पुण्यात लोकसभा निवडणुकीसाठी आतापासून प्रचार, “पुण्याची पसंत मोरे वसंत” लागले बॅनर

Pune Lok Sabha Election : पाच राज्यांतील विधानसभा निवडणूक म्हणजे लोकसभा निवडणुकीची सेमीफायनल होती. ही निवडणूक झाल्यावर सर्वच राजकीय पक्षांना आता लोकसभेचे वेध लागले आहे. पुणे शहरात विविध राजकीय पक्षांनी तयारी सुरु केली आहे. काँग्रेसनंतर आता पुन्हा मनसेचे बॅनर लागले आहे.

पुण्यात लोकसभा निवडणुकीसाठी आतापासून प्रचार, पुण्याची पसंत मोरे वसंत लागले बॅनर
Follow us
| Updated on: Dec 07, 2023 | 10:23 AM

भिजित पोते, पुणे | 7 डिसेंबर 2023 : पाच राज्यांतील विधानसभा निवडणूक म्हणजे लोकसभा निवडणुकीची सेमीफायनल होती. या निवडणुकीनंतर आता सरळ लोकसभेची निवडणूक 2024 मध्ये होणार आहे. येत्या पाच ते सहा महिन्यांत ही निवडणूक होणार असल्यामुळे राजकीय पक्षांनी तयारी सुरु केली आहे. भाजप, काँग्रेसकडून तयारी सुरु असताना छोट्या राजकीय पक्षांनीही तयारी चालवली आहे. पुणे तेथे काय उणे म्हटले जाते. त्याप्रमाणे पुणे लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात एक पाऊल पुढे आहे. पुणे शहरात सर्वच राजकीय पक्षातील कार्यकर्ते भावी खासदार म्हणून आपआपल्या नेत्यांचे बॅनर्स लावत आहे. दोन दिवसांपूर्वी काँग्रेसचे मोहन जोशी यांचे बॅनर लागल्यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते वसंत मोरे यांचे बॅनर लावण्यात आले आहे. त्यात “पुण्याची पसंत मोरे वसंत” असे लिहिले असून भावी खासदार म्हटले गेले आहे.

कोणी लावले बॅनर्स

पुण्यात गेल्या काही दिवसांपासून अनेक राजकीय नेत्यांचे फ्लेक्स पाहायला मिळत आहे. आता मनसेचे नेते वसंत मोरे यांचे पुण्याचे भावी खासदार असे फ्लेक्स शहरात उभारण्यात आले आहेत. पुणे शहर लोकसभेसाठी सक्षम नेतृत्व कार्यसम्राट नगरसेवक वसंत मोरे असा मजकूर या फ्लेक्सवर लिहिण्यात आला आहे. मनसेच्या कसबा विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष गणेश भोकरे यांनी या फ्लेक्स वर “पुण्याची पसंत मोरे वसंत” असे देखील लिहिले आहे. याआधी सुद्धा अनेक वेळा वसंत मोरे यांचे भावी खासदार म्हणून बॅनर लावण्यात आले होते. त्यामुळे आगामी लोकसभा लढविण्यासाठी मोरे यांचे तिकीट फिक्स केलंय का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

हे सुद्धा वाचा

दोन दिवसांपूर्वी मोहन जोशी यांचे बनर्स

पाच राज्यांतील निवडणुकीपैकी तेलंगणा निवडणुकीत काँग्रेसच्या विजयासाठी पुण्यातील काँग्रेस नेते मोहन जोशी यांचे योगदान होते. यामुळे त्यांच्या समर्थकांनी त्यांना भावी खासदार करुन टाकले. यासंदर्भात शहरात बॅनर्स दोन दिवसांपूर्वीच लावण्यात आले होते. पुणे युवक काँग्रेसकडून मोहन जोशी यांचे बॅनर्स लावले होते. त्या बॅनर्समध्ये त्यांना भावी खासदार म्हटले होते.

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.