळगुळीत मेंदू’चं प्रमाणपत्र बदललं का?

  • 29 Sep 2026 11:46 AM (IST)

    सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांना बदला-खासदार धैर्यशील मोहिते पाटील

    सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांना बदलण्याची मागणी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी केली होती. दुष्काळ मोर्चादरम्यान केलेल्या या वक्तव्यानंतर भाजप नेत्यांनी मोहिते पाटलांवर जोरदार पलटवार केला आहे. माजी आमदार राम सातपुते यांनी मोहिते पाटलांच्या राजकीय मर्यादांवरच बोट ठेवलं, तर शिक्षण सभापती चेतनसिंह केदार यांनी मोर्चालाच स्टंटबाजी म्हटलंय.

  • 29 Sep 2026 11:43 AM (IST)

    पुण्याच्या शिरुरमध्ये हॉटेलच्या जागेच्या वादातून तुफान हाणामारी

    पुण्याच्या शिरुरमध्ये हॉटेलच्या जागेच्या वादातून तुफान हाणामारी झाली. तोडफोड, मारहाण आणि दागिन्यांच्या प्रकरणी ७ जणांना अटक करण्यात आली आहे.

  • 29 Sep 2026 11:40 AM (IST)

    उद्धव ठाकरेसह आता संजय राऊतही शिवतीर्थ वर दाखल

    उद्धव ठाकरेसह आता संजय राऊतही शिवतीर्थ वर दाखल झाले आहेत. आता थोड्याच वेळात दोन्ही ठाकरे बंधूंची पत्रकार परिषद होणार आहे.

  • 29 Sep 2026 11:38 AM (IST)

    पत्रकार परिषदेसाठी उद्धव ठाकरे आता शिवतीर्थवर पोहोचले

    पत्रकार परिषदेसाठी उद्धव ठाकरे आता शिवतीर्थावर पोहोचले आहेत, २ ऑक्टोबर संदर्भातील मोर्चाबाबत ही बैठक होणार आहे. थोड्याच वेळात दोन्ही ठाकरे बंधूंची पत्रकार परिषद होणार आहे.

  • 29 Sep 2026 11:35 AM (IST)

    २ ऑक्टोबरच्या आंदोलनासंदर्भात ठाकरे बंधूंची बैठक

    ठाकरे बंधूंच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शिवतीर्थावर बैठक आहे. २ ऑक्टोबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर CJP चे आंदोलन असणार आहे. पोलिसांनी आंदोलनाला परवानगी नाकारली, CJPचं २ ऑक्टोबरला जेलभरो आंदोलन असणार आहे

  • 29 Sep 2026 11:33 AM (IST)

    ठाकरे बंधुंची आज पत्रकार परिषद

    ठाकरे बंधुंची आज पत्रकार परिषद होणार आहे, अनेक नेते मंडळी जमा होण्यास सुरुवात झाली आहे. उद्धव ठाकरे मातोश्रीवरुन रवाना झाले आहेत. अतिरिक्त पोलीस आयुक्त विक्रम देशमाने शिवतीर्थावर पोहोचले आहेत.

  • 29 Sep 2026 11:30 AM (IST)

    चाळीसगावात ८५ हजार हेक्टरवरील पिके करपली; शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान

    चाळीसगावात ८५ हजार हेक्टरवरील पिके करपली; शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान. ८५ हजार हेक्टर खरीप क्षेत्रातील पिकांना पावसाच्या खंडाचा मोठा फटका. साधारण दीड महिन्यापासून पाऊस गायब; उन्हाच्या तडाख्याने पिके करपली. तळेगाव महसूल मंडळातील हिरापूर, शेवरी, अंधारी, हातगाव, माळशेवगे, ब्राह्मणशेवगे आणि करजगाव परिसरात परिस्थिती अधिक गंभीर, अनेक गावांत चारा-पाणी टंचाईचे संकट

  • 29 Sep 2026 11:27 AM (IST)

    समुद्रपूर तालुक्यातील पवनगाव शिवारात वाघीण जेरबंद

    समुद्रपूर तालुक्यातील पवनगाव शिवारात वाघीण जेरबंद. बेशुद्ध करण्याची प्रक्रिया राबवून वाघिणीस पकडण्यात आले. समुद्रपूर वनपरिक्षेत्राच्या पवनगाव करूळ शिवारात घातला होता धुमाकूळ. शेतकरी, शेतमजूर वावरत होते वाघिणीच्या दहशतीखाली. वाघीण जेरबंद केल्याने नागरिकांनी सोडला सुटकेचा निष्वास. पीपल फॉर ऍनिमल वन्यजीव बचाव केंद्र, नवेगाव नागझीरा व्याघ्र प्रकल्प, समुद्रपूर वनपरिक्षेत्राच्या चमुने शीताफिने पकडले. हिंगणघाटचे आमदार समीर कुणावार यांच्याकडून पथकाचे कौतुक

  • 29 Sep 2026 11:24 AM (IST)

    मुंबईहून मडगावकडे जाणाऱ्या जनशताब्दीच्या इंजिनात बिघाड

    मुंबईहून मडगावकडे जाणाऱ्या जनशताब्दीच्या इंजिनात बिघाड झाला. दुरुस्ती केल्यानंतरही जनशताब्दीच्या इंजिनमध्ये पुन्हा बिघाड झाले. इंजिनमध्ये बिघाड झाल्याने गाडी पेण रेल्वे स्थानकातच थांबली, काहीवेळाआधी पेणमध्ये जनशताब्दी दोन तास थांबली होती.

  • 29 Sep 2026 11:21 AM (IST)

    पुणे-सगुणा चौकाजवळील बँक ऑफ इंडियाच्या चौथ्या मजल्यावर आग

    पुणे-सगुणा चौकाजवळील बँक ऑफ इंडियाच्या चौथ्या मजल्यावर आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

  • 29 Sep 2026 11:18 AM (IST)

    धुळ्यात पावसाअभावी शेतकरी संकटात; उभी पिकं जळून खाक!

    धुळ्यात पावसाअभावी शेतकरी संकटात; उभी पिकं जळून खाक! सोयाबीनवर ‘यलो मॅजिक’चा कहर; शेतकऱ्यांच्या हातात उत्पादनाची आशा मावळली. दोन महिन्यांपासून पावसाची दडी; पिकांचे तातडीने पंचनामे करण्याची मागणी. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या; शेतकऱ्यांचा प्रशासनाकडे आक्रोश. कर्जबाजारी शेतकऱ्यांना दिलासा द्या; कर्जमाफीचीही शेतकऱ्यांची मागणी

  • 29 Sep 2026 11:14 AM (IST)

    आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले

    या आंदोलनात महिला आंदोलकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग पाहायला मिळत आहे. रास्तारोको करणाऱ्या काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

  • 29 Sep 2026 11:12 AM (IST)

    उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ आझाद मैदानात आंदोलन सुरु

    CSMT ते मंत्रालयापर्यंतचा रस्ता ब्लॉक करण्याचा प्रयत्न सुरु आहे.  अनुसूचित जातींमधील उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ आंदोलन सुरु आहे. उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ आझाद मैदानात आंदोलन सुरु आहे.

  • 29 Sep 2026 11:10 AM (IST)

    उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ मुंबईत मोर्चा

    उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ मुंबईत मोर्चा सुरु आहे. CSMT स्टेशन जवळ वाहतूक कोंडी झाली आहे. भायखळाच्या दिशेने जाणाऱ्या जेजे उड्डाणपुलावर ठिय्या आंदोलन सुरु आहे.

  • 29 Sep 2026 11:08 AM (IST)

    निवडणुक आयोगातील कथित वादावरुन सुप्रीम कोर्टात याचिका

    निवडणुक आयोगातील कथित वादावरुन सुप्रीम कोर्टात याचिका. याचिकेवर सुनावणी घेण्याची सुप्रिम कोर्टाची तयारी आहे.

  • 29 Sep 2026 11:05 AM (IST)

    शिरूरमध्ये हॉटेलच्या जागेच्या वादातून तुफान हाणामारी

    शिरूर येथील बायपास रोडवर असलेल्या पाषाणमळा परिसरात हॉटेलच्या जागेच्या वादातून भीषण हाणामारी झाली आहे. हॉटेलमध्ये घुसून तोडफोड करणे, गरम चहा अंगावर फेकून भाजणे आणि सोन्याचे दागिने हिसकावून मारहाण केल्याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात तीन महिलां सह सात जणांनवर गुन्हा दाखल झाला आहे.

  • 29 Sep 2026 10:57 AM (IST)

    मातंग समाजाचा उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ मुंबईत मोर्चा, आंदोलक रस्त्यावर उतरले

    मातंग समाजाचा उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ मुंबईत मोर्चा काढण्यात आला  आहे. या आंदोलकांना आझाद मैदानात आंदोलन करण्याची परवानगी देण्यात आली होती. परंतु सरकारने जीआर काढावा, यासाठी आंदोलक थेट रस्त्यावर उतरले. त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांची धरपकड सुरू केली.

  • 29 Sep 2026 10:55 AM (IST)

    रुपाली चाकणकरांच्या तक्रारीनंतर संगीता तिवारी यांना सायबर पोलिसांची नोटीस

    पुण्यातील संगीता तिवारी यांना सायबर पोलिसांची नोटीस धाडली आहे. त्यांना आज तपासाला हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्यया आहेत.  राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्या तक्रारीनंतर पुणे सायबर पोलिसांनी संगीता तिवारी यांना तपास कामे हजर राहण्याची नोटीस पाठवली आहे. रूपाली चाकणकर यांच्या बद्दल सोशल मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमातून खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती प्रसिद्ध केल्याचा आरोप आहे.

  • 29 Sep 2026 10:50 AM (IST)

    मोहिते-पाटलांच्या माळशिरस तालुक्यात पालकमंत्री जयकुमार गोरेंच्या समर्थनार्थ बॅनरबाजी

    मोहिते-पाटलांच्या माळशिरस तालुक्यात पालकमंत्री जयकुमार गोरेंच्या समर्थनार्थ बॅनरबाजी करण्यात आली आहे. राष्ट्रवादी अजितदादा गटाच्या युवकच्या कार्याध्यक्षाकडून नातेपुते शहरात बॅनरबाजी करण्यात आली.  धैर्यशील मोहिते पाटलांनी ‘पालकमंत्री बदला’ असे विधान केले होते. त्यानंतर पालकमंत्री जयकुमार गोरेंच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी युवकच्या अक्षय भांड यांनी बॅनर लावले. माळशिरस तालुक्यातील नातेपुते शहरात ही बॅनरबाजी करण्यात आलीय. बॅनरवर दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जयकुमार गोरे यांचे फोटो लावला लावला आहे.

  • 29 Sep 2026 10:36 AM (IST)

    जनशताब्दी एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये अचानक बिघाड, प्रवाशांचा खोळंबा

    मुंबईहून मडगावकडे जाणारी जनशताब्दी एक्स्प्रेस इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मागील दोन तासांपासून पेण रेल्वे स्थानकात थांबली आहे. बिघाड झालेल्या इंजिनाऐवजी नवीन इंजिन जोडण्यात येणार असून, त्यानंतर ही गाडी पुढील प्रवासासाठी मडगावच्या दिशेने रवाना होणार आहे. त्यामुळे प्रवाशांना गेल्या दोन तासांपासून पेण रेल्वे स्थानकात प्रतीक्षा करावी लागत आहे.

  • 29 Sep 2026 10:16 AM (IST)

    मुंबईतील आंदोलनाआधी माजी आमदार हाऊस अरेस्ट

    मुंबईत मातंग समाजाच्या मोर्चात सहभागी होण्यापूर्वीच NCP चे माजी आमदार रमेश कदम यांना पोलिसांनी हाऊस अरेस्ट करण्यात आलं आहे.  रमेश कदम यांनी व्हिडिओच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना आवाहन केले की, आपल्याला आरक्षणाचा जीआर घ्यायचा आहे. जाऊ नका कुठे.. मी अकरा वाजता मेट्रो सिनेमा जवळ येतोय. तुम्ही पण या आपल्याला आरक्षणाचा जीआर घ्यायचा आहे. मी आता मातंग समाजाच्या आरक्षणाचा जीआर घेण्यासाठी आझाद मैदानाकडे येत आहे. मातंग समाजाच्या तरुणांनो, तुम्हीही मोठ्या संख्येने या’. त्यानंतर पोलिसांनी खबरदारी म्हणून रमेश कदम यांना हाऊस अरेस्ट केले.

  • 29 Sep 2026 10:05 AM (IST)

    अहिल्यानगर जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याच्या हालचालींना वेग

    अहिल्यानगर जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याच्या हालचालींना वेग आला आहे.  बाळासाहेब थोरात यांच्या पुढाकाराने संगमनेरमध्ये सर्वपक्षीय बैठक झाली आहे.  बिनविरोध निवडणुकीच्या दिशेने एक पाऊल पुढे पडल्याचं राम शिंदेंनी म्हटलं.  जिल्हा बँक ही सर्वांची आहे, कोणीही स्वतंत्र अजेंडा चालवू नये, असे राम शिंदे म्हणाले.  संचालक मंडळाबाबत सर्वांशी चर्चा करूनच निर्णय घेण्याची सर्वांची भूमिका आहे.

  • 29 Sep 2026 10:00 AM (IST)

    दुष्काळग्रस्तांना मदतीसाठी पुढे येण्याचे केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांचे आवाहन

    आर्थिक दृष्ट्या सक्षम असणाऱ्या लोकांनी महाराष्ट्रातल्या लोकप्रतिनिधी स्वतः पुढे येऊन दुष्काळसंदर्भात मदत करण्यासंदर्भात केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांचं सोशल मीडिया वरून आव्हान केले. महाराष्ट्रावर दुष्काळाचा संकट आहे त्यामुळे शेतकऱ्यांची वाईट परिस्थिती आहे. त्यामुळे लोकांनी लोकप्रतिनिधींनी पुढे येऊन मदत करण्याचं स्वतः आवाहन केलं आहे .रक्षा खडसे यांनी मुख्यमंत्री सहायता निधीला दहा लाखाचा धनादेश जिल्हाधिकाऱ्याकडे दिला आहे .इतरांनी हे पुढे येऊन गरजूवंत शेतकऱ्यांना अशा प्रकारे मदत करावी असा आव्हान सोशल मीडियावर केला आहे

  • 29 Sep 2026 09:50 AM (IST)

    सोलापूर शहरात पहाटे पासून दमदार पावसाला सुरुवात

    सोलापूर शहरात पहाटे पासून दमदार पावसाला सुरुवात झाली. सकाळपासूनच सूर्यदर्शन झाले नसून जोरदार पावसामुळे सोलापूरकर सुखावले. मागील अनेक दिवसापासून सोलापूर जिल्ह्यात पावसाने दडी मारली होती. मात्र सकाळपासून पावसाने दमदार हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले. सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला. मात्र खरीप पिके पूर्णपणे हातातून गेले असले तरी या पावसामुळे जनावरांच्या चारा निर्मितीसाठी उपयोग येऊ शकतो.

  • 29 Sep 2026 09:40 AM (IST)

    चंद्रपुरातील पोंभुर्णा येथे गणेश मंडळाचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की

    चंद्रपुरातील पोंभुर्णा येथे गणेश विसर्जन मिरवणुकी दरम्यान गणेश मंडळाचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की केली. धक्काबुक्कीनंतर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सौम्य लाठीचार्ज केला. चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभुर्णा शहरात काल रात्री गणेश विसर्जनाला गाल बोट लागलं आहे. विसर्जन मिरवणुकीदरम्यान पोलीस आणि विघ्नहर्ता गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाल्याने काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली. शाब्दिक बाचाबाचीचं रूपांतर धक्काबुक्की झाल्यानंतर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सौम्य लाठीचार्ज केला.

  • 29 Sep 2026 09:30 AM (IST)

    कर्जमाफीतील प्रोत्साहनपर अनुदानाची प्रतिक्षा

    वाशिम जिल्ह्यात शेतकरी कर्जमाफीची प्रक्रिया वेगाने सुरू झाली असली, तरी नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची प्रतीक्षा मात्र संपलेली नाही. शासनाने नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान देण्याची घोषणा केली मात्र या अनुदानाचा लाभ जिल्ह्यातील नेमक्या किती शेतकऱ्यांना मिळणार याबाबत अद्याप स्पष्टता नाही. कर्जमाफीच्या दोन टप्प्यांतील यादीत जिल्ह्यातील ६२ हजार ८७४ शेतकऱ्यांचा समावेश झाला आहे. यापैकी ५३ हजार ६०६ शेतकऱ्यांची ई-केवायसी पूर्ण झाली असून, तब्बल ९ हजार २६८ शेतकरी अजूनही ई-केवायसीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे कर्ज वेळेवर फेडणाऱ्या शेतकऱ्यांना आता प्रोत्साहनपर अनुदानाची आस लागली असून, शासनाच्या पुढील निर्णयाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

  • 29 Sep 2026 09:20 AM (IST)

    ताकद वाढली,सन्मानजनक जागा द्या- आमदार सुहास बाबरांची मागणी

    सांगली जिल्ह्यात आमची ताकद वाढली आहे,त्यामुळे आम्हाला सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत सन्मानजनक जागा मिळाल्या पाहिजेत,अशी सूचक मागणी शिवसेना शिंदे पक्षाचे आमदार सुहास बाबर यांनी भाजपाकडे केली आहे.तसेच आमचा वाटा वाढवून घेऊ,जो सन्मानजनक प्रस्ताव देईल,अश्या शब्दात सूचक इशारा देखील आमदार सुहास बाबर यांनी भाजपाला दिला आहे,पालकमंत्री चंद्रकांत पाटलांकडून महायुती एकत्रित लढणार असल्याचं जाहीर केलं आहे,मात्र सुहास बाबर यांच्या भूमिकेमुळ सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या जागा वाटपात महायुतीत तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे.सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी शिवसेना शिंदे पक्षाकडून चौघांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत,यावेळी ते बोलत होते.

  • 29 Sep 2026 09:10 AM (IST)

    आरक्षणच्या उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ मुंबईत आंदोलन

    अनुसूचित जाती-जमाती च्या आरक्षणच्या उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ अनेक सामाजिक संघटनांच आंदोलन हे आज आझाद मैदानमध्ये होणार आहे. काही राजकीय पक्षांनी या आरक्षणच्या उपवर्गीकरण ला विरोध केला आहे आज आझाद मैदानावर मातंग,ढोर,वाल्मिकी,मादीगा समाजातील बांधव हे उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ एकवटणार आहेत

  • 29 Sep 2026 09:00 AM (IST)

    आचारसंहितेमुळे हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोचा मुहूर्त पुन्हा हुकला?

    हिंजवडी आयटी पार्कमध्ये जाणाऱ्या प्रवाशांना अजून मेट्रोसाठी प्रतिक्षा करावी लागणार आहे. पीएमआरडीएकडून हिंजवडी ते शिवाजीनगर दरम्यानच्या मेट्रो मार्ग ३ च्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण करण्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असतानाच आता या प्रकल्पावर आचारसंहितेचे सावट निर्माण झाले आहे.

  • 29 Sep 2026 08:55 AM (IST)

    ‘आदिवासी जेन झी’च्या उलगुलान मोर्चाचा आज दुसरा दिवस; आंदोलक मुंबईच्या दिशेने पुढे सरकले

    नाशिकमध्ये सुरू असलेल्या ‘आदिवासी जेन झी’च्या उलगुलान मोर्चाचा आज दुसरा दिवस असून, आंदोलक मुंबईच्या दिशेने पुढे सरकले आहेत. आदिवासी विद्यार्थ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांसाठी हा मोर्चा काढण्यात आला असून, आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या राजीनाम्याची मागणी, सेंट्रल किचन पद्धत बंद करण्याची तसेच सर्पदंशामुळे मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना एक कोटी रुपयांची मदत देण्याची प्रमुख मागणी आंदोलकांनी केली आहे.

  • 29 Sep 2026 08:48 AM (IST)

    नाशिकच्या विमानतळाला ‘जटायू विमानतळ’ असे नाव देण्याची मागणी

    नाशिकच्या विमानतळाला ‘जटायू विमानतळ’ असे नाव देण्याची मागणी पुढे आली आहे. महंत भक्ती चरणदास महाराज यांच्याकडून याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला जाणार आहे. रामायणातील कथेनुसार, माता सीतेला रावणापासून वाचवण्यासाठी जटायूने आकाशात उड्डाण करून प्रतिकार केला होता. नाशिक विमानतळाचे अद्याप अधिकृत नामकरण झालेले नसल्याने, आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विमानतळाला जटायूचे नाव देणे योग्य ठरेल, अशी भावना व्यक्त करण्यात आली आहे.

  • 29 Sep 2026 08:38 AM (IST)

    काँग्रेसचे माजी मंत्री पद्माकर वळवी यांनी ‘लाडकी बहीण’ योजनेच्या निधीवरून राज्य सरकारवर आरोप केले

    नंदुरबारमध्ये काँग्रेसचे माजी मंत्री पद्माकर वळवी यांनी ‘लाडकी बहीण’ योजनेच्या निधीवरून राज्य सरकारवर आरोप केले आहेत. या योजनेमुळे आदिवासी विकास आणि सामाजिक न्याय विभागाच्या निधीवर परिणाम झाल्याचा दावा त्यांनी केला. अनुसूचित जाती-जमातींसाठी असलेल्या योजनांना पुरेसा निधी देण्याची सरकारची इच्छा नसल्याचा आरोपही वळवी यांनी केला. तसेच निधीअभावी आदिवासी विकास विभागातील काही योजना रखडल्या असून सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांवरही त्याचा परिणाम होत असल्याचे त्यांनी म्हटले.

  • 29 Sep 2026 08:28 AM (IST)

    महाराष्ट्राची धुरा सक्षमपणे सांभाळण्याची क्षमता एकनाथ शिंदे यांच्यात- आमदार चंद्रकांत रघुवंशी

    नंदुरबारमध्ये शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी राज्याच्या नेतृत्वाबाबत प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्राची धुरा सक्षमपणे सांभाळण्याची क्षमता एकनाथ शिंदे यांच्यात असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. शिंदे यांनी अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात लोकांच्या मनात स्थान निर्माण केल्याचा दावाही रघुवंशी यांनी केला. दरम्यान, देवेंद्र फडणवीस केंद्रात जाण्याची चर्चा असल्याचा संदर्भ देत, महाराष्ट्राचे नेतृत्व केंद्रातही असणे आवश्यक असल्याचे रघुवंशी म्हणाले. फडणवीस केंद्रात गेल्यास राज्याची धुरा सांभाळण्यासाठी एकनाथ शिंदे पात्र आणि योग्य असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच एकनाथ शिंदे यांनी पुन्हा मुख्यमंत्री व्हावे, अशी अपेक्षाही आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी यावेळी व्यक्त केली.

  • 29 Sep 2026 08:25 AM (IST)

    नाशिक जिल्ह्यात दुष्काळी यादीत समावेश न झालेल्या चार तालुक्यांची पुन्हा पाहणी

    नाशिक जिल्ह्यात दुष्काळी यादीत समावेश न झालेल्या चांदवड, निफाड, त्र्यंबकेश्वर आणि दिंडोरी या चार तालुक्यांची पुन्हा पाहणी करण्यात येणार आहे. या तालुक्यांचा दुष्काळी यादीत समावेश न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी होती. या पार्श्वभूमीवर नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित यंत्रणांना दिले आहेत. पीक नुकसानीचे अचूक मूल्यांकन करण्यासाठी जिल्ह्यात तब्बल २,९०० पीक कापणी प्रयोग राबविण्यात येणार आहेत.

  • 29 Sep 2026 08:23 AM (IST)

    आमदार- खासदारांना सन्मानाची वागणूक देत त्यांच्याशी सुसंवाद ठेवण्याचे प्रशासनाला निर्देश

    मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी प्रशासनाला आमदार आणि खासदारांना सन्मानाची वागणूक देत त्यांच्याशी सुसंवाद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. लोकप्रतिनिधींच्या पत्रांवर तातडीने कार्यवाही करून त्यांना जास्तीत जास्त दोन महिन्यांत अंतिम उत्तर देणे बंधनकारक करण्यात आले आहे. प्रत्येक शासकीय कार्यालयात लोकप्रतिनिधींच्या पत्रव्यवहारासाठी स्वतंत्र नोंदवही ठेवण्याचे तसेच दर तीन महिन्यांनी त्याचा आढावा घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अधिकाऱ्यांनी फोनवरही आदरयुक्त भाषा वापरावी, महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या गुरुवारी आमदार-खासदारांच्या भेटीसाठी वेळ राखीव ठेवावा, तसेच शासकीय कार्यक्रमांना सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींना निमंत्रित करावे, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. या आदेशांचे पालन न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे.

  • 29 Sep 2026 08:22 AM (IST)

    अंगारकी संकष्टी चतुर्थी असल्याने मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर इथं भाविकांची मोठी गर्दी

    आज अंगारकी संकष्टी चतुर्थी असल्याने मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर इथं भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. पितृपक्षातील चतुर्थी आणि मंगळवार असल्याने आजच्या संकष्टीला विशेष महत्त्व आहे. बाप्पाच्या दर्शनासाठी रात्रीपासूनच भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. अंगारकी संकष्टीच्या निमित्ताने मंदिराची फुलांनी आकर्षक सजावट, तसेच विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. संपूर्ण मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला आहे. भाविकांची गैरसोय होऊ नये आणि दर्शन व्यवस्था सुरळीत राहावी यासाठी मंदिर प्रशासनाकडून विशेष नियोजन आणि आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत विरोधकांकडून देशभरात आंदोलनाची तयारी सुरू झाली आहे. काँग्रेससह विविध विरोधी पक्षांकडून निवडणूक आयोगाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित करण्यात येत असून, 2 ऑक्टोबरला दिल्लीतील जंतर-मंतरवर आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे. प्रशांत भूषण यांच्यासह काही आंदोलक नेत्यांनी आंदोलनाची पूर्वसूचना दिली आहे. महाराष्ट्रातही या मुद्द्यावर राजकीय हालचाली वाढल्या असून, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसेकडून रविवारी मुंबईत मोर्चा काढण्याची तयारी आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे संयुक्त पत्रकार परिषदेत आंदोलनाची दिशा स्पष्ट करणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. यासह राज्य, क्रीडा, मनोरंजन आणि राष्ट्रीय क्षेत्रातील इतर घडामोडी जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग फॉलो करा..

Published On - Sep 29,2026 8:20 AM

Follow Us
महाराष्ट्राच्या लेकीची गगन भरारी! मुलांच्या सुरक्षेसाठी बनवलं स्मार्ट
महाराष्ट्राच्या लेकीची गगन भरारी! मुलांच्या सुरक्षेसाठी बनवलं स्मार्ट आयडी कार्ड, थेट जपान दौऱ्यासाठी निवड
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? सुप्रिया सुळेंनी दिलं स्पष्ट उत्तर...
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? सुप्रिया सुळेंनी दिलं स्पष्ट उत्तर; म्हणाल्या, माझा भाऊ गेल्यानंतर...
मुंबईतील रेल्वे स्थानकांवर भोजपुरी गाण्यांचा धुमाकूळ; मराठी संघटना...
मुंबईतील रेल्वे स्थानकांवर छठपुजा गाण्यामुळे वाद; रेल्वे व्यवस्थापकांनी काय दिलं उत्तर?
तहसील कार्यालयातील घाण पाहून गिरीश महाजन संतापले; हातात झाडू घेतली अन्
Girish Mahajan : तहसील कार्यालयातील घाण पाहून गिरीश महाजन संतापले; हातात झाडू घेतली अन् स्वतःच...
पार्सल रद्द केल्याचा राग अनावर! डिलिव्हरी बॉयची वृद्ध दाम्पत्याला...
पार्सल रद्द केल्याचा राग अनावर! डिलिव्हरी बॉयची वृद्ध दाम्पत्याला बेदम मारहाण, मित्रांसह पुन्हा हल्ला
मोठी बातमी! अमूलच्या दुधाच्या दरात वाढ, आजपासून नवे दर लागू; जाणून घ्य
मोठी बातमी! अमूलच्या दुधाच्या दरात वाढ, आजपासून नवे दर लागू; जाणून घ्या किती महागले दूध
मुंबईच्या बाणगंगेत छठपूजेवरून वाद; मनसेचा तीव्र विरोध, आंदोलनाचा इशारा
MNS : मुंबईच्या बाणगंगेत छठपूजेवरून वाद; मनसेचा तीव्र विरोध, आंदोलनाचा इशारा!
तर माझ्यासारखा आंनदी दुसरा कुणी नसेल; उद्धव ठाकरे गटाचं नाव घेत ओमराजे
Omraje Nikmbalkar : 'तर माझ्यासारखा आंनदी दुसरा कुणी नसेल; उद्धव ठाकरे गटाचं नाव घेत ओमराजे नेमकं काय म्हणाले?
बोदवडकरांचा पाणीप्रश्न पेटला! 23 गावांचा पाणीपुरवठा ठप्प, आमदार...
बोदवडकरांचा पाणीप्रश्न पेटला! 23 गावांचा पाणीपुरवठा ठप्प, आमदारांचा अधिकाऱ्यांना जाब
भाऊबीजेला सुषमा अंधारेंची धनंजय मुंडेंना खास शुभेच्छा; म्हणाल्या...
भाऊबीजेला सुषमा अंधारेंची धनंजय मुंडेंना खास शुभेच्छा; म्हणाल्या, 'भाऊ माझा मंत्री होऊ दे!'